उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना कोणत्याही परिचयाची गरज नाही. योगी आदित्यनाथ त्यांच्या राजकारणातील भक्कम स्थानामुळे भारतभर प्रसिद्ध आहेत. यूपीच्या राजकारणात त्यांनी भाजपचे आतापर्यंतचे रेकॉर्ड मोडले आहेत. योगी आदित्यनाथ हे भाजपचे पहिले मुख्यमंत्री आहेत, ज्यांनी उत्तर प्रदेशमध्ये पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. आदित्यनाथ यांच्यापूर्वी भाजपच्या कोणत्याही मुख्यमंत्र्याने यूपीमध्ये मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ पूर्ण केला नव्हता. (Yogi Adityanath lifestyle)

योगी आदित्यनाथ यांनी केवळ पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला नाही, तर पूर्ण बहुमताने दुसऱ्यांदा यूपीमध्ये सरकार स्थापन केले. याशिवाय योगी आदित्यनाथ यांनी यूपी सरकारशी संबंधित एक मिथकही तोडला. नोएडाला जाणाऱ्या यूपीच्या मुख्यमंत्र्यांचा पराभव निश्चित असल्याचं म्हटलं जात होतं, पण योगी आदित्यनाथ नोएडालाही गेले आणि निवडणूक जिंकले. योगी आदित्यनाथ यांच्या आयुष्याशी संबंधित अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या खूप मनोरंजक आहेत आणि कमी लोकांना माहित आहे. मुख्यमंत्री आजही साधेपणाने जीवन जगतात. जाणून घेऊया त्यांच्या जीवनशैलीबद्दल.
योगी आदित्यनाथ यांचा दिनक्रम
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ कठोर दिनचर्या पाळतात. आदित्यनाथ रोज पहाटे तीन वाजता उठतात. ते नियमितपणे चार ते पाच या वेळेत योगासने करतात. स्नानानंतर योगी आदित्यनाथ प्रार्थना करतात. (Yogi Adityanath lifestyle)
गोरखनाथ मठाला भेट
योगी आदित्यनाथ यांचे गोरखपूर येथील गोरखनाथ मठाशी जुने नाते आहे. योगी हे राज्याचे प्रमुख असले, तरी त्यांना वेळ मिळेल तेव्हा ते गोरखपूरला नक्कीच जातात. बहुतेक शनिवारी आणि रविवारी, योगी आदित्यनाथ मठाला भेट देतात आणि येथील व्यवस्थेचा आढावा घेतात. योगी मठ आणि मंदिर परिसरात फेऱ्या मारतात आणि स्वच्छतेचा आढावा घेतात. मठात असलेल्या गोशाळेत ते गायींची सेवा करतात आणि माश्यांना अन्न चारतात. (Yogi Adityanath lifestyle)

योगी आदित्यनाथ यांचे जेवण
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ खूप साधे जीवन जगतात. ते शाकाहारी पदार्थ खातात. ते मांसाला स्पर्श देखील करत नाहीत. साधे जेवण खाऊन ते आपल्या कामाला सुरुवात करतात.

योगी आदित्यनाथ यांची संपत्ती
योगी आदित्यनाथ यांच्या संपत्तीबद्दल बोलायचे झाले, तर त्यांनी २०१७च्या निवडणुकीत त्यांच्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या संपत्तीची माहिती दिली होती. त्यावेळी त्यांची एकूण संपत्ती ९५ लाख रुपये होती. त्याचवेळी, यावर्षी उमेदवारी दाखल करताना, त्यांनी प्रतिज्ञापत्रात त्यांच्या मालमत्तेचा तपशील दिला. त्यानुसार गेल्या चार वर्षांत त्यांच्या एकूण मालमत्तेत सुमारे ५९ लाख रुपयांची वाढ झाली आहे. २०१७ मध्ये एमएलसी निवडणुकीच्या वेळी योगी आदित्यनाथ यांची संपत्ती ९५ लाख रुपये होती, जी वाढून १ कोटी ५४ लाख ९४ हजार झाली आहे. (Yogi Adityanath lifestyle)

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कमाईचे साधन
लोकप्रतिनिधी (माजी खासदार आणि आमदार) म्हणून मिळणारे पगार आणि भत्ते इ.मधून त्यांना उत्पन्न मिळते. तसेच त्यांच्याकडे रायफल आणि रिव्हॉल्व्हरही आहे. (Yogi Adityanath lifestyle)
हे देखील वाचा: पैगंबरांसंदर्भातील विधानामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या नुपूर शर्मांचा शैक्षणिक ते राजकीय प्रवास
योगी आदित्यनाथ यांचे घर
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे उत्तराखंडचे असले, तरी गोरखपूरमध्ये आल्यानंतर ते येथेच राहिले. गोरखपूरमध्ये त्यांचे निवासस्थान आहे. याशिवाय, मुख्यमंत्री म्हणून त्यांना लखनऊमध्ये मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान मिळाले आहे, ज्यामध्ये ते सध्या राहतात. त्यांच्याकडे स्वतःचे कोणतेही वाहन नसून, ते फॉर्च्युनर आणि इनोव्हामध्ये फिरतात.