Home » AI चॅटबॉट तुम्हाला फसवू शकतात, वापरण्यापूर्वी ‘या’ गोष्टी जरुर वाचा

AI चॅटबॉट तुम्हाला फसवू शकतात, वापरण्यापूर्वी ‘या’ गोष्टी जरुर वाचा

by Team Gajawaja
0 comment
AI Chatbot
Share

टेक इंडस्ट्रीमध्ये चॅटजीपीटी, बिंग एआय आणि गुगल बर्ड यांनी क्रांती केली आहे. आर्टिकल लिहण्यासह इमेज जनरेट करण्यासाठी या एआय चॅटबॉट्सचा वापर केला जातो. मात्र या टूल्सवर डोळेबंद करुन विश्वास ठेवणे ठीक नाही. एका रिपोर्टनुसार, हे चॅटबॉट तुमच्याशी खोटं बोलू शकतो. हैराण करणारी गोष्ट असली तरीही खरी आहे. हे चॅटबॉट केवळ खोटं बोलत नाही तर बोलणे खरं करण्यासाठी फेक कंटेट सुद्धा जनरेट करतात. ही गोष्ट अशावेळी धोकादायक ठरु शकते जेव्हा चॅटबॉट्स काही गंभीर मुद्द्यांवर चुकीची माहिती पसरवतील. (AI Chatbot)

चॅटजीपीटी खोटं बोलतात, या गोष्टीचा शोध ब्रिटेनच्या डॉक्टर्सने घेतला. एका अभ्यासात चॅटजीपीटी प्लस आणि बिंगएआयचा समावेश केला. या दोन्ही चॅटबॉट जीपीटी-४ सोबत अपडेट झाले आहेत. या अभ्यासात चॅटबॉट्सला एकूण २५ प्रश्न विचारले गेले. हे प्रश्न ब्रेस्ट कॅन्सर संबंधित होते. परिणामी चॅटबॉट्सने १० पैकी एकाच प्रश्नाचे उत्तर योग्य दिले.

या व्यतिरिक्त एका रिसर्चमध्ये असे समोर आले की, चॅटबॉटने आपली गोष्ट सत्य करण्यासाठी बनावट पेपर तयार केले. त्यानुसार चॅटजीपीटी आणि बिंगएआयच्या ८८ टक्के उत्तरे सोप्प्या पद्धतीने समजली जाऊ शकतात. तर हे काही वेळेस विविध प्रकारचे उत्तरे ही देतात.

जर तुम्ही Google Bard चा वापर करत असालतर अधिक खुश होण्याची गरज नाही. ब्रिटेनच्या सेंटर फॉर काउंटरिंग डिजिटल हेटच्या रिपोर्टनुसार, बार्डने गुगलच्या मर्यादांचे उल्लंघन केले आहे. या चॅटबॉटने क्लाइमेट चेंजला फेटाळले आमि युक्रेन युद्धाला चुकीचे सांगितले. असे जवळजवळ १०० पैरी ७८ प्रकरणांमध्ये गुगल बार्डने चुकीची माहिती दिली. चॅट जीपीटी कोणत्याही माहितीसाठी सिंगल सोर्सवर निर्भर आहे. या गाइडलाइन्सच्या कारणास्तव काही वेळेस चुकीचे उत्तर दिले जाते. काही बार्डच्या प्रकरणी रिसर्चर्सने काही प्रश्नांमध्ये बदल केला ज्याची त्याने चुकीची उत्तरे दिली.(AI Chatbot)

हे देखील वाचा- हॅकर्स अशा प्रकारे करतात तुमच्या डेटाची चोरी, बचाव करण्यासाठी ‘या’ टीप्स पाहा

दरम्यान, चॅट जीपीटीला टक्कर देण्यासाठी गुगलने सुद्धा आपले एआय चॅटबोट बार्ड एआय मार्केटमध्ये लॉन्च केले आहे. याच्या कारणास्तव ओपन एआय चॅट जीपीटी आणि मायक्रोसॉफ्टच्या बिंग एआय मधील स्पर्धा वाढणार आहे. बार्डने रचनात्मक युक्त एआय लॉन्च केले आहे. दरम्यान, सध्या गुगलने ही सुविधा युएस आणि युकेमध्ये लॉन्च केली आहे. मात्र लवकरच अन्य देशांत सुद्धा सुरु होणार आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.