‘गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया’ या जयघोषात येत्या काही दिवसात आता आपण सर्वच जण मिळून आपल्या लाडक्या गणरायाच्या स्वागत करणार. गेले अनेक दिवस गणेशोत्सव साजरा होणार की नाही? मूर्तीची उंची किती असावी या सारखे अनेक प्रश्न सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या समोर होते. अखेरीस यंदा मूर्तीची उंची ४ फुटांपेक्षा जास्त नसावी असे नियम आखण्यात आले. तरी देखील आम्हाला उंच मूर्ती करण्यासाठी परवानगी द्या अशी विनंती जी एस बी सेवा मंडळ शासन दरबारी केली होती. मात्र ही मागणी मान्य न झाल्यामुळे अखेरीस मंडळाने यंदा १४ फूट ऐवजी ४ फुटाची मूर्ती बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरवर्षी गणेशोत्सवाच्या दोन महिन्या अगोदरच बाजारात बाप्पाच्या आगमनासाठी तयारीची लगबग बाजारात पाहायला मिळत असते. मात्र यंदा जगभरासह महाराष्ट्रात सुरू असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यावर्षी सर्वच साणांवर कोरोनाचे संकट पसरले आहेत. यावर्षी गणेशोत्सव साध्यापणाने साजरा करावा असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. तसेच आरोग्याच्या दृष्टिकोनातून शासनाने काही नियम जाहीर केले आहेत.
दरवर्षी जगभरातून जी एस बी सेवा मंडळाच्या बापाच्या दर्शनासाठी येत असतात. मात्र या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता मंडळाने ४ फुटांची मूर्ती बसवत शासनाद्वारे आखण्यात आलेल्या सर्व नियमांचे तंतोतंत पालन करत उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उत्सव काळात भाविकांना प्रवेश दिला जाणार नाही पण त्यांच्यासाठी ऑनलाइन दर्शनाची व्यवस्था मंडळाच्या वतीने करण्यात येणार आहे. तसेच मंडळाच्या वतीने उत्सव काळात विविध भागात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. तर ‘कोविड संकटमुक्त आर्थिक सहकार स्कीम’च्या अंतर्गत कोरोना काळात फटका बसलेल्या गरीब मजूर लोकांना मदत देखील करण्यात येणार असल्याचे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तर आतापर्यंतच्या कोरोना काळात तब्बल ५६ लाखांचे राशन मंडळाच्या वतीने वाटप करण्यात आले आहे.
नवसाला पावणारा आणि लाखो गणेश भक्तांच्या श्राद्धस्थान असणाऱ्या लालबागचा राजा मंडळाने तर या वर्षी मूर्तीची प्राणप्रतिष्ठाच न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर दुसऱ्या बाजूला गणेशोत्सव ऐवजी आरोग्य उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आरोग्य उत्सवा दरम्यान प्लासमा दान, रक्तदान, शहिदांच्या सन्मान या सारख्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
तर मुंबईतील प्रसिद्ध अश्या चिंचपोकलीचा चिंतामणी मंडळाने देखील मंडळाच्या देवाऱ्यातील चांदीची मूर्तीची पूजा करत उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच विभागातील नागरिकांना विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची व्यवस्था देखील करण्यात येणार असल्याचे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
मुंबईतील उंच मूर्तींसाठी प्रसिद्ध असलेल्या अखिल खेतवाडीतील सर्वच मंडळांनी लहान मूर्ती बसवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात आले आहे. तर जगाला हेवा वाटेल असा गणेशोत्सव साजरा करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आव्हानाला सर्वच मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
अखेर जीएसबी सेवा मंडळाची मूर्ती ४ फुटांची
52
previous post