बॉलिवूडमधील अतिशय ओळखीचा चेहरा असलेली अभिनेत्री म्हणजे नेहा धुपिया (Neha Dhupia). नेहाने अनेक चित्रपटांमधून विविध भूमिका साकारत स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. मुख्य अभिनेत्रींसाठी कधीही आग्रहही नसलेल्या नेहाने नेहमीच भूमिका कोणती यापेक्षा त्या भूमिकेला आणि कथेला जास्त महत्व दिले. तिने तिच्या अभिनय प्रतिभेच्या जोरावर स्वतःला एक सशक्त अभिनेत्री म्हणून सिद्ध केले आहे. नेहाने २०१८ साली अभिनेता अंगद बेदीसोबत लगीनगाठ बांधली. नुकताच या दोघांनी त्यांच्या लग्नाचा चौथा वाढदिवस साजरा केला. नेहाचे लग्न इंडस्ट्रीमध्ये विविध कारणांनी खूपच गाजले. त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया नेहा आणि अंगदच्या लग्नासंबंधी अधिक माहिती.
नेहा धुपिया(Neha Dhupia) आणि अंगद बेदीने गुरुद्वारामध्ये १० मे २०१८ साली लग्न केले. नेहाने अचानक केलेल्या लग्नामुळे तिचे जवळचे मित्रमैत्रिणी देखील खूपच हैराण होते. नेहाच्या लग्नाची पुसटशी देखील कल्पना कोणालाच नसल्याने जेव्हा तिच्या लग्नाची बातमी समोर आली तेव्हा तिच्या चाहत्यांसोबतच सर्वाना सुखद धक्काच बसला. केवळ दोनच दिवसात त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. अंगदची इच्छा होती की, नेहा तिचे मन बदलण्याआधी त्याला तिच्याशी लग्न करायचे होते. त्यामुळे दोघांनी अतिशय सध्या पद्धतीने झटक्यात लग्न केले.

अंगदने एका मुलाखतीमध्ये त्याच्या आणि नेहाच्या पहिल्या भेटीबद्दल सांगितले होते, त्यात तो म्हणाला होती की, त्याने नेहाला(Neha Dhupia) पहिल्यांदा दिल्लीच्या एका जिममध्ये पाहिले होते, आणि तेव्हाच ठरवले की तो तिला मिळवणारच. त्यानंतर पुढे त्यांची एका मित्राच्या पार्टीमध्ये पुन्हा भेट झाली. या भेटीमध्ये अंगद नेहाला खूपच सज्जन व्यक्ती वाटला. पुढे हळू हळू त्या दोघांमध्ये मैत्री झाली आणि त्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्यांनी लग्न केले.
====
हे देखील वाचा- पहिल्याच हिंदी सिनेमात आईची भूमिका साकारणार ‘ही’ साऊथची सुपरस्टार अभिनेत्री
====
नेहाने(Neha Dhupia) मुलाखतीमध्ये सांगितले की, अंगदचे नेहासाठी असलेले प्रपोजल खूपच वेगळे आणि सर्वाना आवडणारे होते. अंगदने नेहासोबत लग्न करण्याची इच्छा थेट तिच्या आईवडिलांकडे बोलून दाखवली आणि त्यांच्याकडे तिच्याशी लग्नासाठी परवानगी मागितली. नेहा म्हणाली, “मला याबद्दल काही माहित नव्हते. मी तेव्हा दुसऱ्या कोणाला डेट करत होती. जेव्हा अंगद माझ्या बॉयफ्रेंडला भेटला तेव्हा तो त्याच्यासोबत खूपच कम्फरटेबल होता. मात्र त्याला माझ्या मनात माझ्या बॉयफ्रेंडबद्दल असलेल्या प्रेमावर शंका होती.”

नेहा आणि अंगदच्या लग्नासाठी दोघांच्याही घरच्यांनी होकार दिला. लग्नासाठी दोन्ही कुटुंबातील जवळच्या व्यक्ती दिल्लीला गेल्या. त्यानंतर त्यांनी दिल्लीमधील एका गुरुद्वारामध्ये लग्न केले. या लग्नामध्ये नेहा(Neha Dhupia) आणि अंगद या दोघांच्या अगदी मोजक्या आणि जवळच्या मित्रांना आमंत्रण देण्यात आले होते. लग्नानंतर जेव्हा सोशल मीडियावर नेहाने लग्नाची बातमी सांगितली तेव्हा इंडस्ट्रीसोबतच तिचे फॅन्स देखील शॉक झाले होते. एका मुलाखतीमध्ये नेहाने सांगितले की, “सोशल मीडियावर लग्नाबद्दल सांगितल्यावर मी माझा फोन पाहिला तेव्हा मला जवळपास ६०० मेसेज आले होते, मात्र कोणीही लग्न केल्याबद्दल शुभेच्छा दिल्या नव्हत्या . आमच्या लग्नाबद्दल जाणून घेण्यासाठी सर्वच उत्सुक होते. आमच्या लग्नानंतर लोकांनी अनेक अफवा पसरवल्या, माझ्याबद्दल अनेक गोष्टी बोलल्या गेल्या. अनेकांनी म्हटले की, ‘मुलापेक्षा मुलगी मोठी आहे.’

मात्र नेहा आणि अंगदने याकडे कधीच लक्ष दिले नाही. त्यांनी त्यांचे लग्न यशस्वी केले. आज नेहा(Neha Dhupia) आणि अंगद एक मुलगा आणि एका मुलीचे आईबाबा असून त्यांच्या आयुष्यात खुश आहे. मीडियामधील रिपोर्ट्सनुसार नेहा लग्नाच्याआधीच प्रेग्नेंट झाल्याने त्यांनी एवढ्या घाईमध्ये लग्न केल्याचे म्हटले जाते.