उन्हाळ्याच्या कडाक्यात थंडावा मिळावा म्हणून बहुतांश जण या ऋतूत एसी खरेदी करतात. किंवा ज्यांच्याकडे एसी आहे त्याचा सतत वापर केला जातो. परंतु आता पावसाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. या ऋतूत गरम्यासह शरिर चिकट झाल्यासारखे ही वाटते. (Ac use in monsoon)
खरंतर पावसाळ्यात ह्युमिडिटी वाढली जाते. अशातच उष्णतेपासून दूर राहण्यासाठी पंखा किंवा कुलर जरी लावला तरीही समाधान होत नाही, अशातच एसी लावला जातो. आता असा प्रश्न उपस्थितीत होतो की, पावसाळ्यात जर एसी वापरायचा असेल तर त्याचे तापमान किती ठेवले पाहिजे? पावसाळ्यात एसीचा वापर करणे आरोग्यासाठी धोकादायक तर नाही ना? याच बद्दल तज्ञ काय म्हणतात हे पाहूयात.
तज्ञ असे म्हणतात की, पावसाळ्यात उष्णता वाढली जाते. अशातच एसीचा वापर हमखास केला जातो. ह्युमिडिटी अधिक झाल्यास एसी हा ड्राय मोडवर वापरू शकतो. मात्र दीर्घकाळ असे करू नका. तापमानाबद्दल बोलायचे झाल्यास तर सर्वसामान्यपमे एसीचे तापमान 24-26 डिग्री सेल्सियस असावे. रात्रीच्या वेळी जर एसी तुम्ही लावू शकता. परंतु एसीचा अत्याधिक वापर करणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. एसी सुरु केल्यानंतर स्किनचा ओलसरपणा निघून जातो. त्यामुळे स्किन ड्राय होते. अशातच गरज असेल तरच एसीचा वापर पावसाळ्यात केला पाहिजे.
या व्यतिरिक्त कमी तापमानावर अधिक एसी ठेवल्यास तर सर्दी-खोकल्याची समस्या उद्भवू शकते. पावसाळ्यात बहुतांशजण भिजतात. त्यामुळे कपडे सुकावे म्हणून एसी लावला जातो. मात्र असे करणे आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकते. पावसाळ्यात भिजल्यानंतर नेहमीच स्वच्छ पाण्याने अंघोळ केली पाहिजे आणि व्यवस्थितीत अंग पुसून मॉइश्चराइजर लावले पाहिजे. पावसाळ्यात घाम आणि घाणीमुळे त्वचेवर फंगल इंन्फेक्शन होऊ शकते.या व्यतिरिक्त पावसाळ्यात डाएटकडे सुद्धा लक्ष द्यावे आणि हाइजिनची काळजी घ्यावी. कारण पावसाळ्यात साथीचे आजार होण्याची अधिक शक्यता असते. (Ac use in monsoon)
हेही वाचा- पावसाळ्यात अशी घ्या स्वत:च्या सुरक्षिततेची काळजी
पावसाळ्यात जर तुम्ही एसीचे तापमान ड्राय मोडवर ठेवण्यापूर्वी हे पहावे की, बाहेरचे तापमान कसे आहे. अन्यथा उष्णतेमुळे त्वचा चिकट होऊ शकते. खरंतर अॅडवान्स फिचर असणाऱ्या एसीमध्ये हा मोड दिला जातो. मात्र विंडोज एसी किंवा लोकल एसीमध्ये हा पर्याय दिला जात नाही. हे फिचर तुम्हालाHitachi, samsung, carrier, LG , Daikin सारख्या ब्रँन्डेड एसीमध्ये मिळतो. त्यामुळे तुमच्या खिशाला परवडेल असा एसी तुम्ही खरेदी करू शकता.