सध्याच्या बदललेल्या जीनवशैलीमुळे आरोग्याशी संबंधित विविध आजार उद्भवत आहेत. अशातच आरोग्याची योग्य वेळी काळजी न घेतल्यास आपल्याला जडलेल्या व्याधीसह आयुष्य जगावे लागते. त्यासाठी बरेचशे डॉक्टर, औषध आपल्याला घ्यावी लागतात. मात्र तुम्हाला तंदुरुस्त आयुष्य जगायचे असेल तर दररोज थोडा वेळ का होईना व्यायाम करणे फार महत्वाचे आहे. कारण व्यायामामुळे आपल्या शरिराची हालचाल होत राहतेच पण इंद्रिये सुद्धा सुरळीत काम करतात. अशातच जर तुम्ही पाठीचे दुखणे (Back pain किंवा अन्य शरिरातील अवयवांच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करत असाल तर वेळीच सावध व्हा.
अशातच जर तुम्हाला पाठ दुखण्याची (Back pain) समस्या असेल तर त्याकडे आताच लक्ष द्या. कारण व्यक्तीला ताठ उभे राहण्यासाठी पाठीच्या कण्याच्या आधाराची फार गरज असते. त्यामुळे तुमच्या कण्यामध्येच काही समस्या असतील आणि परिणामी तुमची पाठ दुखत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्याचसोबत काही साधी, सरळ आणि सोप्पी योगासन ही घरच्या घरी करण्याचा प्रयत्न करा. पाठ दुखीपासून आराम कसा मिळेल आणि त्यासाठी काय करावे लागेल याबद्दलच थोडक्यात तुम्हाला येथे कळणार आहे.
ताडासन
ताडासन करण्यासाठी तुम्हाला प्रथम तुमच्याकडे योगा मॅट असेल तर उत्तम किंवा टॉवेल पसवरुन त्यावर उभे रहायचे आहे. आता दोन्ही हातांची बोट एकमेकांमध्ये जुळवत ते वरच्या बाजूस घेऊन जा. आता दीर्घ श्वास घेत सरळ उभे राहावे. आपला श्वास आपल्या क्षमतेनुसार रोखून धरा आणि हळूहळू तो सोडण्याचा प्रयत्न करा. ताडासन ३-५ वेळा करण्याचा प्रयत्न करा. त्याचसोबत आपला श्वास १०-१५ सेकंद रोखून ठेवता येतो का हे सुद्धा पहा.
=====
हे देखील वाचा- Omicron – या ‘पाच’ गोष्टींचा दररोजच्या जेवणात समावेश करून ओमायक्रॉन व्हेरिएंटवर करा घरच्याघरी मात!
=====

उष्ट्रासन
उष्ट्रासन हे कंबर आणि पाठ दुखीसाठी (Back pain) उत्तम योगासन आहे. हे योगासन करण्यासाठी तुम्हाला तुमच्या गुढघ्यांवर बसायचे आहे. आता दोन्ही हात पुढून मागच्या बाजूस हळूहळू घेऊन जा. असे केल्यानंतर दोन्ही हात आपल्या तळपायाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. उष्ट्रासनाची स्थिती तुम्ही कमीत कमी १० सेकंदांपर्यंत करु शकता.

सेतुबंधासन
सेतुबंधासनात तुमचे शरिर हे एका पुलाप्रमाणे दिसते. हे योगासन करण्यासाठी तुम्हाला तुमचे शरिर वरच्या बाजूला घेऊन जायाचे आहे. तुम्हाला जेवढे स्ट्रेच करता येईल तेवढे करा. जेणेकरुन तुमच्या पाठीवर त्याचे प्रेशर पडत हे आसन केल्यानंतर तुम्हाला थोडा आराम मिळेल. सेतुबंधासन तुम्ही ३-५ वेळा करु शकता.

भुजंगासन
भुजंगासन केल्याने तुमच्या पाठीच्या दुखण्यापासून आराम मिळू शकतो. परंतु हे आसन तुम्ही दररोज केल्याने तुम्हाला हळूहळू पाठ दुखण्याच्या समस्येत फरक जाणवेल. भुजंगासन करण्यासाठी तुम्हाला तुमच्या पोटावर झोपून तुमच्या शरिराचा वरचा भाग आकाशाच्या दिशेने वरती घेऊन जायचे आहे. हे योगासन तुम्ही ३-५ वेळा करु शकता.

अशाप्रकारे तुम्ही अगदी सहज,घरच्या घरी पाठ दुखीपासून आराम मिळवू शकता. मात्र तुमची पाठ अत्यंत दुखत असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. अन्यथा पाठीचे दुखणे मागे लागल्यास बसण्यासह, चालणे किंवा वाकण्यास ही तुम्हाला त्रास होऊ शकतो.