अफगाणिस्तानमध्ये मार्च 2001 मध्ये झालेल्या एका घटनेनं अवघं जग हळहळलं होतं. बामियानमधील 1500 वर्षे जुन्या गौतम बुद्धांच्या महाकाय मूर्तींवर बॉम्बस्फोट होत होते. पुज्य असा हा ऐतिहासिक वारसा फक्त धर्माच्या नावाखाली नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. अफगाणिस्तानमधील तत्कालीन तालिबान सरकारला हा वारसा जतन करा, बुद्ध मुर्तींना नष्ट करु नका, असे आवाहन तेव्हा जगभरातून कऱण्यात येत होते. (Afghanistan)
मात्र या सर्वांकडे दुर्लक्ष करीत तालिबानने बामियान खोऱ्यातील 55 मीटर आणि 38 मीटर उंचीच्या दोन महाकाय बुद्ध मूर्ती नष्ट केल्या. या मुर्ती तिसऱ्या ते पाचव्या शतकातील बौद्ध मठ आणि गुहांचा एक भाग होत्या. या मुर्ती गैर-इस्लामी असल्याचे सांगत तालिबान शासकांनी आपल्या कृतीचे समर्थन केले होते. या घटनेला आता 24 वर्ष होत आहेत. आत्ताही अफगाणिस्तानमध्ये तालिबान सरकार आहे. मात्र या 24 वर्षात त्यांच्यात बदल झाला आहे. ज्या बुद्धाच्या मुर्ती त्यांनी तोडल्या होत्या, त्या आता जपल्या पाहिजेत, याची जाणिव त्यांना होऊ लागली आहे. त्यासाठी तालिबान सरकार पावलेही उचलत आहे. मुख्य म्हणजे, अफगाणिस्तानमधील गैर-इस्लामी वारसा जतन केला पाहिजे, याची जाहीर कबुली या तालिबान सरकारनं दिली आहे. यामागे दोन मुख्य उद्देश आहे. या मुर्ती तोडल्या तरी त्या बघण्यासाठी अनेक परदेशी भाविक आणि अभ्यासक बामियान भागात जातात. (International News)
यासर्वांकडून तालिबान सरकार भरपूर पैसा वसूल करते. अफगाणिस्तानच्या अर्थव्यस्थेला सावरायचे असले तर पर्यटन हा चांगला पर्याय ठरु शकतो, याची जाणीव आता तालिबान सरकारला झाली आहे. शिवाय अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारला आंतरराष्ट्रीय मान्यता हवी आहे, त्यामुळे तालिबान सरकार अशापद्धतीनं सकाररात्मक निर्णय घेत असल्याचीही चर्चा आहे. पण या सर्वांतून बामियान आणि अफगाणिस्तानच्या अन्य भागून मिळालेल्या पुरातन वस्तू जतन केल्या जातील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. मार्च 2001 मध्ये अफगाणिस्तानातील बामियान तालिबान सरकारनं संपूर्ण जगाला आपले आक्रमक रुप दाखवले होते. अनेक बॉम्ब तेथील दोन महाकाय अशा बौद्ध मुर्तींवर फोडण्यात येत होते. त्यातून या मुर्ती नष्ट झाल्या. मात्र आता या तोडलेल्या मुर्तीच तालिबान सरकारसाठी आधार होत आहेत. (Afghanistan)
बामियानमधील 1500 वर्षे जुन्या गौतम बुद्धांच्या महाकाय मूर्तींवर बॉम्बस्फोट केला, त्याच मुर्तींच्या अवशेषांचे जतन करण्याचा दावा सध्याचे तालिबान सरकार करत आहे. यासाठी नुकतेच तालिबान सरकारनं एक निवेदन जाहीर केले आहे. त्यात अफगाणिस्तानच्या ऐतिहासिक स्थळांचे आणि वारशाचे रक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे म्हटले आहे. येथील ऐतिहासिक स्थळे ही देशाच्या संस्कृतीचा भाग असल्याची जाणीवही तालिबानला झाली आहे. यासोबत पूर्व अफगाणिस्तानातील लगमान प्रांतात 2000 वर्षे जुन्या कुशाण साम्राज्यातील ब्राह्मी लिपीतील काही कलाकृती सापडल्या आहेत. त्यात भांडारगृहासारख्या रचना आणि शिलाही आहेत. या भागात झालेल्या उत्खननानुसार या सर्व गोष्टी बौद्ध धर्माशी संबंधित आहेत. आता या सर्वांना जतन करण्यासाठी तालिबान सरकार आंतराष्ट्रीय समुदयाकडे मदत मागत आहे. (International News)
तालिबान सरकारनं यासंदर्भात माहिती देतांना सांगितले आहे की, अफगाणिस्तानला 5000 वर्षाचा इतिहास आहे. अफगाणिस्तानच्या विविध भागात होत असलेल्या उत्खननातून हे स्पष्ट होत आहे. या सर्व वारशाला जतन करणे गरजेचे असल्याचे तालिबन सरकारचे मत आहे. यापूर्वी डिसेंबर 2021 मध्ये तालिबानने अफगाण राष्ट्रीय संग्रहालयाचे दालन पुन्हा एकदा उघडले होते. 2022 मध्ये ‘मेस आयनाक’ या ऐतिहासिक बौद्ध स्थळाचे जतन करण्यासाठी आगा खान ट्रस्टची मदतही मागितली आहे. पूर्व अफगाणिस्तानातील लगमन प्रांतातील गौवर्जन गावातील खडकांमध्ये बनवलेले पोकळ भाग हे पर्यटकांना आकर्षित करतात. येथे 2000 वर्षे जुन्या कुशाण साम्राज्याच्या खुणा बघता येतात. हे खडकाळ खड्डे कुशाण साम्राज्याचे भांडार असल्याचे म्हटले जात आहे. (Afghanistan)
========
हे देखील वाचा : Maharashtra: असं मिळालं आपल्या राज्याला महाराष्ट्र हे नाव
Malcha Mahal : बेगम विलायतचा आत्मा असलेल्या हॉन्टेड ‘मालचा महल’
========
हजारो वर्षापूर्वी गोबी वाळवंटापासून गंगा नदीपर्यंत हे कुशाण साम्राज्य पसरलेले होते. त्यामुळे यामध्ये भारतीय इतिहासाच्या खुणाही पहाता येतात. या गौवर्जन गावात पर्यटनसंदर्भात योजना करण्याचा तालिबान सरकारचा विचार आहे. पर्यटनातून आर्थिक विकासाचीही योजना आहे, शिवाय आंतरराष्ट्रीय समुदायात सामिल होण्याचा हा सोप्पा मार्ग असल्याचे तालिबान सरकारचे मत आहे. अर्थात उद्देश कुठलाही असो, एकेकाळी ज्या गौतम बुद्धाच्या मुर्ती तालिबानने तोडल्या होत्या, आता त्याच बुद्धाच्या मुर्तींना शरण जाण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. (International News)
सई बने