Home » Al Qadir Trust Case नक्की काय आहे? ज्यामुळे इमरान खान यांना अटक झालीय

Al Qadir Trust Case नक्की काय आहे? ज्यामुळे इमरान खान यांना अटक झालीय

by Team Gajawaja
0 comment
Al Qadir Trust Case
Share

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफचे अध्यक्ष इमरान खान यांना अटक करण्यात आली आहे. इमरान खान यांना पाकिस्तान रेंजर्सने इस्लामाबाद कोर्टात अटक केली. खान यांना अटक झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी गोंधळाची स्थिती निर्माण केली. कोर्टात अटक केल्यानंतर इमरान खान यांना NAB च्या कार्यालयात नेण्यात आले. (Al Qadir Trust Case)

इमरान खान यांना एनएबी म्हणजेच National Accountability Bureau ने अल-कादिर ट्रस्ट प्रकरणी अटक केली आहे. इमरान खान या प्रकरणी इस्लामबाद कोर्टात जामिनीसाठी गेले होते. अल-कादिर ट्रस्ट प्रकरणी फसवणूकीच्या आरोपाखाली त्यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता.

अल कादिर ट्रस्ट वास्तवात एका युनिव्हर्सिटी संदर्भातील प्रकरण आहे. ती झेलमच्या सोहावा मध्ये २०२१ मध्ये बांधण्यात आली होती. आरोप असा आहे की, दान करण्यात आलेल्या जमिनीच्या कागदावर अल-कादिर युनिव्हर्सिटीकडून इमारान खान यांची पत्नी बुशरा खान आणि जमीन दान दिलेल्यांची संयुक्त स्वाक्षरी आहे. पंतप्रधानपदी असताना इमरान खान अल कादिर ट्रस्ट युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष सुद्धा होते.

परंतु २०२१ मध्ये बांधण्यात आलेल्या इमरान खान यांच्या या युनिव्हर्सिटीला सरकारकडून अद्याप मान्यता दिलेली नाही. ही संस्था एक ट्रस्टच्या रुपात रजिस्टर झाली होती. परंतु तेथे विद्यार्थ्यांकडून पैसे उकळले जात होते. अल-कादिर युनिव्हर्सिटी प्रोजेक्ट ट्रस्टच्या माध्यमातून इमरान खान, त्यांची पत्नी बुशरा बीबी आणि त्यांचे निकटवर्तीय जुल्फिकार बुखारी आणि बाबर अवान यांचा समावेश होता. परंतु ट्रस्टच्या ऑफिसच्या पत्त्यावर बनवण्यात आलेला गाला हाउस, इस्लामबाद येथे आहे. (Al Qadir Trust Case)

या ट्रस्टिंनी रियल इस्टेट व्यवसायातील एका खासगी कंपनीकडून पैसे घेत एक करार केला होता. त्या कंपनीने ट्रस्टला जमीन दिली होती. असे मानले जाते की, या संस्थेच्या माध्यमातून रियर इस्टेट व्यवसायिकांना संरक्षण दिले जात होते. कागदपत्रांवरुन कळते की, इमरान खान, बुशरा बीबी आणि अवानने अल-कादिर युनिव्हर्सिटी प्रोजेक्ट ट्रस्टची स्थापना केली होती. याचा उद्देश पंजाब मधील झेलमच्या तहसील सोहावा मध्ये उत्तम शिक्षण देणे होते. परंतु पडद्यामागे काहीतरी वेगळेच सुरु होते.

हे देखील वाचा- पाकिस्तानात शिवलिंगावर दूध अर्पण करणारी फातिमा भुट्टो कोण?

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांच्या विरोधात तोशखाना प्रकरणासह जवळजवळ ३७ प्रकरण दाखल आहेत. फवाद चौधरी यांच्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार खान हे स्वत: १९ प्रकरणांत याचिकाकर्ते आहेत. ज्या शासकीय विभाग आणि व्यक्तींच्या विरोधात दाखल केल्या होत्या. परंतु खान यांच्या विरोधात एकूण ३७ प्रकरणे अशी आहेत ज्यामध्ये त्यांचा थेट समावेश आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.