Home » ‘या’ फळाचे नाव विचित्र असले तरी असते फायदेशीर फळ

‘या’ फळाचे नाव विचित्र असले तरी असते फायदेशीर फळ

by Team Gajawaja
0 comment
Beneficial fruit
Share

दक्षिण मध्य मेक्सिकोमध्ये आढळणारे, एवोकॅडो हे फळ आता भारताच्या प्रत्येक फळबाजारत उपलब्ध आहे. अतिशय गुणकारी अशा या एवोकॅडोच्या फळाला भारतीय बाजारात मागणीही चांगली आहे. विशेष म्हणजे, मेक्सिकोमध्ये उबदार हवामानात अत्यंत चांगल्या दर्जाचे  एवोकॅडो हे फळ होतं. तसंच उबदार हवामान भारतातील अनेक भागात असल्यानं,  एवोकॅडो हे फळ भारतातही चांगल्या प्रकारे होऊ लागले आहे.  एवोकॅडोच्या झाडांची मोठ्या प्रमाणता लागवड होत असून फळांची शेती करणा-या शेतक-यांना या फळांनं चांगला फायदा करुन द्यायला सुरुवात केली आहे. (Beneficial fruit)  

भारतात शेती हा बेभरवशाचा व्यवसाय असल्याचे बोलले जाते.  बदलते हवामान हे शेतीसाठी कायम अडचणीचे ठरले आहे.  कधीही येणारा पाऊस शेतीतील उप्तादनाला मारक ठरला आहे. यावर मात करायची असेल तर पारंपारिक शेतीची कास सोडून नव्या पद्धतीनं शेती करायला हवी. तसेच फुले आणि फळांची लागवडही आधुनिक पद्धतीनं केल्यास त्याचा खूप फायदा शेतक-यांना होत असल्याचे आढळून आले आहे. परदेशात होणा-या पिकाची लागवड आधुनिक पद्धतीनं केल्यास अधिक फायदा मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशाच परदेशी फळात एवोकॅडो या फळाचे नाव सर्वात चर्चेत असते. अत्यंत गुणकारी असलेला एवोकॅडो हा परदेशातला फळांचा राजाच म्हटलं  पाहिजे.  अगदी ज्युसपासून ते त्याच्या सॅलेडपर्यंत अनेक पदार्थ लोकप्रिय आहेत. सोबत या फळाचे सेवन केल्यानं अनेक रोगांना अटकाव करता येतो.  त्यामुळेच एवोकॅडोला बाजारात मागणी आहे.(Beneficial fruit)  

एवोकॅडो हे प्रामुख्याने दक्षिण मध्य मेक्सिकोमध्ये आढळते. काही वर्षापूर्वी भारतात मोठ्या मॉलमध्ये अत्यंत चढ्या दरानं या फळाची विक्री होत असे. पण आता एवोकॅडोच्या झाडाची लागवड भारतातही मोठ्या संख्येनं होत असल्यानं बाजारात एवोकॅडो कधीही उपलब्ध होऊ लागले आहे. एवोकॅडोचे साल हे थोडे कडक असते. पण त्याच्या आत पिस्त्याच्या रंगासारखा गर असतो. त्याची बी ही जायफळाच्या आकाराची असते. या गराचे ज्युस किंवा वेगवेगळ्या सॅलेडमध्ये वापर करण्यात येतो.  (Beneficial fruit)

एवोकॅडो लागवडीसाठी 20 ते 30 अंश सेल्सिअस तपमान योग्य समजले जाते. भारतात ओडिशा, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, पंजाब आणि हरियाणा या राज्यांचे तापमान असे असल्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात एवोकॅडोची लागवड होत आहे. एवोकॅडो फळाला किंमतही चांगली मिळते. एक फळ त्याच्या आकारानुसार विक्रीस जाते. अगदी 100 ते 500 रुपयांपर्यंत एका फळाची किंमत असते. एवोकॅडोचे फायदे अनेक आहेत. या फळाची चव बटरसारखीही असते. त्यामुळे बटरफ्रूट म्हणूनही हे फळ ओळखले जाते. एवोकॅडोमध्ये वाढलेले कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब कमी करण्याचा गुणधर्म आहे. त्यात मोनोसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड तसेच फायबर, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि ई आणि के जीवनसत्त्वे असतात. 

यामुळे एवोकॅडोचे सेवन केल्यावर शरीरात आवश्यक पोषक तत्वांचा पुरवठा होऊन शरीर निरोगी रहाण्यास मदत होते.  एवोकॅडोमध्ये फायबरचेही प्रमाण अधिक असते. त्यामुळे पचन क्रीया सुधारते. एवोकॅडोमध्ये असलेले फायबर आतड्यांमध्ये चांगल्या बॅक्टेरियाची वाढ करते, असे एका संशोधनात स्पष्ट झाले आहे.  त्यामुळे पचनास मदत होते. एवोकॅडोचा एक ग्लास ज्युस हा एकवेळच्या जेवणाएवढा होतो.  त्यामुळे आठवड्यातून एकवेळा तरी हा ज्युस घेतला तर वजन कमी होते, असे स्पष्ट झाले आहे. एवोकॅडोमध्ये कमी कॅलरीज असतात, ज्यामुळे वजन नियंत्रित ठेवता येते. (Beneficial fruit)

========

हे देखील वाचा : धनुष्यबाणाच्या आकाराचे राममंदिर

=======

कर्करोगासारख्या घातक आजारांपासून दूर राहण्यासाठीही एवोकॅडोचे सेवन फायदेशीर ठरते. एवोकॅडोमध्ये एवोकॅटिन-बी नावाचे तत्व आढळते. हा घटक ल्युकेमिया स्टेम पेशींशी लढण्याचे कार्य करतो. तसेच एवोकॅडोचे सेवन केल्यास प्रोस्टेट कर्करोगाच्या पेशींच्या वाढीस प्रतिबंध होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.  एवोकॅडो हाडांसाठीही उपयुक्त आहे. कच्च्या एवोकॅडोमध्ये बोरॉन नावाचे खनिज असते,  त्यामुळे कॅल्शियमचे शोषण वाढवून हाडांना फायदा होतो.   मुख्य म्हणजे, एवोकॅडो फळ यकृताच्या आरोग्यासाठी उकृष्ठ मानण्यात येते. एवोकॅडोचे नियमीत सेवन केल्यास पोटत होणारी जळजळ कमी होते.  एवोकॅडो फळाचा वापर मूत्रपिंड निरोगी आणि सुरक्षित ठेवण्यासाठी देखील फायदेशीर आहे. रक्तातील वाढलेली साखरही या फळानं नियंत्रीत करता येते. असे हे बहुगुणी फळ आता भारतात मोठ्या प्रमाणात तयार होत आहे.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.