Home » फ्लाइटमध्ये एअर हॉस्टेस चहा-कॉफी का पीत नाहीत? जाणून घेऊयात काही सीक्रेट्स

फ्लाइटमध्ये एअर हॉस्टेस चहा-कॉफी का पीत नाहीत? जाणून घेऊयात काही सीक्रेट्स

by Team Gajawaja
0 comment
Air Hostess Secrets
Share

विमानातून प्रवास करणे ही आता एक सामान्य गोष्ट झाली आहे. तसेच अधिक वेळ खर्चिक न करता अत्यंत कमी वेळात एखाद्या ठिकाणी पोहचण्यासाठी आपण विमानाचा प्रवास करतो. परंतु बहुतांश लोक ही सातत्याने विमानाने प्रवास करत असतात. पण त्यांना फ्लाइट संबंधित काही सीक्रेट्स माहिती नसतात. अशातच तुम्हाला माहिती आहे का फ्लाइट्समध्ये ज्या एअर होस्टेस असतात त्या चहा किंवा कॉफी का नाही पीत? जाणून घेऊयात यामागील नक्की कायं कारण आहे.(Air Hostess Secrets)

विमानात चहा-कॉफी पिण्यास का नकार देतात फ्लाइट अटेंडेंट्स
काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात फ्लाइट अटेंडेंट Kat Kamalani हिने आपल्या टिकटॉकच्या अकाउंटवर व्हिडिओ शेअर केला होता. त्यात तिने असे म्हटले होते की, अशी कोणतीही गोष्ट ज्यासाठी गरम पाण्याची गरज भासते. जसे की, चहा, कॉफी, सूप. याचे कारण सुद्धा सांगत तिने म्हटले होते की, हे वॉटर टँक्स कधीच स्वच्छ केले जात नाहीत. ते टॉयलेटच्या बाजूलाच असतात. त्यामुळेच एअर हॉस्टेस या कधीच चहा किंवा कॉफी या कारणास्तव पीत नाहीत. कॅटचे असे म्हणणे होते की, त्या ऐवजी तुम्ही नेहमीच बॉटल किंवा कॅनमध्ये असलेले लिक्विड मागितले पाहिजे.

-आरोग्याची काळजी

या व्यतिरिक्त हॉस्टेस यांना आपल्या शरिरातील BMI कडे सुद्धा लक्ष द्यावे लागते. कारण त्यांना नोकरीवर घेताना त्यांना आरोग्यासंबंधित काही चाचण्या कराव्या लागतात. अशातच त्यांना रेग्युलर रुटीन चेकअप ही करावे लागते.

Air Hostess Secrets
Air Hostess Secrets

-विमानातून फिरण्याचे मिळतात पैसे
फ्लाइट अटेंडेंट्सचा पेमेंट तेवढेच असते जेवढ्या तासांचा त्यांचा विमान प्रवास असतो. म्हणजेच टेकऑफ ते लँन्डिंग पर्यंतचा जो कालावधी असतो तेवढाच वेळेचा त्यांना पेमेंट मिळतो. लँन्डिंग नंतर तुम्ही विमान रिकामे करण्यामध्ये वेळ घालवल्यास तर यामध्ये त्यांचेच नुकसान होते.

-टॅटू काढणे ठरु शकते धोकादायक
फ्लाइट अटेंडेंट्ससाठी टॅटू काढणे धोकादायक असू शकते. कारण फक्त काहीच अशा एअरलाइन्स आहेत ज्या त्यांना टॅटू काढण्याची परवानगी देते. त्याचसोबत परवानगी देणाऱ्या एअरलाइन्स त्यांना आपला टॅटू लपवण्यास ही सांगतात. कोणत्याही फ्लाइट अटेंडेंटचा टॅटू किंवा शरिरावरील पिअरसिंग हा प्रवाशाला दिसून नये असा नियम सुद्धा आहे.(Air Hostess Secrets)

हे देखील वाचा- अमेरिकेतील बेघर लोक कसे राहतात माहितेय का?

-उंची संदर्भात घ्यावी लागते काळजी
फ्लाइट अटेंड्सच्या भरतीवेळी नेहमीच उंची पाहिली जाते. तर एखाद्याची उंची ही लहान असेल तर तो अधिक यशस्वी होत नाही. तर या कामासाठी जास्त करुन ६ फूट ३ इंचाच्या लोकांना घेतले जाते.

-एअर होस्टेसची ग्रुमिंग फार महत्वाची
जर एखादा फ्लाइट अटेंडेट आपल्या ग्रुमिंगवर लक्ष देत नसेल तर त्याची नोकरी जाऊ शकते. फ्लाइट अटेंडेंट्सला नेहमीच स्वच्छ आणि अपटू बॉटम व्यवस्थित रहावे लागते. त्यांची केस नेहमीच बांधलेली असतात. त्याचसोबत कपडे हे व्यवस्थिती इस्री केलेलेच असले पाहिजेत. या व्यतिरिक्त महिलांना आपल्या केसांना विविध कलर करता येत नाही.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.