सध्या राज्यात ईडी अधिकच सक्रिय झाली असून गेल्या काही काळापासून त्यांच्याकडून विविध राजकीय नेतेमंडळींच्या घरावर धाडी टाकल्या जात आहेत. यापूर्वी अनिल परब हे निशाण्यावर होते तर आता शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना ईडीने अटक केली आहे. खरंतर संपूर्ण रविवार हा संजय राऊत यांच्यासाठी आव्हानात्मक होता. पहाटे ईडीने टाकलेली धाड ते रात्रीपर्यंत सुरु असलेली चौकशी पाहता त्यांना अखेर अटक केली गेली. तत्पूर्वी संजय राऊतांचा त्यांच्या आईसोबतचा एक व्हिडिओ सुद्धा सध्या सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे. त्यामध्ये संजय राऊत आपल्या आईची गळाभेट घेताना दिसून आले पण आपल्या मुलासाठी आईच्या डोळ्यात अश्रू आल्याचे सुद्धा त्यावेळी दिसले.(Sanjay Raut Career)
ईडीने संजय राऊतांना चौकशीसाठी समन्स पाठवले होते. त्याचसोबत घरातून ११.५ लाख रुपये ही ईडीने जप्त केले आहेत. त्याबद्दल राऊतांना विचारले असता त्यांनी असमानधारक उत्तरे ईडीला दिल्याचे सांगितले जात आहे. परंतु या सर्व प्रकाराआधी संजय राऊत यांच्या काही गोष्टी अशा आहेत ज्याबद्दल आता काहीजण अधिकाधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. तर पाहूयात तरुण वयात संपादक ते शिवसेना प्रवक्ता, नेते पदापर्यंतची संजय राऊत यांच्या कारकीर्दीबद्दल अधिक.
इंडियन एक्सप्रेस मध्ये नोकरी ते क्राइम रिपोर्टर, संपादक
संजय राऊत यांच्या करियरची सुरुवात ही राजकरणापासून नव्हे तर पत्रकारितेमधून झाली होती. सुरुवातीला संजय राऊत हे इंडियन एक्सप्रेसच्या पुरवठा विभाहगात काम करत होते. त्यानंतर त्यांनी मार्केटिंग डिपार्टमेंटमध्ये ही काम केले. त्यानंतरच्या काळात संजय राऊत हे लोकप्रभा मध्ये क्राइम रिपोर्टर म्हणून काम करु लागले होते. राऊतांचा क्राइम बीटवर अधिकच जम होता. त्यामुळे त्यांना उत्तम क्राइम रिपोर्टर म्हणून ओळखले जात होते.
पुढे संजय राऊत हे शिवसेनेबद्दल मिळतीजुळती भुमिका घेत असल्याचे बाळासाहेबांना वाटत होते. त्यामुळे ज्यावेळी शिवसेनेचे मुखपत्र सामना हा १९८९ मध्ये सुरु झाल्यानंतर अशोक पडबिद्री हे कार्यकारी संपादक म्हणून होते. त्यानंतर १९९३ मध्ये संजय राऊत यांची कार्यकारी संपादक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.(Sanjay Raut Career)
हे देखील वाचा- ठाकरेशाही, उत्तम फोटोग्राफर ते राज्याचे मुख्यमंत्री पद मिळवणाऱ्या उद्धव ठाकरेंचा जीवनप्रवास
राजकीय प्रवास
संजय राऊत हे पहिल्यांदा २००० च्या सालात महाराष्ट्रातून राज्यसभेच्या पदावर निवडून आले. त्यांना २००५ मध्ये शिवसेना नेत्याच्या रुपात नियुक्त करण्यात आले. तसेच त्याच वर्षात ऑक्टोंबर महिन्यात गृहांच्या प्रकरणात समिती आणि नागरिक उड्डाण मंत्रालयाचे सल्लागार समितीचे सदस्य होते. तर २०१० मध्ये राऊत यांना दुसऱ्या कार्यकाळासाठी २०१० मध्ये महाराष्ट्रातील राज्यसभेच्या पदासाठी पुन्हा निवडले गेले. तेव्हा संजय राऊतांकडे खाद्य, सार्वजनिक वितरण, वीज मंत्रालयासाठी सल्ला समितीचे सदस्य रुपात नियुक्ती करण्यात आली होते. २०१६ मध्ये त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळात महाराष्ट्रातील राज्यसभेच्या पदासाठी ते पुन्हा निवडून आले. संजय राऊत हे उद्धव ठाकरेंची निकटवर्तीय मानले जातात.
नोव्हेंबर २०१९ मध्ये महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर शिवसेना आणि भाजपचे गठबंधन, जागा वाटपाचा फॉर्म्युला आणि महाराष्ट्रातील पुढील मुख्यमंत्री पदाचा निर्णय होऊ शकला नाही. त्यावेळी संजय राऊत हे शिवसेने प्रवक्ते असल्याने त्यांनी भाजपच्या विरोधातील आपली भुमिका मांडली. त्यांनी असे म्हटले होते की, राज्याचा पुढील मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होणार. जर भाजपला हे मान्य नसेल शिवसेनेकडे अन्य मार्ग आहेत. एका शिवसैनिकालाच महाराष्ट्र हा पुढील मुख्यमंत्री म्हणून करेल असे ही राऊत यांनी म्हटले होते.(Sanjay Raut Career)
दरम्यान आता ईडीच्या कारवाई नंतर सुद्धा संजय राऊतांनी ट्विट केले होते. त्यात त्यांनी ”खोटी कारवाई, खोटे पुरावे, मी शिवसेना सोडणार नाही… मरुन जाईन तरीही समर्पण करणार नाही, जय महाराष्ट्र अशा आशयाचे ट्विट केले होते. त्याचसोबत राऊतांनी माझा कोणत्याही घोटाळ्यात काही घेणं-देणं नाही आहे. हे मी शिवसेना प्रमुख बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगत आहे. बाळासाहेबांनी आम्हाला लढायला शिकवले आहे…मी शिवसेनेसाठी लढाई सुरुच ठेवीन” असे ही संजय राऊत यांनी म्हटले होते.