प्रत्येकाला परदेशात फिरण्याची इच्छा असते, परंतु अधिक खर्च होईल म्हणून आपण तेथे जाणे काही वेळेस टाळते. परंतु जेव्हा आपण एखाद्या स्मार्टफोनच्या किंमतीची तुलना आपल्या परदेशातील ट्रिपची केली तर ती काही वेळेस समानच असते. किंबहुना त्या पेक्षा की कमी पैशात परदेशातील टूर आपल्याला करता येते. अत्यंत बजेट फ्रेंडली ट्रिपचा आनंद घेण्यासाठी अशी काही ठिकाण आहेत जेथे तुम्ही ६० हजारांपेक्षा कमी पैशात फिरु शकता. तसेच परदेशात जाऊन तेथील निसर्गाचा, तेथील नागरिकांचा किंवा पर्यटन स्थळांचा नक्कीच आनंद घेता येईल.(Abroad trip)
-थायलंड
प्रत्येकालाच थायलंडला जावेसे वाटते. बहुतांश कपल्स हनिमु किंवा सुट्टी घालवण्यासाठी येथे जातात. थायलंड हा अतिशय सुंदर देश असून तेथे मोठ्या प्रमाणात सेलिब्रेटी सुद्धा आपली सुट्टी एन्जॉय करण्यासाठी येत राहतात. थायलंड मधील समुद्र किनारे, येथील लाइफस्टाइल ही पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करते. थायलंडची ट्रिप तुम्ही सहज ६० हजारांच्या आतमध्ये करु शकता. या देशासाठी तुम्हाला काही खिशाला परवडणारे टूर पॅकेजेस सुद्धा मिळतात.
-सिंगापुर
जर तुम्हाला वाटत असेल सिंगापुरला फिरायला जाणे फार महाग आहे, तर तसे अजिबात नाही. कारण येथे जाण्यापूर्वी तुम्ही व्यवस्थितीत प्लॅन कराल तर तुम्ही आरामात सिंगापुर हवे तसे एक्सप्लोर करु शकता. या कलरफुल देशात तुम्ही अवघ्या ४० हजारांमध्ये फिरु शकता. येथे येण्यासाठी विमानाची तिकिट ही २२-२५ हजारांच्या दरम्यान असते. येथे सुद्धा तुम्हाला विविध टूर पॅकेजेस मिळतात. त्यामुळे तुम्ही सिंगापुरच्या ट्रिपचा प्लॅन करत असाल तर नक्कीच या देशाला भेट द्या.
हे देखील वाचा- इच्छा असूनही ‘या’ समुद्रात बुडू शकत नाही कोणतीही व्यक्ती, कसं काय?
-दुबई
दुबईतील युएई हे सर्वाधिक प्रसिद्ध शहर आहे. तुम्ही टेलिव्हिजन किंवा इंटरनेटवर पाहिले असेल की , दुबईत फिरण्यासाठी खुप ठिकाणं आहेत. दुबई म्हटलं की, श्रीमंतांचा देश असे सहज म्हटले जाते. मात्र भारतासोबतचे दुबईचे संबंध उत्तम असल्याने तुम्हाला वीजा सहज मिळतो. दुबईत येणारे बहुतांश पर्यटक हे साइट-सीइंग करतात. जर तुम्ही एकट्याने दुबईत फिरायचे म्हटले तर तुम्हाला ३५-४० हजारांमध्ये खर्च येऊ शकतो. खरंतर दुबईत येण्यासाठी जर तुम्ही वीजासाठी अर्ज केला असेल तर तो तुम्हाला ४-५ दिवसांमध्ये मिळतो. ३० दिवसांचा वीजा ५८ दिवसांसाठी वॅलिड असतो. त्यासाठी तुम्हाला ६ हजारादरम्यान पैसे मोजावे लागतात.(Abroad trip)
-मलेशिया
मलेशियातील वातावरण आणि तेथील विविध ठिकाणांना भेट देणे हा अनोखा अनुभव आहे. कारण येथे फक्त तुम्हाला निसर्गाचा खेळच नव्हे तर अॅडव्हेंचर लव्हर्ससाठी तर हा देश पर्वणीच आहे. ते सुद्धा कमी खर्चात. या देशात तुम्ही अॅडवान्स बुकिंग केल्यास तुम्हाला त्याची सुरुवातीला एका दिवसाचा राहण्याचा खर्च हा ६०० रुपयांपर्यंत आहे. बिझनेस डिस्ट्रिक्टमध्ये तम्हाला जेवण हे ३०० रुपयांपर्यंत मिळते. मलेशियात येणाऱ्यांसाठी पब्लिक ट्रांन्सपोर्टेशन कार्ड तयार केले जाते. त्यासाठी तुम्हाला २१५० रुपये रिंगिट पर्यंत खर्च येतो. अशातच तुम्ही विमानाचे तिकिट ही अॅडवान्समध्ये बुक केल्यास तुम्हाला ते कमी खर्चात मिळू शकते.