Home » आधार कार्डवर ऐवढ्यावेळा करता येतो बदल

आधार कार्डवर ऐवढ्यावेळा करता येतो बदल

आधार कार्ड हे एक महत्त्वपूर्ण कागदपत्र सध्या झाले आहे. एका नवजात बाळापासून ते वयस्कर व्यक्तीचे आधार कार्ड तयार केले जाते. भारत सरकारने प्रत्येक भारतीय नागरिकाला आधार कार्ड अनिवार्य केले आहे.

by Team Gajawaja
0 comment
Aadhar Card Update
Share

आधार कार्ड हे एक महत्त्वपूर्ण कागदपत्र सध्या झाले आहे. एका नवजात बाळापासून ते वयस्कर व्यक्तीचे आधार कार्ड तयार केले जाते. भारत सरकारने प्रत्येक भारतीय नागरिकाला आधार कार्ड अनिवार्य केले आहे. बँकेत खाते सुरु करणे ते एलपीजी सिलिंडरवर सब्सिडी मिळवण्यासाठी आधार कार्डची गरज भासते. अशातच तुमच्या आधार कार्डच्या नावात अथवा पत्त्यात चुक असेल तर ती दुरुस्त करता येते. मात्र तुम्हाला माहितेय का, आधार कार्डवर नाव, पत्ता आणि वयात चुक झाल्यास किती वेळा बदलता येते? (Aadhar Card)

आधार कार्ड हे व्यक्तीच्या आयुष्यात एकदाच तयार केले जाते. ज्याला युआयडीएआय म्हणजेच भारतीय विशिष्ठ ओळख प्राधिकरण जारी करते. कोणताही व्यक्ती आपल्याकडे एकापेक्षा अधिक आधार कार्ड स्वत:कडे ठेवू शकत नाही. आधार कार्डावर १२ अंकी विशिष्ट संखअया असते. त्यामध्ये व्यक्ती संबंधित सर्व माहिती कळते. आधार कार्ड तयार करताना त्यात चुक झाल्यास ती आधार सेंटरमध्ये जाऊन सुधारता येते. मात्र आधार कार्डवर नाव, पत्ता आणि जन्मतारीख बदलण्यासाठी एक मर्यादा युआयडीएआयने तयार केली आहे.

किती वेळा बदलता येते नाव
युआयडीएआय आधार कार्ड धारक दोन वेळेस नावात बदल करता येते. आधार डेटात वारंवार बदल करता येत नाही. तर जन्मतारखेत एकदाच बदल होऊ शकतो. त्याचसोबत पत्त्यात बदल करायचा असेल तर त्यासाठी मर्यादा नाही. या व्यतिरिक्त लिंग बदल ही एकदाच केले जाऊ शकते.

नावात कसा कराल बदल?
आधार सेंटरमध्ये जाऊन आधार कार्डात बदल करता येऊ शकतो. तसेच युआयडीआयने ऑनलाईन पद्धतीने घरबसल्या आधार कार्डात बदल करण्याची सुविधा दिली आहे. यासाठी आधार कार्डधारकाला युआयडीएआयची अधिकृत वेबसाइट https://myaadhaar.uidai.gov.in/ येथे जाऊन लॉग इन करावे लागणारआहे. त्यानंतर नावात बदल करण्याचा ऑप्शन निवडावा आणि मागितलेली कादपत्र जोडावीत. त्यानंतर सबमिट करा आणि ओटीपी सेंडवर क्लिक करा. रजिस्टर फोनवर ओटीपी येईल. तेव्हा तुमचा अर्ज सबमिट होईल. अर्ज स्विकारल्यानंतर अपडेट आधार कार्ड तुम्ही ऑनलाईन डाउनलोड किंवा हार्ड कॉपी सुद्धा काढू शकता. (Aadhar Card)

हेही वाचा- UIDAI कडून आधार कार्ड नागरिकांसाठी अलर्ट जाहीर, फसवणूकीबद्दल दिला ‘हा’ सल्ला

तसेच आधार कार्डवर डिजिटल स्वाक्षरी करणे फार गरजेचे आहे. कारण स्वाक्षरीशिवाय आधार कार्ड अधिकृतरित्या वापरता येत नाही. यामुळेच आपल्या आधार कार्डवरील डिजिटल स्वाक्षरी जरुर वेरिफाय करुन घ्या. ही स्वाक्षरी पूर्णपणे वॅलिड मानली जाते. आधार कार्डवरील डिजिटल स्वाक्षरी ही UIDAI द्वारे मान्य केलेली असते.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.