तेलकट त्वचा असणाऱ्यांना पिंपल्सची समस्या खुप होते. प्रदुषण, अयोग्य खाण्यापिण्याची सवय, तणाव यासारख्या समस्या अधिक असतात. तर उन्हाळ्याच्या दिवसात सुद्धा येणाऱ्या घामामुळे ही समस्या अधिक वाढते. खरंतर घाम आल्याने धुळ ही त्वचेवर चिकटली जाते. अशातच धुळ तुमच्या पोर्समध्ये गेल्यास आणि ते बंद झाल्यानंतर तुम्हाला पिंपल्स, ब्लॅकहेड्स आणि व्हाइडहेड्सची समस्या होते. त्यामुळे त्वचेची काळजी घेण्याची फार गरज असते. तर तुम्ही सुद्धा पिंपल्सच्या समस्येमुळे त्रस्त असाल तर अशा काही टीप्स आहेत त्या वापरुन तुम्ही यापासून सुटका मिळवू शकता.(Acne remedies)
पिंपल्सच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी उपाय
-जर तुम्ही वर्कआउट, जिम किंवा कोणतीही अॅक्टिव्हिटी करुन आला असाल तर चेहरा लगेच धुवू नका. कारण तुमच्या चेहऱ्यावरील घामोळे येण्याची अधिक शक्यता असते. त्याऐवजी तुम्ही तुमचा घाम हा स्वच्छ टॉवेलने साफ करा. जवळजवळ १०-१५ मिनिटांनंतर तुमची त्वचा पाण्याने धुवा.
-आठवड्यातून कमीतकमी दोन वेळा स्क्रब चेहऱ्याला लावा. स्क्रब केल्याने तुमच्या चेहऱ्यावरील पोर्स साफ होतील आणि ब्लॅकहेड्स-व्हाइटहेड्सची समस्या ही दूर होईल. तसेच त्वचेतील तेलकटपणा ही नियंत्रात राहिल. तेलकट त्वचेवर पिंपल्सची समस्या अधिक होते.
-चेहऱ्यावर दररोज मेकअप करत असाल तर जेव्हा तुम्हाला घाम येते तेव्हा मेकअप लेअरिंगच्या कारणास्तव तुमचे पोर्स ब्लॉक होतात. अशातच पिंपल्सची समस्या येऊ शकते. त्यामुळे अधिक मेकअप करण्यापासून दूर रहा आणि अत्यंत लाइट प्रोडक्ट्सचा वापर करा.
-घाम येणाऱ्या चेहऱ्यावर त्याच त्याच टॉवेलने स्वच्छ केल्यास पिंपल्सचे कारण ठरु शकते. तुम्ही चेहऱ्यावर टॉवेल ऐवजी टिश्यू पेपरचा वापर करा. तसेच चेहऱ्यांवर केस वारंवार येणार नाहीत याची सुद्धा काळजी घ्या.
हे देखील वाचा- लांब आणि सुंदर नखंही असू शकतात तुमच्यासाठी हानिकारक, पण कसे?

पिंपल्स रोखण्यासाठी काय खाल्ले पाहिजे
काकडी
काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण हे अधिक असते. तसेच यामध्ये अँन्टीऑक्सिटेंड ही गुण असतात जे कोलेजन बूस्ट करण्यात मदत करतात. त्यामुळे तुमची त्वचा थंड राहते आणि आतमधून हायड्रेट ही होते.(Acne remedies)
केळं
केळं ही नॅच्युरल ब्युटी सीरम सारखे काम करते. खरंतर तुमच्या शरिरात पोटेशियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे सीबम अत्याधिक प्रमाणात येऊ शकते. अशातच केळ्यामध्ये सर्व पोषक तत्व असतात. त्याचसोत विटामिन ई सुद्धा भरपूर प्रमाणात असते जे त्वचेला आतमधून नॉरिश करण्यास मदत करते. यामध्ये असलेले अँक्टिबॅक्टिरियल गुण तेलकट त्वचेसाठी उत्तम मानले जातात.
-हिरव्या भाज्या
ब्रोकली, पालक सारख्या हिरव्या भाज्या ज्यामध्ये तेल किंवा फॅट नसते. त्यामुळे तुम्ही तुमच्या डाएटमध्ये याचा वापर करु शकता. पण तेलकट किंवा फॅट असणारे पदार्थ खाणे टाळा. हिरव्या भाज्यांमध्ये फायबर हे भरपूर प्रमाणात असे. त्यामुळे तुमच्या त्वचेला ग्लो येतोच पण हेल्दी राहण्यास ही मदत होते.