Home » अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला करणार नौसेनेचे नेतृत्व

अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला करणार नौसेनेचे नेतृत्व

by Team Gajawaja
0 comment
Admiral Lisa Franchetti
Share

अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एक महिला नौसेनेची अधिकारी झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी या पदासाठी एडमिरल लिसा फ्रैंचेटी यांची निवड केली आहे. सीएनएनच्या रिपोर्टनुसार, लिसा फ्रैंचेटी या अमेरिकन नौसेनेच्या इतिहासात हे पद सांभाळणाऱ्या पहिल्याच महिला असणार आहे. या व्यतिरिक्त ती संयुक्त चीफ ऑफ स्टाफमध्ये सुद्धा त्या पहिल्या महिला असणार आहे. (Admiral Lisa Franchetti)

फ्रैंचेटीला १९८५ मध्ये कमीशन करण्यात आले होते. सध्या ती नौसेनेच्या संचालनाच्या उप-प्रमुखच्या रुपात कार्यरत आहे. फ्रैंचेटीच्या बायोग्राफीनुसार त्यांनी अमेरिकेतील नौसेनेच्या फोर्सेस कोरियाचे कमांडर, डेवलपमेंट ऑफ वॉरसाठी नौसेना संचालनाचे उप-प्रमुख आणि संयुक्त स्टाफची रणनिती, प्लॅन आणि पॉलिसीच्या निर्देशकाच्या रुपात कार्य केले होते. त्यांनी दोन कॅरियर स्ट्राइक ग्रुपची सुद्धा कमान सांभाळली आहे आणि सप्टेंबर २०२२ मध्ये वाइस सीएनओ झाली.

जो बायडेन यांनी नुकतीच अशी घोषणा करत म्हटले, आपल्या पुढील नौसेना संचालनाच्या प्रमुख पदी एडमिरल लिसा फ्रैंचेटी या एक कमीशन अधिकाऱ्याच्या रुपात आपल्या देशात ३८ वर्षांपर्यत सेवा देतील. नौदल ऑपरेशन्सचे उपप्रमुख म्हणून त्यांची सध्याची भूमिका असणार आहे. बाइडेन यांनी असे सुद्धा म्हटले युएस फ्लीट फोर्सेज कमांडचे डिप्टी कमांडर वाइस एडमिरल जेम्स किल्बी यांना पुढील वाइस सीएनओच्या रुपात नॉमिनेट करत आहेत. तसेच युएस पॅसिफिक फ्लीटचे कमांडर एडमिरल सॅम्युअल पापारो यांना इंडो-पॅसिफिक कमांडच्या कमांडर रुपात प्रशांत क्षेत्रात अमेरिकन सैन्याचे नेतृत्व करण्यासाठी नॉमिनेट करत आहे.

सीएनएनने बाइडेन यांच्या हवाल्याने असे म्हटले की, फ्रैंचेटी यांनी आपल्या करियरमध्ये नेहमीच उत्तम कामगिरी केली आहे. त्या संयुक्त राज्य अमेरिकेच्या नौसेनात फोर-स्टार एडमिरलच्या पद मिळवणाऱ्या पहिल्याच महिला आहेत. त्या नौसेना संचालन प्रमुख आणि संयुक्त चीफ ऑफ स्टाफच्या रुपात सेवा देणाऱ्या पहिल्या महिलेच्या रुपात पुन्हा इतिहास रचतील.

अमेरिकन संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांनी कौतुक करत असे म्हटले की, प्रत्येक एडमिरल हे सुनिश्चित करेल की, आपल्या अमेरिकन नौसेना आणि इंडो-पेसिफिक मध्ये संयुक्त सैन्य हे इंडो-पॅसिफिकमध्ये आतापर्यंतचे सर्वोत्तम लष्करी बल राहिले आहे आणि जगभरात शक्ती प्रदर्शन करतील. (Admiral Lisa Franchetti)

हेही वाचा- सॅम मानेकशॉ यांच्या नेतृत्वाखाली १९७१ मध्ये जेव्हा भारताने पाकिस्तानला गुडघे टेकण्यास भाग पाडले

एडमिरल लिसा फ्रैंचेटी कोण?
एडमिरल लिसा फ्रैंचेटी न्यूयॉर्क मधील रोचेस्टर मधील स्थानिक निवासीआहेत. ज्यांना १९८५ मध्ये नॉर्थवेस्ट युनिव्हर्सिटीत नेवल रिजर्व ऑफिसर ट्रेनिंग कोर प्रोग्रामच्या माध्यमातून अमेरिकेतीन नौसेनेत नियुक्त केले होते. नेवल वॉर कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यापूर्वी त्यांनी नॉर्थवेस्ट युनिव्हर्सिटीमधून पत्रकारितेत सायन्स ग्रॅज्युएटची डिग्री मिळवली होती. अमेरिकेतील संरक्षण विभातील त्यांच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यसास तर एडमिरल लिसा फ्रैंचेटी यांनी फीनिक्स युनिव्हर्सिटीतून ऑर्गेनाइजेशनल मॅनेजमेंटमध्ये मास्टर डिग्री सुद्धा घेतली आहे. त्याचसोबत सर्विसदरम्यान डिफेंस डिस्टिंग्विस्ड सर्विस मेडल, डिफेंस सुपीरियर सर्विस मेडल, लीजन ऑफ मेरिट, मेरिटियस सर्विस मेडल,नेवी अॅन्ड मरीन कॉर्प्स कमांडर मेडल आणि नेवी आणि मरीन कॉर्प्स अचीवमेंट मेडल सुद्धा मिळाले आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.