Home » तीक्ष्ण मेंदू आणि चांगली स्मरणशक्ती हवीय? तर आहारात करा ‘या’ गोष्टींचा समावेश

तीक्ष्ण मेंदू आणि चांगली स्मरणशक्ती हवीय? तर आहारात करा ‘या’ गोष्टींचा समावेश

by Team Gajawaja
0 comment
healthy food
Share

वैद्यकीय शास्त्रामध्ये मेंदूला आपल्या शरीराचे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट (CPU) मानले जाते. शरीराची प्रत्येक हालचाल, अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत, इथूनच नियंत्रित केली जाते. मात्र, वयानुसार मेंदूची शक्ती क्षीण होऊ लागते. वाढत्या वयाबरोबर स्मरणशक्ती कमी होणे, एकाग्रता आणि लक्ष कमी होणे, निर्णय घेण्याची क्षमता कमी होणे आणि पार्किन्सन-अल्झायमरसारखे आजार होण्याचा धोका वाढतो. पण हे आजार लहान वयात होऊ शकत नाहीत, असेही नाही. गेल्या काही वर्षांत, ४० वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांमध्येही अशाच समस्यांचे निदान केले जात आहे.(healthy food)

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, मेंदू निरोगी ठेवण्यात आहाराचा मोठा वाटा असतो. आपण ज्या प्रकारचे अन्न खातो, त्यावरून शरीर आणि मन दोन्हीची ताकद ठरते. यामुळेच आपण सर्वांनी लहानपणापासूनच सकस आहाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

अनेक अभ्यासांमध्ये शास्त्रज्ञांनी असा दावा केला आहे की, जर लहानपणापासूनच निरोगी आहाराची सवय लावली तर ते वयानुसार मेंदूची क्षमता कमी होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करते. जर तुम्हालाही तीक्ष्ण डोकं आणि आयुष्यभर चांगली स्मरणशक्ती हवी असेल, तर आहारात काही महत्वाच्या गोष्टींचा अवश्य समावेश करा. जाणून घेऊया शास्त्रज्ञ मेंदूला निरोगी ठेवण्‍यासाठी कोणते पदार्थ खाण्‍याचा सल्ला देतात.(healthy food)

=====

हे देखील वाचा – उस ‘न’ वापरता घरीच बनवा उसाचा रस, कसा ? या जाणून घेऊ

=====

मासे

तज्ज्ञांच्या मते, मेंदूची क्षमता उत्तम राखण्यासाठी मासे खाल्ल्याने फायदा होऊ शकतो. मेंदूचा सुमारे ६० टक्के भाग चरबीने बनलेला असतो आणि त्यातील अर्धा भाग ओमेगा-३ फॅटी ऍसिडचा असतो. ओमेगा-३ फॅटी ऍसिड हे एक प्रकारचे प्रथिन स्त्रोत आहेत, जे निरोगी मेंदू ठेवण्यासाठी आवश्यक आहेत. मासे खाल्ल्याने या ओमेगा-३ फॅटी ऍसिडची गरज पूर्ण होते. आहारात माशांचा समावेश केल्याने स्मरणशक्ती तर वाढतेच, पण मेंदू निरोगी ठेवण्यासाठीही ते खूप फायदेशीर आहे.(healthy food)

कॉफी

जर तुम्हाला वाटत असेल की कॉफी पिणे हानिकारक आहे, तर तिचे फायदे देखील जाणून घ्या. कॉफीमध्ये २ मुख्य घटक असतात – कॅफिन आणि अँटीऑक्सिडंट्स. कॉफी ही ऍडेनोसिन नावाच्या रासायनिक संदेशवाहकाला ब्लॉक करून तुमची सतर्कता वाढवते. ऍडेनोसिन वाढल्यामुळे तुम्हाला अनेकदा झोप येते. अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की, दिवसातून ३-४ कप कॉफी प्यायल्याने पार्किन्सन आणि अल्झायमर सारख्या न्यूरोलॉजिकल रोगांचा धोका कमी होतो.(healthy food)

=====

हे देखील वाचा – ‘या’ नवीन पद्धतीने बनवा ऑम्लेट; लहान मुलांनाच काय, तर मोठ्यांनाही आवडेल

=====

सुखामेवा आणि बिया

मेंदू निरोगी आणि सतर्क राहण्यासाठी आहारात सुखामेवा आणि बियांचा नक्कीच समावेश करा. ते अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन ईचे चांगले स्त्रोत म्हणून ओळखले जातात, जे वृद्धत्वासह संज्ञानात्मक क्षमता कमी होण्यापासून रोखण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. विशेषत: अक्रोडचे सेवन मेंदूचे चांगले आरोग्य सुनिश्चित करण्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. अभ्यासात असे दिसून आले आहे की, जे लोक नियमितपणे ड्रायफ्रुट्सचे सेवन करतात, त्यांचा मेंदू वृद्धापकाळापर्यंत तीक्ष्ण आणि सतर्क राहतो.(healthy food)

डार्क चॉकलेट

डार्क चॉकलेट खाण्याचे अनेक फायदे आहेत, त्यातील एक म्हणजे मेंदूचे आरोग्य चांगले राहणे. डार्क चॉकलेटमध्ये शक्तिशाली अँटिऑक्सिडंट्स तसेच फ्लेव्होनॉइड्स सारखी मेंदूला प्रोत्साहन देणारी संयुगे असतात. चॉकलेटमधील फ्लेव्होनॉइड्सचे प्रमाण शिकणे आणि स्मरणशक्तीशी संबंधित कमतरता, तसेच विविध मानसिक आजारांचा धोका कमी करते, असे दिसून आले आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.