पाकिस्तानी क्रिकेटर आणि कर्णधार यांना आपण काही वेळेस सर्वसामान्यपणे टीव्हीवर ‘अल्हमदुल्लिलाह’ (Alhamdulillah) असे बोलताना पाहतो किंवा ऐकतो. तसेच काही पाकिस्तानी क्रिकेट कर्णधार, कोच आणि कमेंटेटर सुद्धा हा शब्द पुन्हा पुन्हा वापरताना दिसून येतात. अखेर याचा अर्थ काय होतो आणि या शब्दाचा उल्लेख का केला जातो याबद्दल आपण अधिक जाणून घेऊयात. परंतु आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, प्रत्येक व्यक्ती आपला धर्म आणि संस्कृतीनुसार चालतो. अशातच मुस्लिम बांधवांमध्ये हा शब्द उच्चारणे ही एक सर्वसामान्य बाब आहे. खरंतर हा एक अरबी शब्द आहे. जो जवळजवळ सर्व देशांच्या मुस्लिम बांधवांकडून बोलला जातो.
तीन शब्दांनी मिळून बनलाय एक शब्द
अल्हमदुल्लिलाह हा पूर्ण एक शब्द नाही. खरंतर तो तीन शब्दांपासून मिळून एक बनला आहे. यामधील पहिला शब्द आहे अल. हा एक अरबी शब्द आहे.याचा वापर अरबी ते उर्दूत अशा पद्धतीने केला जातो जसे इंग्रजीतील शब्द द म्हणजेच The. म्हणजेच एखाद्याचे नाव, ठिकाण किंवा खास गोष्टीची विशेषता सांगण्यासाठी. त्यानंतर येतो हमद. याचा अर्थ आहे सन्मान करणे. तिसरा शब्द आहे तो म्हणजे लिल्हाह म्हणजेच अल्लाहसाठी. म्हणजेच अल्हमदुल्लिलाह याचा अर्थ असा होतो की, अल्लाहाचा सन्मान करण्यासाठी. सर्वसामान्यपणे मुस्लिम लोक अल्लाह याचे आभार मानण्यासाठी किंवा त्याच्या प्रति सन्मानाच्या भावनेने याचा वापर करतात.
कुरान शरिफच्या पहिल्या आयातीत
दुसऱ्या भाषांमध्ये आणि संस्कृतीत याच्याशी मिळतेजुळते शब्द काय आहेत. अशातच प्रश्न उपस्थितीत राहतो की, हा पूर्ण शब्द आलाय कुठून. तो इस्लामिक पवित्र किताब म्हणजेच कुरान शरीफ यांच्या पहिल्या आयातीतून घेतला गेला आहे. ज्यामध्ये असे म्हटले गेले आहे की, प्रत्येकाला कोणत्याही स्थितीत अल्लाहवर विश्वास आणि भरोसा ठेवला पाहिजे. (Alhamdulillah)
इंग्रजी आणि हिंदीतील मिळतेजुळते शब्द काय आहे?
इंग्रजीत या बद्दल नेहमीच बाई द ग्रेस ऑफ गॉड असे म्हणतात की, हिंदीत ईश्वराच्या कृपेने. कधी कधी याचे ट्रांन्सलेशन असे सुद्धा होते की, देवाचे आभार. खरंतर हा शब्द फक्त मुस्लिमच वापरत असतील असे नाही तर अरबी भाषेत नॉन-मुस्लिम सुद्धा असे बोलतात. म्हणजेच अरबी बोलणारे यहूदी आणि ईसाई सुद्धआ याचा वापर करताना आढळतील. याचा एक अर्थ असा ही होतो की, देव सर्वकाही नेहमीच उत्तम करतो. त्याच्यावर सर्व सोडा, सर्वकाही ठिक होईल.
हे देखील वाचा- भारतीय व्यापा-याचा एका राजाला दणका….
वेळोवेळी केला जातो याचा वापर
याचा वापर दिवसा जेव्हा किती ही वेळा प्रत्येक कामादरम्यान, आभार मानण्यासाठी किंवा प्रार्थना करताना वापर केला जातो. खरंतर पाकिस्तानच्या टीमचा कर्णधार उत्तम खेळ खेळताना याचा वापर मीडियाशी बातचीत करताना जरुर करतात.