तृणमुल काँग्रेसने आपल्या स्थापनेनंतर प्रत्येक वर्षी २१ जुलै हा शहीद दिवस (Shahid Diwas) म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली होती आणि तो आजही केला जात आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि त्यांच्या पक्षाकडून या दिवशी एक मोठी रॅली काढली जाते. दरम्यान गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या परिस्थितीमुळे ही रॅली काढण्यात आली नव्हती. पण टीएमसीने हा शहीद दिवस त्या काळात प्रतिकात्मक रुपात साजरा केला होता. मात्र यंदा टीएमसीकडून शहीद दिवसानिमित्त मोठे आयोजन करण्यात आले आहे. पण २१ जुलै नक्की असे काय झाले होते त्यामुळे ममता बॅनर्जी आणि त्यांच्या पक्षाकडून आजचा दिवस हा शहीद दिवस म्हणून साजरा केला जातो?
आजच्या शहीद दिवसानिमित्त रॅली ही कोलकाता येथील एस्प्लांजे रोड येथे टीएमसीद्वारे आय़ोजित एक वार्षिक कार्यक्रम असणार आहे. हा कार्यक्रम २१ जुलै, १९९३ मध्ये झालेल्या एका घटनेची आठवण करुन देतो. कराण ममता बॅनर्जीच्या नेतृत्वाली युवा काँग्रेसकडून काढण्यात आलेली एका विरोध रॅली दरम्या पश्चिम बंगालच्या पोलिसांकडून १३ काँग्रेस कार्यकर्त्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.
हे देखील वाचा- भाजपाचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार जगदीप धनखर यांना ममता बॅनर्जी यांनी केले होते ब्लॉक ..
असे मानले जाते की, ही घटना ममता बॅनर्जी यांच्या राजकीय प्रवासाला कलाटणी लावणारी होती. ममता बॅनर्जी त्या वेळी काँग्रेस नेत्या होत्या आणि पश्चिम बंगालच्या तरुण काँग्रेसच्या अध्यक्षा होत्या. त्यांनी एका रॅलीचे नेतृत्व केले होते आणि निवडणूकीत पारदर्शकता आणावी म्हणून फोटो वोटर कार्डवर लागू करावेत अशी मागणी केली होती. ममता बॅनर्जी या घटनास्थळापासून एक किलोमीटर लांब होत्या. त्याचवेळी रॅलीवर पोलिसांनी गोळीबार केला आणि त्यामध्ये १३ काँग्रेस कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला होता.(Shahid Diwas)
घटनेनंतर ममता बॅनर्जींना मिळाली जनतेची सहानभुती
या घटनेनंतर ममता बॅनर्जींसाठी जनतेकडून सहानभुती मिळाली. कारण ममता बॅनर्जी त्या वेळी एक उगवता राजकीय नेता होता. या घटनेच्या चार वर्षानंतर त्यांनी टीएमसी पक्षाची स्थापना केली. जो २०११ मध्ये बंगाल मध्ये सत्तेत आली. सत्ता आल्यानंतर ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने घटनेचा तपास करण्यासाठी सुशांतो चट्टोपाध्याय यांच्या अध्यक्षतेखालील एक न्यायिक आयोगाची स्थापना केली. तर १९९३ मध्ये झालेल्या घटनेनंतर टीएमसीकडून प्रत्येक वर्षी त्या १३ कार्यकर्त्यांच्या आठवणीत रॅलीचे आयोजन करते, त्यांना ते शहीद म्हणून संबोधतात. या घटनेमुळेच ममता बॅनर्जी आणि त्यांचा पक्ष प्रत्येक वर्षी शहीद दिवस हा २१ जुलै रोजी साजरा करतात.