Pedicure at home- दिवसभारातील कामकामांमध्ये आपल्या पायांचा सर्वाधिक उपयोग होतो. अशातच त्यांची काळजी घेणे आपल्या हातात आङे. आपले पाय स्वच्छ आणि सुंदर पाय हे तुमचे सौंदर्य वाढवतात. सध्या पायांची काळजी घेण्यासाठी पेडिक्योर करणे उत्तम ऑप्शन आहे. मात्र ते करण्याच्या विविध पद्धती आहेत. पण पार्लरमध्ये पेडीक्योर करण्यासाठी अधिक पैसे घेतले जातात. अशातच तुम्ही नाराज होऊ नका. आम्ही तुम्हाला घऱच्या घरी पेडीक्योर कसे करावे याबद्दल अधिक माहिती देणार आहोत.
पेडिक्योर एक कॉस्मेटिक उपचार आहे ज्यामुळे त्वचेवरील धुळ-माती आणि डेड स्किन हटवण्यासह पायांचे आरोग्य कायम टिकून राहण्यास मदत करते. याचा वापर करुन महिला आपल्या पायांचे सौंदर्य वाढण्याकडे अधिक भर देतात.
पेडिक्योर करण्याचे फायदे
-पेडिक्योर हे एक्सफोलिएच्या रुपात काम करतात, ज्यामुळे पायांवरील डेड स्किन ही निघून जाते. तसेच नखांची पॉलिशी सुद्धा करते.
-ड्राय स्किनसाठी सुद्धा पेडिक्योर अधिक फायदेशीर ठरते.
-पेडिक्योरमध्ये एका विशिष्ट प्रकारचे पायाचे मसाज केले जाते. त्यामध्ये पायांचे तळवे आणि बोटांना आराम मिळतो.
-पेडिक्योर मध्ये केल्या जाणाऱ्या फुट मसाजमुळे रक्त प्रवाहात सुधारणा होतात.
घरच्या घरी पेडिक्योर कसे कराल
पेडिक्योर करण्यासाठी तुम्हाला नेहमीच पार्लरमध्ये जाण्याची गरज नाही. तुम्ही अगदी कमी वेळात घरात पेडिक्योर सोप्प्या पद्धतीने करु शकता. तर जाणून घेऊयात पेडिक्योर कसे करावे.(Pedicure at home)
स्टेप १- पेडिक्योरच्या वस्तू एकत्रित करा
पेडिक्योरसाठी एक टबमध्ये हलके गरम पाणी, एप्सम सॉल्ट आणि शॅम्पू, उत्तम फुट स्क्रब,, नेल क्लिपर, क्युटिकल पुशर, नेल फाइल, प्युमिक स्टोन, नेल स्कबर, नेल पॉलिश रिमूव्हर, क्युटिकल क्रिम, एक स्वच्छ टॉवेल, मॉइस्चराइजर, कॉटन पॅड.
स्टेप २- नेल पॉलिश काढा
पेडिक्योर करण्यापूर्वी नखांना लावेली नेल पॉलिश काढा. त्यासाठी कॉटन बॉलवर नेल पॉलिश रिमूव्हर घेऊन हळूहळू ते नखांना लावा. पूर्णपणे नखं स्वच्छ करा.
हे देखील वाचा- तुमचे केस वारंवार तेलकट होतात? ‘या’ घरगुती उपायांनी सोडवा समस्या
स्टेप ३- नखांना ट्रिम आणि फाइल करा
नखं स्वच्छ केल्यानंतर अतिरिक्त आलेली नखं कापा. नखं बाजूने एकदम लहान कापू नका त्यामुळे तुम्हाला दुखणे सुरु होईल. नखांना खास शेप सुद्धा देऊ शकता. नखं कापल्यानंतर नेल फाइलनरने हळूहळू नखं फाइल करत शेप द्या.(Pedicure at home)
स्टेप ४- पायांना पाण्यात बुडवा
नखं कापल्यानंतर आणि त्यांना शेप दिल्यानंतर तुमचे पाय हलक्या गरम पाण्यात बुडवून ठेवा. या पाण्यात एप्सम सॉल्ट किंवा शॅम्पू अन्यथा लिंबूचा रसाचे काही थेंब टाका. कमीतकमी तुमचे पाय १५ मिनिटे यामध्ये बुडवून ठेवा आणि नंतर टॉवेलने स्वच्छ पुसून घ्या,
स्टेप ५- पायांना स्क्रब करा
पाय सुकल्यानंतर नखांना क्युटिकल क्रिम लावा आणि हळूहळू मसाज करा. जेव्हा डेड स्किन नरम होईल तेव्हा क्युटिकल पुशरच्या मदतीने क्युटीकलला हटवून स्वच्छ करा.आता पायांच्या डेड स्किनसाठी फुट स्क्रब वापरा. तीन-चार मिनिटांपर्यंत पायांचे तळवे आणि पायांच्या बोटाजवळी ठिकाणी हळूहळू स्क्रब करा.
स्टेप ६- पायांना मॉइस्चराइज करा
आता पाय स्वच्छ झाले आहेत, परंतु मॉइस्चराइज करणे अत्यंत गरजेचे आहे. एका उत्तम मॉइस्चराइजची निवड करा. जवळजवळ १० मिनिटे पायांना, बोटांना त्याने हलक्या स्वरुपात मसाज करा.
स्टेप ७- नेल पॉलिश लावा
पायांना मॉइश्चराइज केल्यानंतर नखांना आपल्या आवडीची नेल पॉलिश लावा. हे पेडिक्योर मधील अखेरची स्टेप आहे.
तर अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी पेडिक्योर करु शकता. तसेच जर तुमच्या पायांना भेगा पडल्या असतील तर काही गोष्टींची काळजी घ्या, जसे पेडिक्योर करतेवेळी स्क्रब करण्यासाठी प्युमिक स्टोनचा हलक्या हाताने स्क्रब करा. लाक्षात ठेवा अधिक भेगा पडल्या असतील तर घरच्या घरी पेडिक्योर करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.