दुबई मध्य पूर्वेतील या शहराला भेट देण्याचे अनेकांचे स्वप्न असते. या स्वप्नवत शहरात राहण्याची संधीही अनेकजण शोधत असतात. जगभरातील अनेक गर्भश्रीमंत लोक या दुबईमध्ये स्वतःसाठी एकतरी घर घेतात. दुबईमध्ये घर असणे हे स्टेटस सिंबॉल मानले जाते. भारतातील बहुतांश सिनेक्षेत्रातील अभिनेत्यांची घरे दुबईला आहेत. अनेक उद्योगपतीही दुबईतील घरांचे मालक असून सुट्टीमध्ये या दुबईतील अलिशान घरांना त्यांची पसंती असते. या दुबईमधील ही अलिशान घरे सर्व सुविधांनी युक्त अशी असतातच सोबतच त्यातील सजावटही सर्वसामान्यांना चकीत करेल अशीच असते. त्यामुळेच त्यांच्या किंमती किती याची चौकशी करायची नसते. कारण या किंमतीमध्ये भारतामध्ये एक घर काय पण अख्खी बहुमजली इमारत खरेदी करता येईल. अशाच एका अलिशान घराची आता दुबईमध्ये विक्री होत आहे. मार्बल पॅलेस हा दुबईतला सगळ्यात महागडा व्हिला मानला जातो. हा मार्बल पॅलेस व्हिला एखाद्या राजवाड्यासारखाच आहे. अतिशय भव्यदिव्य असलेल्या या मार्बल पॅलेसची किंमतीही मोजता येणार नाही अशीच आहे आणि मुख्य म्हणजे, हा व्हिला विकत घेण्यासाठी भारतीयांनी अधिक गर्दी केली आहे. (Dubai Home)
श्रीमंतांची नगरी म्हणून ज्या दुबईचा उल्लेख केला जातो, त्या दुबईमध्ये सध्या एका घराची विक्री चर्चेत आली आहे. हे घर म्हणजे एक राजवाडाच आहे. मार्बल पॅलेस असे त्याचे नाव असून दुबईमधील सर्वात महागडा व्हिला म्हणून आताच त्याला ओळख मिळाली आहे. हा मार्बल पॅलेस दुबईच्या एमिरेट्स हिल्स परिसरात 60,000 स्क्वेअर फूटवर उभारण्यात आला आहे. दुबईच्या एमिरेट्स हिल्सवर जगभरातील गर्भश्रीमंतांची घरे आहेत. ही सर्व घरे अतिशय अलिशान असून त्या सर्वात या मार्बल पॅलेसचा नंबर पहिला लागला आहे. हा मार्बल पॅलेस संपूर्ण महागड्या अशा संगमरवरानं सजवलेला आहे. ही राजेशाही हवेली 750 दशलक्ष दिरहममध्ये विकली जाईल असा अंदाज आहे. अर्थात करोडोंमध्ये या पॅलेसची किंमत आहे. मार्बल पॅलेस आधुनिक पद्धतीने तयार केलेला आहे. याची विक्री करण्याची घोषणा जाहीर झाल्यापासून या घराचा मालक कोण होणार याची उत्सुकता वाढली आहे. त्यात भारतीय अभिनेत्यांमध्ये या घरासाठी चढाओढ सुरु झाल्याची माहितीही पुढे आली आहे. (Dubai Home)
दुबईतील प्रतिष्ठीतांची घरे असलेल्या एमिरेट्स हिल्स परिसरातील मार्बल पॅलेस एकूण 60,000 स्क्वेअर फूट क्षेत्रात पसरला आहे. यामध्ये पाच बेडरूम, 19 बाथरूम, एक जिम, सिनेमा गृह, तळघर आणि पार्किंग लॉट आहे. या पार्कींगमध्ये एकाच वेळी 15 वाहने पार्क करता येतील, अशी व्यवस्था आहे. संपूर्ण घराचे इंटेरिएलही अतिशय देखणे असेच आहे. या पॅलेसच्या उभारणीसाठी सुमारे 12 वर्षे लागली. पॅलेस बांधून 2018 मध्ये पूर्ण झाला. त्यानंतरचा वेळ या पॅलेसच्या सजावटीसाठी घेण्यात आला. आता हा पॅलेस पूर्णपणे तयार झाला असून त्याची विक्री होण्याचे जाहीर करण्यात आले आहे. या पॅलेसमध्ये 19व्या शतकातील आणि 20 व्या शतकातील शिल्पे आणि चित्रे लावण्यात आली आहे. हे घर नेमके कुणी बांधले याचा खुलासा मात्र करण्यात आलेला नाही. पण दुबईतील सर्वात मोठ्या ब्रोकरकडे या घराचा ताबा देण्यात आला असून त्याच्या विक्रीचे सर्व अधिकार ब्रोकरकडे देण्यात आले आहेत. या ब्रोकरच्या मते जगातील अगदी हातावर मोजण्यात येतील अशाच व्यक्ती आहेत, ज्या या मार्बल पॅलेसला विकत घेण्याचे धाडस करु शकतात. जेव्हा मार्बल पॅलेसच्या विक्रीची बातमी बाहेर आली तेव्हा रशियातील एका व्यापाऱ्यांना या घराचा दौरा केला आहे. तसेच भारतातील काही उद्योगपती आणि अभिनेतेही या घराबाबत उत्सुकता दाखवत आहेत. (Dubai Home)
===========
हे देखील वाचा : हिटलरचा खजिना सापडला?
==========
भारतातील अनेक उद्योगपतींची घरे दुबईत आहेत. त्यात रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. अंबांनी यांची तीन अलिशान घरे दुबईला असल्याची माहिती आहे. नुकतेच त्यांनी दुबईतील पाम जुमेराह बीचवरील घर विकत घेतले आहे. या मानवनिर्मित बेट समूहाच्या उत्तरेकडील भागात हे घर आहे. त्याची किंमत सुमारे 640 कोटी रुपये आहे. यात 10 बेडरूम, एक खाजगी स्पा आणि इनडोअर आणि आउटडोअर पूल आहेत. अंबानी यांनी हे दुबईतील घर त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीसाठी विकत घेतले आहे. (Dubai Home)
दुबईमध्ये अशाच अनेक अलिशान घरांची विक्री नेहमी चर्चेत असते. त्यामध्ये एमिरेट्स हिल्स, जुमेराह लेक टॉवर्स, ले रेव्ह, एमिरेट्स हिल्स, ब्रोमेलिया व्हिला, एलिट रेसिडेन्स, सिग्नेचर व्हिला ही काही निवडक अलिशान घरे आहेत. या घरांमध्ये अतिशय आधुनिक अशा सुविधा असून या घरांची विक्रीही सोशल मिडीयावर चर्चेचा विशय असतो.
सई बने