जरा कल्पना करा की, अचानक तुम्हाला तुमच्याच घरात दडलेला करोडोचा खजिना सापडलाय. यावेळी तुमची प्रतिक्रिया काय असेल? खरं तर, जगात असे अनेक लोक आहेत, ज्यांना असे वाटते की त्यांना कोठूनतरी दडलेला खजिना मिळावा. जेणेकरून त्यांना त्यांचे संपूर्ण आयुष्य आनंदाने आणि सुखसोयीने घालवता येईल. असाच काहीसा प्रकार एका महिलेसोबत घडला आहे. पैशासाठी ती घर विकणार होती. पण त्याआधीच घरात दडलेला करोडोंचा खजिना तिला सापडला. आता कल्पना करा की, हा खजिना मिळाल्यावर त्या स्त्रीला किती आनंद झाला असेल? अर्थात जास्तच! जाणून घेऊया काय आहे हे संपूर्ण प्रकरण… (Women was unware about her property)
युनायटेड किंगडम म्हणजेच ब्रिटनमधील एका वृद्ध महिलेला घर विकण्यापूर्वी, घरात लपलेल्या करोडोंच्या मालमत्तेची माहिती मिळाली. हे समजताच तिच्या आनंदाला पारावार उरला नाही. विशेष म्हणजे, आर्थिक मदतीसाठी घरासह काही वस्तू विकण्याच्या तयारीत असताना, या महिलेला घरात दडलेला खजिना मिळाला.
बंगल्याची निवृत्त मालकीण तिच्या आई-वडिलांच्या मृत्यूनंतरही येथे राहत होती. वडिलांच्या काळापासून तिच्या बेडरूममध्ये एक सुंदर पेंटिंग होती. पण या पेंटिंगबद्दल त्या महिलेने कधीच जास्त जाणून घेण्याचा प्रयत्न केला नव्हता. (Women was unware about her property)
ती महिला त्या पेंटिंगचा एक साधी पेंटिंग म्हणून विचार करत होती, जी सहसा घरांमध्ये सजावटीसाठी वापरली जाते. पण जेव्हा लोक वस्तू विकत घेण्यासाठी तिच्या घरी आले, तेव्हा शतकानुशतके जुनी असलेली ही ऐतिहासिक पेंटिंग एका जाणकाराच्या लक्षात आली. मग काय! त्या व्यक्तीने महिलेला या पेंटिंगची खरी किंमत कळवली आणि त्या महिलेला तिच्या घरातील खजिना मिळाला.
काय आहे पेंटिंगची खासियत?
– अचानक करोडोंची मालकीण बनलेल्या महिलेच्या घरातील पेंटिंगबद्दल बोलायचे झाले, तर ही पेंटिंग १५व्या शतकात बनवण्यात आली होती. (Women was unware about her property)
उत्तर लंडनमधील एनफिल्डमध्ये या महिलेचे घर आहे. हे घर महिलेला तिच्या वडिलांकडून वारसाहक्काने मिळाले होते. या घराच्या बेडरूममध्ये, इटालियन चित्रकार फिलिपिनो लिप्पी यांचे शतकानुशतके जुने पेंटिंग ‘मॅडोना अँड चाइल्ड’ होते.
त्या महिलेला या पेंटिंगच्या ऐतिहासिकतेची कल्पनाही नव्हती. जेव्हा महिलेला स्मृतिभ्रंश झाला, तेव्हा तिच्या घरातील काही वस्तू विकण्याचा विचार कुटुंबीयांनी केला. तेव्हाच ही पेंटिंग ऐतिहासिक असण्याचे रहस्य उघड झाले. (Women was unware about her property)
हे देखील वाचा: गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव कमवणारी 5 वर्षीय बेला आहे तरी कोण?
तब्बल २ कोटी रुपयांना विकली गेली पेंटिंग
जेव्हा हे पेंटिंग महिलेने विक्रीसाठी ठेवले, तेव्हा एका पारखी लिलावकर्त्याची नजर या उत्कृष्ट नमुन्यावर पडली. त्या व्यक्तीने ओळखले की, ही पेंटिंग साधी-सुधी नाही, तर ऐतिहासिक आहे. (Women was unware about her property)
या महिलेने सांगितले की, ३० वर्षे येथे राहूनही तिला या पेंटिंगचे महत्त्व माहित नव्हते. आता पेंटिंग £२,५५,००० म्हणजेच सुमारे २ कोटी रुपयांना विकली गेली आहे.