जर्मनी मधील महान भौतिक वैज्ञानिक अल्बर्ट आइंस्टाइन यांना जेव्हा आयुष्याच्या अखेरच्या काळात रुग्णालयात नेले जात होते तेव्हा त्यांना माहिती होते की, आपल्याजवळ अधिक वेळ नाही. रुग्णालयात पोहचल्यानंतर ७६ वर्षीय आइंस्टाइन यांनी डॉक्टरांना असे सांगितले की, मला आता कोणत्याही मेडिकल आधाराची गरज नाही. मला जेव्हा वाटेल तेव्हा जाईन, बनावटी आयुष्य जगण्यात मला काही आनंद वाटत नाहीयं. मी माझे काम करुन पूर्ण झालो आहे. आता माझ्या जाण्याची वेळ आली आहे. मी पूर्ण निष्ठेने जाऊ इच्छित आहे.(Albert Einstein)
जेव्हा १८ एप्रिल १९५५ रोजी आइंस्टाइन यांची पोटाच्या गंभीर समस्येमुळे मृत्यू झाला होता तेव्हा त्यांनी आपल्या मागे एक अद्वितीय वासरा मागे सोडला होता. कुरळे केस असणारा वैज्ञानिक हा २० व्या शतकातील प्रतीक बनले होते. महान आर्टिस्ट चार्ली चॅपलिन यांच्याशी त्यांची उत्तम मैत्री होती. ते अशा लोकांपैकी होते ज्यांना सत्तावादाच्या रुपात पसरवल्या जाणाऱ्या नाजी जर्मनी पासून बचावले आणि भौतिकीच्या नव्या मॉडेलचे त्यांनी नेतृत्व केले.
सर्वाधिक मौल्यवान मानला गेला आइंस्टाइन यांचा मेंदू
आइंस्टाइन यांचा जन्म १४ मार्च १८७९ मध्ये जर्मनीतील वुर्टेमबर्ग येथील उल्म मध्ये झाला होता. धर्मनिरपेक्षा आईवडिलांचा मुलगा असलेले आइंस्टाईन दीर्घकाळापर्यंत केवळ एक लक्ष्यहीन मध्यमवर्यीग यहूदी तरुण होते. त्यानंतर त्यांनी १९१५ मध्ये सामान्य सापेक्षतेचा सिद्धांत विकसित केला. याच्या सहा वर्षानंतर म्हणजेच १९२१ मध्ये त्यांना भौतिकीसाठी नोबेल शांती पुरस्कार ही दिला गेला. याआधी पाच वर्षाचे असताना कंम्पास सोबत त्यांची भेट झाली. त्यांना कंम्पास पाहून फार आश्चर्यचकीत झाले. यामुळे त्याच्यामध्ये विश्वाच्या अदृश्य शक्तींबद्दल आजीवन आकर्षण निर्माण झाले. यानंतर वयाच्या 12 व्या वर्षी भूमितीच्या पुस्तकातून त्यांची भेट हर्डशी झाली. त्यांनी त्याला प्रेमाने आपले ‘पवित्र छोटे भूमिती पुस्तक’ म्हटले होते.

