नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोची आकडेवारी सांगते की, भारतात प्रत्येक वर्षी अॅसिड हल्ल्याचे २५०-३०० प्रकरणे समोर येतात. वर्ष २०१९ ते २०२१ पर्यंत फक्त दिल्लीतच अशी २० प्रकरणे समोर आली आहेत. अशातच पुन्हा एकदा दिल्लीत १७ वर्षीय तरुणीवर काही तरुणांनी अॅसिड हल्ला केला. असे सांगितले जात आहे की, हे अॅसिड ऑनलाईन प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट येथून खरेदी केले होते. अशातच प्रश्न उपस्थितीत राहतो की, अखेर हे विक्री-खरेदी करण्यासंदर्भातील नक्की नियम काय आहेत? तसेच अशा घटनांवर आळा घालणे का शक्य होत नाहीयं? (Acid Attack)
खरंतर सुप्रीम कोर्टाने वर्ष २०१३ मध्ये अॅसिड विक्री करण्यासंदर्भात काही गाइडलाइन्स आणि कायदे सांगितले होते. त्याला पॉइजन अॅक्टमध्ये सहभागी केले होते. तर परवानाशिवाय ते विक्री करण्यात बंदी आहे. अशातच विक्री करणाऱ्यांकडे परवाना असणारच. मात्र ऑनलाईन प्लॅटफॉर्म बद्दल बोलायचे झाल्यास तर येथे सुद्धा रजिस्ट्रर परवाना असलेले विक्रेतेच या ठिकाणी विक्री करु शकतात. मात्र ई-कॉमर्स कंपन्यांनी त्या विक्रेत्यांचा परवाना घेतला आहे की नाही ही जबाबदारी त्यांची असणार आहे.
जाणकरांच्या मते, ई-कॉमर्स पोर्टलवर विक्री करण्यात येणारे अत्यंत खतरनाक अॅसिड जसे सल्फ्युरिक अॅसिड, नाइट्रिक अॅसिड संदर्भात काही खास नियम नाहीत. पण काही दुकानदारांना ते विक्री करण्यासंदर्भातील नियम पाळणे फार महत्वाचे असते.

विक्रेत्याने हे काम करणे गरजेचे
-विक्रेता ज्या कोणत्याही ग्राहकाला अॅसिडची विक्री करत आहे, त्याचा फोटो जरुर घ्यावा
-एक रजिस्ट्रेशन वही तयार करुन त्यात खरेदी करणाऱअया व्यक्तीच्या नावासह तारीख ही लिहावी
-अॅसिड खरेदी करण्याचे कारण ही ग्राहकाला विचारावे आणि ते रजिस्ट्ररेशन वहीत सुद्धा लिहावे
-जो दुकानदार या नियमांचे उल्लंन करेल त्याच्यावर ५० हजारांचा दंड लागू शकतो
ई-कॉमर्स वेबसाइटला नोटीस धाडली
दिल्लीच्या ज्या परिसरात ही घटना घडली तेथील डीसीपी एम हर्ष वर्धन यांनी फ्लिपकार्टला या संदर्भातील एक नोटीस धाडली आहे. त्यांनी त्यात अॅसिड विक्रेत्याची माहिती मागितली आहे. त्याचसोबत आरोपींनी कोणत्याही वेरिफिकेशन व्यतिरिक्त कसे अॅसिड खरेदी केले? (acid Attack)
हे देखील वाचा- सोशल मीडियात फोटो पोस्ट करण्यापूर्वी सावधान! अवघ्या काही सेकंदात Fake Photo बनवू शकतो AI
पूर्पपणे बंदी घालणे मुश्किल
काही महिला संघटनांनी आणि राष्ट्रीय महिला आयोगाने याच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्याची मागणी केली आहे. मात्र बाजारातील तज्ञांचे असे म्हणणे आहे की, हे शक्य नाही. खरंतर अॅसिडचा उद्योग व्यवसायात वापर केला जातो. त्याचा वापर बाथरुम, टॉयलेट स्वच्छ करण्यासाठी ही केला जातो. अशातच विक्रीवर पूर्पपणे बंदी घालणे शक्य नाही. हेच कारण आहे की, सुप्रीम कोर्टाने त्यावर बंदी घालण्याऐवजी काही नियम काढले आहेत. खरंतर खुप लोकसंख्या आणि त्यांच्याकडे लक्ष ठेवणे शक्य नसल्याने हे असे करणे थोडे मुश्किलच आहे.