Home » All Eyes On Poonch : १५ मृत्यू, ४३ जखमी, १ जवान शहीद

All Eyes On Poonch : १५ मृत्यू, ४३ जखमी, १ जवान शहीद

by Team Gajawaja
0 comment
All Eyes On Poonch
Share

रात्रीच्या शांततेत अचानक गोळ्यांचा आणि बॉम्बच्या स्फोटांचा आवाज येऊ लागला. शांत झोपलेल्या १२ वर्षांच्या रुखसानाच्या घरावर एक बॉम्ब पडला आणि घराचं छतच कोसळलं. पुंछ जम्मू-काश्मीरमधलं एक शांत शहर. पण गेल्या काही तासांपासून इथलं वातावरण पूर्णपणे बदललंय. रात्रीच्या शांततेत गोळ्यांचा आवाज, बॉम्बच्या स्फोटांचा आवाज, आणि लोकांच्या किंकाळ्या… पुंछमधलं सध्याचं चित्र असं आहे. (All Eyes On Poonch)

याला कारण आहे ‘ऑपरेशन सिंदूरनंतरचा पिसाळलेला पाकिस्तान. भारताने ७ मे २०२५ रोजी ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानच्या दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केला. त्यानंतर पाकिस्तानने पुंछ आणि राजौरीत अंधाधुंद गोळीबार सुरू केला. यात १५ निरपराध भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे आणि अनेक जखमी झालेत, आणि एक भारतीय जवानही या हल्ल्यात शहीद झालाय. ऑपरेशन सिंदूरनंतर पुंछमध्ये काय घडलं आहे? हे जाणून घेऊ.  (All Eyes On Poonch)

७ मे २०२५ ची मध्यरात्र… पुंछ आणि राजौरीच्या सीमेवर अचानक गोळीबार सुरू झाला. रात्री १ वाजल्यापासून सकाळी ६ वाजेपर्यंत पाकिस्तानच्या सैन्याने अंधाधुंद गोळ्या आणि मोर्टार शेल्स डागले. यात सामान्य लोकांची घरं उद्ध्वस्त झाली, बस स्टँडवर काचा फुटल्या, आणि अगदी गुरुद्वाऱ्याच्या जवळही शेल पडलं. या हल्ल्यात १५ निरपराध लोकांचा मृत्यू झाला असल्याचं बोललं जातंय, ज्यामध्ये एक महिला आणि चार लहान मुलांचा सुद्धा समावेश आहे. तर ४३ लोक जखमी झालेत. (All Eyes On Poonch)

पुंछमधल्या गुरुद्वारा श्री गुरु सिंह सभा साहिबजवळ एक शेल पडला, ज्यामुळे तिथल्या ५ शीख बांधवांचा मृत्यू झाला. याशिवाय, ७ वर्षांच्या मुलीपासून ते ८० वर्षांच्या वृद्धांपर्यंत सगळ्यांना या हल्ल्याची झळ बसली. एक १२ वर्षांची मुलगी, रुखसाना, हॉस्पिटलमध्ये दाखल आहे. तिच्या डोक्यावर आणि हातावर जखमा झाल्या आहेत. तिचा भाऊ सांगतो, “गोळा थेट आमच्या घरावर पडला, आणि रुखसाना जखमी झाली.” दुसरीकडे, ३५ वर्षांचा अब्दुल मजीद म्हणतो, “मी जिवंत आहे, हाच मला चमत्कार वाटतोय. पण रात्री पुन्हा शेलिंग सुरू होईल, याची भीती वाटतेय.” (All Eyes On Poonch)

या सगळ्यात आणखी एक धक्कादायक बातमी म्हणजे, पाकिस्तानकडून करण्यात हल्ल्यात आलेल्या भारतीय सेनेचे लान्स नायक दिनेश कुमार शहीद झालेत. दिनेश कुमार हे ५ व्या फील्ड रेजिमेंटचे शूर जवान होते. (All Eyes On Poonch)

२२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी क्रूर हल्ला केला, ज्यामध्ये अनेक निरपराध नागरिकांचा बळी गेला. या भ्याड हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने “ऑपरेशन सिंदूर” राबवलं. या ऑपरेशन अंतर्गत, पाकिस्तान आणि पाक-व्याप्त काश्मीरमधल्या ९ दहशतवादी ठिकाणांवर पिनपॉइंट स्ट्राइक्स करण्यात आल्या. यात लष्कर-ए-तय्यबा, जैश-ए-मोहम्मद, आणि हिजबुल मुजाहिद्दीनच्या तळांवर हल्ले करण्यात आले. (All Eyes On Poonch)

या स्ट्राइक्समध्ये १०० हून अधिक दहशतवादी ठार झाले, आणि जैश-ए-मोहम्मदचा मोहरक्या मसूद अझरच्या कुटुंबातील १० सदस्यांचाही मृत्यू झाला.भारताने हे सगळे हल्ले फक्त दहशतवादी ठिकाणांवर केले. सामान्य नागरिक किंवा पाकिस्तानी लष्कराला टारगेट केलं नाही. भारतीय सेनेने स्पष्ट सांगितलं, “या टारगेटेड स्ट्राइक्स आहेत, याचा उद्देश फक्त दहशतवाद्यांना संपवणं आहे, कोणताही तणाव वाढवायचा नाही.” (All Eyes On Poonch)

==============

हे देखील वाचा : Mahabharat : महाभारतातील ‘या’ आहेत शक्तिशाली महिला

=============

पण पाकिस्तानला हे सहन झालं नाही आणि त्यांनी सीमेवर अंधाधुंद गोळीबार आणि शेलिंग सुरू केलं. भारताने याला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. भारतीय सेना सीमेवर सतर्क आहे आणि पाकिस्तानच्या प्रत्येक गोळीला तितक्याच ताकदीने उत्तर दिलं जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट सांगितलं, “लोकांचा जीव वाचवणं ही सरकारची पहिली प्राथमिकता आहे.” सीमेवरील गावं खाली करण्याचे आदेश देण्यात आलेत, आणि लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे. बीएसएफ आणि इतर सुरक्षा दलांना पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आलं आहे. (All Eyes On Poonch)

पपुंछमधलं चित्र खूपच भयानक आहे. घरांच्या भिंतींवर गोळ्यांचे निशाण आहेत, तुटलेल्या खिडक्या, आणि रस्त्यावर पडलेला मलब्याचे ढिगारे. स्थानिक सांगतात, “रात्री १ वाजता शेलिंग सुरू झाली, आणि सकाळी ६ वाजेपर्यंत सगळं उद्ध्वस्त झालं.” पाकिस्तान सतत आरोप करतोय की भारताने केलेल्या हल्ल्यात त्यांचे सामान्य नागरिक मारले गेले. पण जेव्हा भारताने दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केला, तेव्हा पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारात दिसले. मग प्रश्न असा आहे – जर सामान्य नागरिक मारले गेले, तर तुमचं सैन्य दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्काराला का जातं? यातूनच पाकिस्तानचा खरा चेहरा समोर येतो.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.