Home » शंकराचार्य डोंगर की तख्त ए सुलेमान

शंकराचार्य डोंगर की तख्त ए सुलेमान

by Team Gajawaja
0 comment
Adyaguru Shankaracharya Temple
Share

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आणि त्यासोबत एक-एक वादही सुरु झाले आहेत. याला सुरुवात झाली ती नॅशनल कॉन्फरन्सच्या निवडणूक जाहीरनाम्यातून. या जाहीरनाम्यात श्रीनगरमधील प्रसिद्ध आद्यगुरु शंकराचार्य डोंगराचे नाव बदलून ते तख्त ए सुलेमान करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. आद्यगुरु शंकराचार्य यांचे सुंदर मंदिर या डोंगरावर आहे. या मंदिराला हजारो वर्षापूर्वीचा इतिहास आहे. स्वतः शंकराचार्य येथे काही काळ वास्तव्याला होते, असा लेखी पुरावा आहे. या शंकराचार्य मंदिराप्रती हजारो हिंदू भाविकांमध्ये श्रद्धा आहे. असे असतांनाही नॅशनल कॉन्फरन्सच्या निवडणूक जाहीरनाम्यात या डोंगराचेच नाव बदलण्याचे आश्वासन दिल्यामुळे गदारोळ उडाला आहे. जम्मू काश्मीरची निवडणूक जाहीर होऊन काही दिवसच झाल्यावर ही धार्मिक ठिणगी टाकल्यानं संतप्त भावना व्यक्त होत आहेत. नॅशनल कॉन्फरन्सच्या जाहीरनाम्यातील या मुद्दयाला जनतेकडूनही आक्षेप घेण्यात येत आहे. सोबत भाजपाच्या अनेक नेत्यांनी या मुद्यावर आपली तीव्र नापसंती नोंदवली आहे. (Adyaguru Shankaracharya Temple)

नॅशनल कॉन्फरन्सच्या जाहीरनाम्यात शंकराचार्य डोंगराचे नाव बदलून तख्त-ए-सुलेमान असे करण्यात येईल हे आश्वासन दिल्यामुळे जम्मू काश्मिरच्या निवडणुकीत पुन्हा एकदा धार्मिक मुद्दा पेटला आहे. हा प्रसिद्ध डोंगर श्रीनगर जिल्ह्यात आहे. या डोंगराच्या शिखरावर हिंदू धर्मियांचे आद्यगुरु शंकराचार्य यांचे मंदिर आहे. हे शंकराचार्य मंदिर हे भगवान शंकराला समर्पित आहे. काश्मीर खोऱ्यातील सर्वात जुने मंदिर म्हणून या मंदिराची ओळख आहे. या मंदिराचेच अस्तित्व पुसण्याचा हा डाव असल्याची ओरड आता सुरु झाली आहे. (Adyaguru Shankaracharya Temple)

जम्मू-काश्मीरमधील ९० विधानसभा मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे. नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसने निवडणुकीसाठी आघाडी जाहीर केली आहे. मात्र त्याआधी नॅशनल कॉन्फरन्सने आपला जाहीरनामा प्रकाशित करत श्रीनगरच्या सर्वात जुन्या शंकराचार्य डोंगराचे नाव बदलण्याचे आश्वासन दिले आहे. आता शंकराचार्य डोंगराच्या नामांतराच्या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्षाने काँग्रेसला कोंडीत पकडले आहे. सोबतच श्रीनगरमधील जनतेनंही यावर आक्षेप घेतला आहे. त्यामुळे काश्मिरमधील सर्वात सुंदर मंदिर म्हणून उल्लेख होत असलेले शंकराचार्य मंदिर पुन्हा चर्चेत आले आहे.
शंकराचार्य डोंगर आणि त्यावरील शंकराचार्य मंदिर याला पुरातन इतिहास आहे. पौराणिक ग्रंथांमध्येही या डोंगराचा उल्लेख आहे. ‘राजतरंगिनी’ नावाच्या संस्कृत ग्रंथात या डोंगराचा उल्लेख आहे. त्यानुसार राजा गोपादित्याने आर्यदेशातून आलेल्या ब्राह्मणांना या डोंगरावरील मोकळी जमीन दिली होती. राजा गोपादित्यानी ३७१ ईसापूर्व येथे ज्येष्ठेश्वर मंदिर बांधले. जम्मू काश्मीर पर्यटन विकास महामंडळाच्या सांगण्यानुसार, शंकराचार्य डोंगरावरच्या या मंदिराचे पुढे मौर्य वंशातील सम्राट अशोकाने नव्यानं विस्तार केला. (Adyaguru Shankaracharya Temple)

भव्य अशा या मंदिरामध्ये आद्यगुरु शंकराचार्य यांनी ८ व्या शतकात भेट दिली होती. तेव्हा शंकराचार्य सनातन धर्माचे पुनरुज्जीवन करण्यासाठी काश्मीरमध्ये गेले होते. त्यावेळी या डोंगरावर बांधलेल्या मंदिरात ते काही काळ थांबले. या डोंगरावरच आदि शंकराचार्यांना ज्ञानप्राप्ती झाल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे या मंदिराला शंकराचार्य मंदिर असेही नाव पडले. हे मंदिर अतिशय सुंदर अशा परिसरात आहे. मंदिर श्रीनगर शहरापेक्षा १,१०० फूट उंचीवर आहे. येथे जाण्यासाठी सुमारे २४० मीटरचे अंतर चढून पार करावे लागते. (Adyaguru Shankaracharya Temple)

======

हे देखील वाचा : कृष्ण जन्माष्टमीची माहिती आणि पूजा मुहूर्त

=======

आता या मंदिराच्या परिसराला तख्त ए सुलेमान नाव देण्याचा अट्टहास नॅशनल कॉन्फरन्सचा का ते पाहूया. मुस्लिम धर्मियांनुसार सुलेमान नावाचा इस्लाम धर्माचा अनुयायी आपल्या अनुयायांसह या डोंगरावर गेल्याचा उल्लेख आहे. त्यामुळेच या डोंगराला तख्त ए सुलेमान नाव देण्यात यावे अशी मागणी आहे. आता नॅशनल कॉन्फरन्सनं याच मागणीचा आपल्या जाहिरनाम्यात समावेश करुन काश्मिरमध्ये धार्मिक तेढ निर्मांण करायचा प्रयत्न केला आहे.
शंकराचार्य मंदिर हे पुरातत्व स्मारक, स्थळे आणि अवशेष कायदा, १९५८ अंतर्गत राष्ट्रीय संरक्षित स्मारक आहे. भारतीय पुरातत्व विभागाद्वारे मंदिराची देखभाल करण्यात येते. द्वारे त्याची देखभाल केली जाते. २०१३ मध्ये याच विभागानं शंकराचार्य डोंगराचे नाव बदलून ‘तख्त-ए-सुलेमान’ केल्याची अफवा उठली होती. त्यानंतर श्रीनगरमध्ये मोठा विरोध झाला. आता पुन्हा तेच मंदिर चर्चेत आले आहे. (Adyaguru Shankaracharya Temple)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.