ठाकरे सरकारकडून बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रामुख्यानं तुकाराम मुंढे यांच्या नावाचा समावेश आहे. नागपूरचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची मुंबईत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे. मुंढे यांच्या बदलीनंतर आप आक्रमक झाली आहे. आज चार वाजता आम आदमी पार्टीकडून मुंढे यांच्या समर्थनार्थ आणि बदलीच्या विरोधात नागपुरात आंदोलन करणार आहेत. तुकाराम मुंढे यांना काही दिवसांपूर्वीच कोरोनाची लागण झाली असल्याने त्यांनी स्वतःला घरीच आयसोलेट केलं आहे.
राजकारण्यांच्या दबावापुढे न झुकता नियमानुसार काम करणे ही तुकाराम मुंढे यांची ओळख आहे. ज्या शहरात तुकाराम मुंढे आयुक्त म्हणून किंवा प्रशासकिय अधिकारी म्हणून गेले, तिथं त्यांना स्थानिक नगरसेवक आणि लोकप्रतिनिधींच्या विरोधाचा सामना करावा लागला आहे. नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी निवड झाल्यापासूनच मुंढे यांचे नगरसेवकांशी वाद सुरु झाला होता. सर्वपक्षीय नगरसेवकांचा तुकाराम मुंढे यांना विरोध होता.
मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच तुकाराम मुंढे यांच्या नावाला पंसती दिल्यामुळे महाविकासआघाडीतील नगरसेवकांना काही करता येत नव्हते. दरम्यान, नागपुरात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असताना तुकाराम मुंढे यांनी महापालिका आयुक्त म्हणून कडक निर्बंध घातले होते. मात्र यावरुनच महापौर आणि भाजप नेते संदीप जोशी यांच्याशी मुंढे यांचे तीव्र मतभेद पाहायला मिळाले.
44
previous post