अलीकडल्या काळात फिल्म इंडस्ट्रीमधील कलाकारांच्या आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. काम मिळत नसल्याच्या तणावाखाली त्यांनी असे टोकाचे पाऊल उचलले आहे.अशातच आता भोजपुरी इंडस्ट्री मधील अभिनेत्री आकांक्षा दुबे हिने वयाच्या २५ व्या वर्षी आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. आकांक्षाने बनारस मधील एका हॉटेलमध्ये आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. तिने उचललेल्या या पावलामुळे सर्वजण हैराण झाले आहेत. चाहत्यांपासून ते सेलिब्रेटी सुद्धा याचाच विचार करत आहेत की, आकांक्षाने असे का केले असावे. (Akansha Dubey Suicide)
आकांक्षा ही भोजपुरी इंडस्ट्री मधील प्रसिद्ध नाव होते. तिने कमी वयात मोठे यश मिळवले होते. २१ ऑक्टोंबर १९९७ मध्ये जन्मलेली उत्तर प्रदेशातील मिर्जापुर येथील आकांक्षा वयाच्या तिसऱ्या वर्षी मुंबईत आली होती. लहानपणापासूनच तिला मॉडलिंग, डासिंग आणि अभिनयाची आवड होती. पण वडिलांचे स्वप्न तिला आयपीएस अधिकारी बनवण्याचे होते. तर आकांक्षाला एका आयपीएस अधिकाऱ्याच्या रुपात त्यांना तिला पहायचे होते. मात्र आकांक्षाचे स्वप्न हे वेगळे होते.
आकांक्षाचे अभ्यास लक्ष लागायचे नाही. डांसिंग आणि अभिनयात तिला आवड होती. तिला टीक टॉक आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळाली. तिचे व्हिडिओ काही मिनिटांतच खुप व्हायरल व्हायचे. तिचे इंस्टाग्रामवर १.७ मिलियन लोक फॉलोअर्स आहेत. सोशल मीडियात तिला अभिनय आणि मॉडेलिंगसाठी ऑफर आल्या होत्या. मुलीचे यश पाहता वडिल सुद्धा त्यासाठी मान्य झाले.
आकांक्षाने एका मुलाखतीत असे म्हटले होते की, तिने अवघ्या १७ व्या वर्षात भोजपुरी इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवले होते. परंतु सुरुवातीला काम करणे सोप्पे नव्हते. काही वेळेस नकाराचा सामना करावा लागता. तिने आशी तिवारी हिच्यासोबत काही सिनेमांमध्ये काम केले. पण तरीही तिला मनासारखे यश मिळाले नाही. त्यानंतर अभिनेत्रीने २०१८ मध्ये खुलासा केला की, ती डिप्रेशनच्या कारणास्तव सिनेमा जगताला गुडबाय करत आहे. परंतु आईने समजावल्यानंतर पुन्हा ती या इंडस्ट्रीमध्ये आली होती.(Akansha Dubey Suicide)
हे देखील वाचा- एआर रहमान यांनी ‘या’ कारणास्तव बदलले होते आपले मूळ नाव, धर्म ही बदलला
आकांक्षाने खेसारी लाल यादव आणि पवन सिंह यांच्यासह काही सुपरस्टार्स सोबत काम केले. ‘वीरो के वीर’ आणि ‘कसम पैदा करने वाले की २’ सारख्या सिनेमांव्यतिरिक्त काही म्युझिक व्हिडिओ मध्ये सुद्धा काम केले.