Nancy Pelosi Taiwan Visit- अमेरिकेतील काँग्रेसच्या स्पीकर नैंसी पेलोसी या मंगळवारी भारतीय वेळेनुसार रात्री ८.१५ वाजता ताइवान येथे पोहचल्या. कठोर सुरक्षा व्यवस्थेदरम्यान त्या तेथे आल्या. चीनकडून दिल्या जाणाऱ्या धमक्यांना न घाबरता त्या ताइपे येथे दाखल झाल्या. असे सांगितले जात आहे की, पेलोसी यांच्या सुरक्षिततेसाठी आधीपासूनच ताइवानच्या नजीकच्या अमेरिकेतील नेवीमध्ये एक एअरक्राफ्टसह पाच युद्ध नौका तैनात होत्या. जेव्हा पेलोसी यांचे विमान ताइवाइनच्या दिशेने पोहचले असता तेव्हा अशी बातमी आली की, चीनच्या एका फायटर जेटने सुद्धा उड्डाण केले आहे. पण नैंसी पेलोसी या सुरक्षितरित्या लँन्ड झाल्या, परंतु ही ऐवढी मोठी बाब का आहे? अखेर नैंसी पेलोसी या ताइवान मध्ये दाखल झाल्याने चीन ऐवढा का संतप्त झालाय? या मागे काही कारणं आहेत.
पहिले कारण असे ही, चीन हा ताइनवानला आपला हिस्सा असल्याचे मानतो. या व्यतिरिक्त एक मोठे कारण असे की, १९९७ नंतर नैंसी पेलोसी अमेरिकेतील एक निर्वाचित सर्वोच्च पदाच्या अधिकारी आहेत ज्या ताइवान मध्ये पोहचल्या आहेत. त्यांच्याआधी तत्कालीन स्पीकर न्यूट गिंगरिच सुद्धा गेले होते. सध्या अशी जोरदार चर्चा सुरु झाली होती की, ताइवानच्या नेत्यांना त्या भेटू शकतात.
खरंतर चीनमध्ये १९४९ मध्ये जेव्हा सिविल वॉर संपले तेव्हा वन चाइना पॉलिसी अस्तित्वात आली. सिविल वॉरमध्ये पराभव झालेले ताइवानमध्ये निघून गेले. येथे येऊन त्यांनी चीन पासून वेगळे होत आपले सरकार चालवू लागले. तर कम्युनिस्ट पार्टीने चीनवर शासन सुरु केले होते. दोघांचे असे ही म्हणणे होते की, ते चीनचे प्रतिनिधित्व करत राहिले. त्यानंतर चीन वन चाइना पॉलिसी अस्तित्वात आली. त्यानुसार फक्त एकच चीनसोबत राजकिय संबंध ठेवता येऊ शकतात. युद्धाच्या ३० वर्षानंतर अमेरिकाने ताइपे यांच्यासोबत असलेले राजकीय संबंध बीजिंगमध्ये जोडले. दरम्यान, अमेरिकेने ताइवान वर चीनच्या सार्वभौमत्वाच्या दाव्याचे समर्थन केले नाही. त्यांचे चीनसोबत अनौपचारिक संबंध होते.
हे देखील वाचा- दोहा करार काय आहे? AL Zawahiri च्या मृत्यूनंतर तालिबानी लावतायत अमेरिकेवर उल्लघनांचा आरोप

ताइवान कडून स्वातंत्र्याचे समर्थन
पेलोसी यांचा हा दौरा हा तज्ञांना बिडेन प्रशासनाकडून संमिश्र संदेश असल्याचे दिसते.कारण जेव्हा रशियाने युक्रेनवर हल्ला केला तेव्हा अमेरिका थेट लढाईत उतरला नव्हता. परंतु तो ताइवानला दाखवू पाहत आहे की, त्यांच्या सोबत असे होणार नाही. बहुतांश वेळा अमेरिका असे सांगत आला की, तो ताइवानसोबत उभा राहिल आणि नैंसी पेलोसी यांचा हा दौरा या दाव्याला अधिक मजबूत करत आहे. चीन मधील सरकार ताइवान आणि अन्य परदेशातील सरकारांमध्ये कोणत्याही प्रकारच्या देवाण-घेवाणीसाठी विरोध करत राहिले. परंतु ताइवानचे सरकार पेलोसी यांच्या दौऱ्याला त्यांच्या स्वातंत्र्याचे समर्थन असल्याच्या रुपात पाहत आहे.(Nancy Pelosi Taiwan Visit)
PLA कडून १ ऑगस्टला साजरा केला स्थापना दिवस
पेलोसी यांचा दौरा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बाइडन आणि शी जिनपिंग यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून बातचीत झाल्यानंतर केला आहे. या मध्ये जिनपिंग यांनी सख्त ताकिद दिली होती की, अमेरिकेने चीनसोब खेळू नये. या व्यतिरिक्त चीनी मीडियाकडून असे सांगितले जात होते की, नैंसी पेलोसींचे विमान लँन्ड करण्यास देणार नाही. जिनपिंग यांनी दिलेल्या या इशाऱ्यानंतर नैंसी यांचा हा दौरा रद्द झाला असता तर अमेरिका कमजोर असल्याचे दिसले असते. त्यामुळे हा दौरा फार महत्वपूर्ण आहे. ब्रुकिंग्स इंस्टिट्युशनचे एक वरिष्ठ फेलो रेयान हैस यांनी असे म्हटले होते की, हा एक योगायोग आहे की दौरा हा चीनसाठी एका गंभीर वेळी होत आहे. कारण एक दिवस आधीच चीनी सेनेकडून आपल्या स्थापना दिवस साजरा करण्यात आला होता.