शिक्षकांनी म्हटले होते तुझे काहीच होणार नाही
याच दरम्यान, आइंस्टाइनच्या शिक्षकांनी त्यांच्याबद्दल असे म्हटले होते की, तुझे आयुष्यात काहीच होऊ शकत नाही. त्यानंतर सुद्धा आइंस्टाइन यांच्या मनात वीज आणि प्रकाशाबद्दल अधिक उत्सुकता वाढली. त्यांनी १९०० मध्ये स्विर्त्झलँन्ड मधील ज्युरिख मध्ये स्विस फेडरल इंस्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी मधून ग्रॅज्युट डिग्री घेतली. आपल्या जिज्ञासू स्वभाव आणि शैक्षणिक पार्श्वभूमी असूनही, आईन्स्टाईन यांना संशोधनासाठी खूप संघर्ष करावा लागला. मुलांना वर्षानुवर्षे शिकवल्यानंतर, एका मित्राच्या वडिलांनी बर्नमधील पेटंट ऑफिसमध्ये लिपिक म्हणून आईनस्टाईनची शिफारस केली. नोकरी मिळाल्यानंतर आईन्स्टाईनने आपल्या मैत्रिणीशी लग्न केले, जिच्यापासून त्याला दोन मुले होती. दरम्यान, आईन्स्टाईन आपल्या फावल्या वेळेत विश्वाविषयी सिद्धांत मांडत राहिले.(Albert Einstein)
आइंस्टाइन यांना जर्मनी सोडावी लागली
पहिले महायुद्ध सुरु झाले तेव्हा आइंस्टाइनने जर्मनीच्या राष्ट्रवादाचा सार्वजनिक रुपात विरोध केला. जसे दुसरे महायुद्ध सुरु झाले तेव्हा आइंस्टाइन यांनी नाझींच्या छळापासून दूर राहण्यासाठी आपली दुसरी बायको एल्सा हिच्यासोबत अमेरिकेत निघून गेले. 1932 पर्यंत, वाढत्या नाझी चळवळीने आईनस्टाईनच्या सिद्धांतांना ‘ज्यू भौतिकशास्त्र’ असे नाव दिले. त्याचवेळी जर्मनीने त्यांच्या कार्याचा निषेध करण्यास सुरुवात केली होती. तथापि, न्यू जर्सी येथील प्रिन्स्टन विद्यापीठातील प्रगत अभ्यास संस्थेने आइनस्टाईनचे स्वागत केले. येथे त्याने काम केले आणि दोन दशकांनंतर त्याच्या मृत्यूपर्यंत जगाच्या रहस्यांवर चिंतन केले.
मृत्यूनंतर मेंदू चोरला
आइंनस्टाइन यांच्या मृत्यूनंतर काही तासांनी पोस्टमॉर्टेम करणारे डॉक्टर थॉमस हार्वे यांनी कुटुंबीयांच्या मान्यतेशिवाय त्याचा मेंदू बाहेर काढला आणि घरी नेला. डॉ.हार्वे म्हणाले की, जगातील सर्वात प्रतिभावान व्यक्तीच्या मेंदूचा अभ्यास करणे आवश्यक आहे. आइंनस्टाइनने त्यांच्या शरीराची कोणतीही चाचणी करण्यास मनाई केल्यानंतरही त्यांचा मुलगा हॅन्सने डॉ. हार्वे यांना त्यांचे काम करू दिले. वास्तविक, हॅन्सचा असा विश्वास होता की डॉ. हार्वे यांना जे करायचे आहे ते जगाच्या भल्यासाठी आवश्यक आहे. हार्वेने आइंन्स्टाइनच्या मेंदूचे खुप फोटो सुद्धा काढण्यात आले होते. (Albert Einstein)
हे देखील वाचा- सॅम मानेकशॉ यांच्या नेतृत्वाखाली १९७१ मध्ये जेव्हा भारताने पाकिस्तानला गुडघे टेकण्यास भाग पाडले
मेंदूचे २४० तुकडे का केले?
डॉ. हार्वे यांनी फोटो काढल्यानंतर आईन्स्टाईनच्या मेंदूचे 240 तुकडे केले. त्यांनी यातील काही इतर संशोधकांना पाठवले. डॉ. हार्वे यांनी ९० च्या दशकात आईनस्टाईनच्या नातवाला आईनस्टाईनच्या मेंदूचा एक भाग भेट देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या नातवाने ही भेट स्वीकारण्यास नकार दिला. डॉ. हार्वे यांनी त्यांच्या मेंदूचे काही भाग इतर संशोधकांना सायडर बॉक्समध्ये पाठवले होते, जे त्यांनी बिअर कूलरखाली ठेवले होते. डॉ. हार्वे यांनी १९८५ मध्ये आइनस्टाईनच्या मनावर एक शोधनिबंध प्रकाशित केला. यामध्ये त्यांनी लिहिले की, हा मेंदू सरासरी मेंदूपेक्षा वेगळा दिसतो. म्हणूनच ते वेगळ्या पद्धतीने देखील कार्य करते.