Home » Alia Bhatt First Look From Brahmastra : आलियाचं वाढदिवसानिमित्त तिच्या चाहत्यानां खास गिफ्ट, ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटातील आलियाचा फर्स्ट लूक रिलीज

Alia Bhatt First Look From Brahmastra : आलियाचं वाढदिवसानिमित्त तिच्या चाहत्यानां खास गिफ्ट, ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटातील आलियाचा फर्स्ट लूक रिलीज

by Team Gajawaja
0 comment
Alia Bhatt
Share

आपल्या दमदार अभियाने सगळ्याचे मन जिंकणारी आलिया भट्टचा (Alia Bhatt) मंगळवारी वाढदिवस होता. या वाढदिवासानिमित्त तने आपल्या चाहत्यानां खास सरप्राइज दिलं. आलिया भट्टने वाढदिवसानिमित्त तिचा ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटातील पहिला लूक रिलीज करण्यात आला आहे. आलिया भट्टला (Alia Bhatt) आता तिच्या चित्रपटासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छाही मिळत आहेत. या चित्रपटातील आलिया भट्टच्या (Alia Bhatt) फर्स्ट लूकची बऱ्याच दिवसांपासून चर्चा होती आणि आता अखेर चित्रपटाचे दिग्दर्शक अयान मुखर्जीने या आलियाचा फर्स्ट लूक रिलीज केला आहे. अशा परिस्थितीत आलियाने वाढदिवसानिमित्त तिच्या चाहत्यांना ‘ब्रह्मास्त्र’ मधून तिचा फर्स्ट लूक रिलीज करून चाहत्यानां रिटर्न गिफ्ट देण्यात आले आहे.

या चित्रपटात आलिया भट्टचे नाव ईशा आहे. आलिया भट्टने (Alia Bhatt) तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचा फर्स्ट लूक टीझर रिलीज केला आहे. 31 सेकंदांच्या या टीझरमध्ये आलिया भट्टच्या ईशाच्या वेगळ्या अवताराची झलक पाहायला मिळते. या टीझरमध्ये तुम्हाला आलिया भट्टचा बबली, ग्लॅमरस आणि बिंदास अवतार पाहायला मिळेल.

आलियाच्या या फर्स्ट लूक टीझरमध्ये अभिनेता रणबीर कपूरचीही झलक पाहायला मिळाली आहे. टीझरमध्ये तुम्हाला दिसेल की आलिया भट्टने रणबीर कपूरला आपल्या मिठीत घट्ट पकडले आहे आणि आलिया आकाशाकडे पाहत आहे, तर रणबीरचा चेहरा लपविला आहे.

Alia Bhatt Brahmastra

अयान मुखर्जीने आलियाला वाढदिवसाच्या दिल्या खास शुभेच्छा

तिच्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्री आलियाचा पहिला लूक रिलीज करताना अयान मुखर्जीने लिहिले – हॅपी बर्थडे लिटल वन. तुमच्या वाढदिवशी काहीतरी खास म्हणत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

====

हे देखील वाचा: बॉलिवूडमध्ये अवतरलाय नवा चॉकलेट बॉय…शांतनु माहेश्वरी (Shantanu Maheshwari)

====

====

हे देखील वाचा: Runway 34 Teaser: अजय देवगण दिग्दर्शित ‘रनवे 34’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला, तर ट्रेलर होणार ‘या’ दिवशी प्रदर्शित

====

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर पहिल्यांदाच दिसणार एकत्र

या चित्रपटाद्वारे आलिया भट्ट आणि रणबीर कपूर पहिल्यांदाच एकत्र रुपेरी पडदा शेअर करत आहेत. या चित्रपटात आलिया आणि रणबीरशिवाय अमिताभ बच्चन, मौनी रॉय, नागार्जुन हे देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा एक फँटसी ड्रामा आहे, जो यावर्षी 9 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. रणबीर आणि आलियाचा हा पहिला चित्रपट आहे, जो हिंदीशिवाय तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. आता आलिया आणि रणबीर त्यांच्या केमिस्ट्रीची जादू चाहत्यांवर चालवतात की नाही हे पाहावे लागेल.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.