Home » लोकांना मानसिक विवंचनेतून बाहेर काढायला हवं

लोकांना मानसिक विवंचनेतून बाहेर काढायला हवं

by Correspondent
0 comment
Share

लोकांना मानसिक विवंचनेतून बाहेर काढायला हवं

राज ठाकरे यांचे मत

कोरोनामुळे सुरक्षेच्या दृष्टीने लादण्यात आलेले निर्बंध, टेलिव्हिजनवरील बातम्या आणि व्हॉट्सअॅपवरचे मेसेज यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहेत. आपण आपली काळजी घेणं गरजेचं आहे पण घाबरुन घरात बसणं योग्य नाही असं मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडले आहे .लोकांना मानसिक विवंचनेतून बाहेर काढायला हवं. त्यामुळे सगळ्या गोष्टी पूर्ववत करा, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. काळजी घ्या, पण शटडाऊन आणि लॉकडाऊन नको, असंही ते म्हणाले. एबीपी माझाच्या ‘माझा महाराष्ट्र माझं व्हिजन’ या कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी बोलताना ठाकरे यांनी त्यांना अपेक्षित बदल आणि सूचना मांडल्या. “लोकांना मानसिक विंवचनेतून बाहेर काढण्याची जबाबादारी सरकारची आहे. त्यासाठी काही गोष्टी सुरु करणं आवश्यक आहे. यावर सरकार काय विचार करतंय, या गोष्टी सरकारने सांगितल्या पाहिजे.”असं राज ठाकरे यांनी सांगितले.

यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीबद्दल आपले मत मांडले.”मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मला टीव्हीवर दिसले, कारभार दिसलाच नाही. त्याबद्दल काही बोलणार नाही,” असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं. हे सरकार फार काळ टिकेल असं वाटत नाही, असंही राज ठाकरे म्हणाले. जिथे एकोपा नाही, एकमत नाही ते जास्त काळ टिकेल, असं वाटत नाही, असं त्यांनी सांगितलं.

 सध्या राम मंदिराचे भूमिपूजन हा चर्चेचा विषय आहे. त्याबद्दल राज ठाकरे यांनी मत मांडले.राम मंदिराचं भूमिपूजन होत असेल तर ती अभिमानास्पद गोष्ट आहे. राम मंदिराचं भूमिपूजन धूमधडाक्यातच व्हायला हवं, पण ही योग्य वेळ नाही. तसंच राम मंदिराचं ई-भूमिपूजन मान्य नसल्याचंही राज ठाकरे यांनी सांगितलं.



Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.