Home » गजेंद्र अहिरे दिग्दर्शित ‘डियर मॉली’ १ जुलैला होणार प्रदर्शित

गजेंद्र अहिरे दिग्दर्शित ‘डियर मॉली’ १ जुलैला होणार प्रदर्शित

by Team Gajawaja
0 comment
Dear Malley
Share

सध्या मराठी चित्रपटांच्या यादीत अनेक दमदार चित्रपटांचा समावेश होत असतानाच आता प्रसिद्ध दिग्दर्शक गजेंद्र अहिरे दिग्दर्शित ‘डिअर मॅाली’चाही (Dear Malley) यात समावेश होत आहे. ज्यांनी अनेक नावाजलेले चित्रपट सिनेमासृष्टीला दिले आहेत. येत्या १ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणारा हा चित्रपट मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत प्रदर्शित होणार आहे. नुकतेच ‘डिअर मॅाली’चे पोस्टर समोर आले असून यात गुरबानी गिल, अलोक राजवाडे, मृण्मयी गोडबोले, अश्विनी गिरी, लिया बॅायसेन, क्रिस्टर होल्मग्रेन मुख्य भूमिकेत आहेत.

पोस्टरमध्ये गुर्बानी गिलच्या हातात पत्र दिसत असून यात असा काय मजकूर आहे, ज्याने तिचा चेहरा इतका गंभीर झाला आहे ? याचा उलगडा जरी झालेला नसला तरी हा एक कौटुंबिक सिनेमा असल्याचे दिसतेय. ‘गुवाहटी आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल’मध्ये ‘डिअर मॅाली’ला ‘बेस्ट फिचर फिल्म’ पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

सिनेसृष्टीला वेगळ्या धाटणीचे चित्रपट देणारे दिग्दर्शक गजेंद्र आहिरे म्हणतात, “अनेक दिवसांपासून या चित्रपटाच्या प्रदर्शनाची उत्सुकता लागली होती. अखेर प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे.

====

हे देखील वाचा: ‘तमाशा लाईव्ह’चा प्रेक्षकांना संगीत नजराणा

====

हा चित्रपट एका सुंदर आणि हळव्या नात्यावर भाष्य करणारा कौटुंबिक चित्रपट आहे. माझे बरेच चित्रपट सामाजिक विषयांवर आधारित आहेत. मला चौकटीबाहेरचे विषय हाताळायला विशेष आवडते.’’मनमोहन शेट्टी व गणेश जैन प्रस्तुत प्रवीण निश्चल प्रॅाडक्शन्स निर्मित या चित्रपटाचे निर्माता प्रवीण निश्चल व रतन जैन आहेत. क्रिष्णा सोरेन यांनी चित्रपटाच्या छायाचित्रणकाराची धुरा सांभाळली आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.