Home » Shefali Jariwala: ‘कांटा लगा’ फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाचे धक्कादायक निधन

Shefali Jariwala: ‘कांटा लगा’ फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाचे धक्कादायक निधन

by Jyotsna Kulkarni
0 comment
Shefali Jariwala
Share

मनोरंजनविश्वातून एक दुःखद बातमी येत आहे. मॉडेल आणि अभिनेत्री शेफाली जरीवालाचे निधन झाले आहे. शेफालीच्या निधनामुळे तिच्या फॅन्ससोबतच, इंडस्ट्रीमधील कलाकारांना देखील मोठा धक्का बसला आहे. वयाच्या ४२ व्या वर्षी कार्डियक अरेस्टमुळे शेफाली जरीवालाचे निधन झाले. शेफालीच्या निधनाची माहिती समोर येताच मनोरंजनविश्वात एकच खळबळ माजली आहे. सध्या मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील अंधेरी लोखंडवाला परिसरात शेफाली राहायची. (Shefali Jariwala)

२७ जून रोजी रात्री ११ च्या सुमारास अभिनेत्री शेफालीला अचानक काही त्रास जाणवू लागला आणि ती गंभीर आजारी पडली. शेफालीला छातीत दुखू लागल्याने तिचा पती आणि अभिनेता पराग त्यागी याने तिला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र रुग्णालयात पोहोचताच शेफालीला मृत घोषित करण्यात आले. सध्या तिचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी कूपर रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. आता सर्वांना शेफालीच्या मृत्यूबद्दल अधिक माहिती आणि कुटुंबाकडून अधिकृत निवेदनाची प्रतीक्षा आहे. ‘कांटा लगा गर्ल’ म्हणून शेफाली जरीवाला कमालीची प्रसिद्ध होती. तिने ‘मुझसे शादी करोंगी’ चित्रपटात अक्षय कुमार आणि सलमान खानसोबत काम केले होते. (Marathi News)

प्रसिद्ध पत्रकार असलेल्या विकी लालवाणी यांनी शेफाली जरीवालाच्या निधनाची बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे. विकी ललवाणी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, शेफालीला तिच्या पती आणि इतर तिघांनी मिळून बेलेव्ह्यू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नेले. हॉस्पिटलमधील एका कर्मचाऱ्यांनी शेफालीचा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले आहे. (Todays Marathi HEadline)

Shefali Jariwala

दरम्यान शेफाली जरीवालाबद्दल सांगायचे झाले तर, २००२ मध्ये ‘कांटा लगा’ या अल्बममधील गाणे रिलीज झाले आणि या गाण्यानंतर तिला अफाट लोकप्रियता मिळाली. अगदी रातोरात ती प्रसिद्ध झाली. या गाण्यात शेफाली जरीवालाचा बोल्ड लूक पाहायला मिळाला होता. शेफाली जरीवालाचा जन्म १५ डिसेंबर १९८२ रोजी गुजरातमधील अहमदाबादमध्ये झाला होता. तिने कॉम्प्युटर अँप्लिकेशनमध्ये डिग्री संपादन केली होती. शेफाली जरीवाला तिच्या करियरमध्ये अनेक चित्रपटांमध्ये, रिअॅलिटी शोज, अल्बममध्ये काम केले. शेफालीने नच बलिए या डान्स रियॅलिटी शोच्या पाचव्या आणि सातव्या पर्वामध्ये सहभाग घेतला होता. यासोबतच २०१९ मध्ये ती बिग बॉस १३ मध्येही स्पर्धेक म्हणून सहभागी झाली होती. याशिवाय तिने २०१८ साली श्रेयस तळपदे सोबत अल्ट बालाजीच्या ‘बेबी कम ना’ या वेबसिरीजमध्ये देखील काम केले होते. (Latest Marathi NEws)

=========

हे देखील वाचा : Kolhapuri Chappal: इटालियन ब्रँडच्या कलेक्शनमध्ये कोल्हापुरी चप्पलला स्थान, भारतीय संतप्त

=========

शेफाली जरीवालाचे दोन लग्न झाले होते. तिचे पहिले लग्न २००४ मध्ये मीत ब्रदर्सचे संगीतकार हरमीत सिंग यांच्याशी झाले होते, परंतु २००९ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर २०१४ मध्ये शेफालीने अभिनेता पराग त्यागीशी लग्न केले. शेफालीला खूपच कमी वयात मोठे फेम मिळाले होते. तिचे फॅन्स देखील खूप होते. सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असणारी शेफाली कायम फॅन्सच्या संपर्कात असायची. शेफालीच्या निधनानंतर आता याबद्दल अधिक माहिती मिळेल याची प्रतीक्षा सर्वच करत आहे. (Social Updates)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.