रिलायन्स इंडस्ट्रीचे फाउंडर धीरुबाई अंबानी यांच्या दोन मुलांमध्ये जेव्हा त्यांची संपत्ती वाटली गेली तेव्हा कोणीच अंदाज लावला नव्हता की, एक मुलगा थेट गरिबीच्या दिशेने जाईल आणि एक मुलगा आशियातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती होईल. नशीबाचे चक्र असे फिरले की, अंबानी १५ वर्षात कंगाल झाले तर मोठा भाऊ मुकेश अंबानी हे यशाच्या शिखरावर पोहचत होते. पण सध्याच्या घडीला मुकेश अंबानी यशस्वी तर अनिल अंबानी अयशस्वी का? यामागे नक्की काय कारणं आहेत त्याबद्दलच अधिक जाणून घेऊयात.(Ambani brothers)
वर्ष २००७ चा कालावधी होता जेव्हा फोर्ब्स इंडियाच्या रिपोर्टनुसार अनिल अंबानी यांच्या संपत्तीत तिप्पट वाढ झाली होती. त्यांचे नेटवर्थ हे ४५ बिलियन डॉलवर पोहचले होते. त्यामुळेच ते देशातील तिसरे सर्वाधिक श्रीमंत उद्योगपती झाले होते. परंतु २०१९ मध्ये अनिल अंबानी यांचे नशीब पालटले. अनिल अंबानी यांच्यावर १२.४० अरब कोटी रुपयांच्या कर्जात बुडाले. त्यांनी ब्रिटेनच्या एका कोर्टाला म्हटले होते की, कर्जात बुडाल्याने आपली संपत्ती शून्यावर आली आहे.
एक काळ होता जेव्हा मुकेश अंबांनींपेक्षा अधिक संपत्ती होती अनिल अंबांनीकडे
संपत्तीचे वाटे झाल्यानंतर अनिल अंबानी यांच्याकडे मुकेश अंबानी पेक्षा अधिक संपत्ती होती. त्यांचा मोठा भाऊ मुकेश अंबानी यांच्यापेक्षा ते कागदोपत्री श्रीमंत होते. २००६ मध्ये त्यांच्याजवळ मुकेश अंबानींच्या तुलनेत ५५० कोटींपेक्षा अधिक संपत्ती होती. परंतु अनिल अंबानी आज कंगाल झाले आहेत. कर्जाच्या बोझाखाली अडकले गेलेल्या अनिल अंबानींची कंपनी रिलायन्स कम्युनिकेशनवर चीनी बँकर्सचे ५ हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. तर २०२० मध्ये अनिल अंबानी यांनी युकेतील एका कोर्टात स्वत:ला दिवाळखोर म्हणून घोषित केले होते. त्यांची कंपनी रिलायन्स इंफ्रास्ट्रक्चर, रिलायंन्स कम्युनिकेशन, रिलायन्स कॅपिटल, रिलायन्स पॉवर सुद्धा फार मोठ्या कर्जात बुडाले आहेत. काही कर्ज फेडले जात आहेत तर काही प्रकरणी अनिल अंबानी डिफॉल्टर झाले आहेत.
हे देखील वाचा- Lakshmi कंपनीचा Lakme ब्रँन्ड कसा झाला? जाणून घ्या टाटा, नेहरु ते अभिनेत्र्यांसंबधित याची कथा
कर्जात बुडालेल्या अनिल अंबानींच्या काही कंपन्या एकामागून एक विक्री केल्या गेल्या. जुलै २०२१ मध्ये रिलायन्स कमर्शियल फायनान्सची सुद्धा विक्री करावी लागली. ऑथम इंवेस्टमेंट अॅन्ड इंफ्रास्ट्रक्चरने १६२९ कोटी रुपयांमध्येया कंपनीचे अधिग्रहण केले होते. दरम्यान, संपत्तीचे वाटे झाल्यानंतर अनिल अंबानींना ज्या कंपन्या मिळाल्या होत्या त्यावर त्यांनी लक्ष न देता दुसऱ्या ठिकाणी गुंतवणूक करण्यास सुरुवात केली होती. त्यांची ही गुंतवणूक सर्वाधिक मोठी चुक ठरली कारण त्यांना या गुंतवणूकीमुळे मोठा फटका बसला.(Ambani brothers)
७५ हजार कोटींचे १७ लाख कोटी करणारे मुकेश अंबानी
धीरुभाई अंबानी यांच्या निधानंतर मुकेश अंबानी यांच्याकडे रिलायन्स इंडस्ट्रीजची सुत्रे हाती आली होती. त्यानंतर मुकेश अंबानी यांनी आपल्या मेहनीनंतर आणि समर्पणाने रिलाइन्स इंडस्ट्रीडला देशातील सर्वात मोठी कंपनी बनवले. तर २००२ मध्ये रिलाइन्स इंडस्ट्रीजचे मार्केट कॅप हे ७५ हजार कोटी होते. तर आता मुकेश अंबानींच्या नेतृत्वामुळे १७ लाख कोटी रुपयांच्या ही पुढे गेले आहेत.