उन्हाळ्यामध्ये लग्नसराईचा सीझन सुरू होतो. लग्न हा वधू आणि वर यांच्यासह दोन्ही कुटुंबांसाठी एक खास सोहळा असतो. प्रत्येकाला आपले लग्न अविस्मरणीय आणि उत्कृष्ट बनवायचे असते. यासाठी पहिला प्रश्न असतो ते म्हणजे लग्नाचे ठिकाण.
लग्न कुठे करायचे हा भावी वर वधू आणि त्यांच्या कुटुूंबासमोर मोठा प्रश्न असतो. त्यातच भर घातली आहे ती डेस्टिनेशन वेडिंग या संकल्पनेने. डेस्टिनेशन वेडिंग (Destination Wedding) हा सध्याचा ट्रेंड आहे. लग्नासाठी लोक खास आणि सुंदर जागा निवडतात. तिथे वधू-वरांचे कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रमंडळीं सहभागी होतात.
उन्हाळ्यात लग्नाची तयारी करणे आणि मजामस्तीत लग्नाचा आनंद लुटणे, कठीण होऊन बसते. उन्हाळ्यात विवाहसोहळा वधू आणि वर तसेच त्यांच्या कुटुंबासाठी आणि पाहुण्यांसाठी थोडा गैरसोयीचा असू शकतो. अशा परिस्थितीत उन्हाळ्यात डेस्टिनेशन वेडिंगचा प्लॅन असेल, तर सुंदर हिल स्टेशन निवडा. येथील हवामान सौम्य आणि सुंदर असल्यामुळे लग्नाचा आनंद द्विगुणित होईल. तर चला उन्हाळ्यात डेस्टिनेशन वेडिंगसाठी (Destination Wedding) प्रसिद्ध असणाऱ्या सर्वोत्तम ठिकाणांबद्दल जाणून घेऊया…
शिमला
हिमाचल प्रदेशातील शिमला हे पर्यटकांचे सर्वात आवडते ठिकाण आहे. हिवाळ्यात तसेच उन्हाळ्यात येथे मोठ्या प्रमाणात लोक येतात. अशा परिस्थितीत तुम्ही ‘क्वीन ऑफ हिल्स’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिमल्यामध्ये डेस्टिनेशन वेडिंग प्लॅन करू शकता. येथील सुंदर टेकड्या आणि थंड वातावरण लग्नाला आलेल्या पाहुण्यांनाही आवडेल, यात शंकाच नाही.
ऋषिकेश
उत्तराखंडमध्ये अनेक हिल स्टेशन आहेत, जिथे तुम्ही डेस्टिनेशन वेडिंग करू शकता. देवभूमी ऋषिकेश ही पवित्रता आणि सौंदर्य या दोन्ही बाबतीत लग्नासाठी उत्तम पर्याय आहे. येथे तुम्ही धार्मिक विधींसह लग्नाचा आनंद घेऊ शकता. या महिन्यात येथील तापमान फारसे उष्ण नसते. संध्याकाळी, हलक्या थंड वातावरणात, तुम्ही गंगेच्या काठावर लग्नाचे कार्यक्रम आयोजित करू शकता. (Destination Wedding)
मसुरी
उत्तराखंडचे मसुरी हिल स्टेशन देखील एक सुंदर पर्यटन स्थळ आहे. मसुरीमध्ये अनेक सुंदर रिसॉर्ट्स आहेत. जे खूप लक्झरीयस आहेत. बजेटमध्येही तुम्हाला एक सुंदर रिसॉर्ट किंवा लग्नाचे ठिकाण मिळेल. चमचमत्या टेकड्यांमध्ये तुमच्या जोडीदारासोबत लग्न करून, तुम्ही तुमच्या नवीन जीवनाची सुरुवात करू शकता. येथे तुम्हाला लग्नाच्या अल्बमसाठी सुंदर बॅकग्राऊंड देखील मिळेल.
गुलमर्ग
काश्मीरमध्ये असलेले गुलमर्ग हे उन्हाळ्यातील लग्नासाठी एक सुंदर वेडिंग डेस्टिनेशन देखील असू शकते. येथील हवामान तुम्हाला उष्णता जाणवू देणार नाही. जोडपे, तसेच लग्नाला येणारे पाहुणे नैसर्गिक सौंदर्य, बर्फाच्छादित आणि हिरव्यागार मैदानांमध्ये जबरदस्त फोटोशूट करू शकतात. (Destination Wedding)
======
हे देखील वाचा – उन्हाळ्यासाठी परिधान करा या ‘खास’ साड्या, पाहणाऱ्यालाही वाटतील कम्फर्टेबल!
======
महाबळेश्वर
तुम्हाला हवे असल्यास उत्तराखंड आणि हिमाचल व्यतिरिक्त, तुम्ही महाराष्ट्रातील पश्चिमेकडील शहरांकडेही जाऊ शकता. लग्नाच्या सुंदर ठिकाणांमध्ये महाबळेश्वर शहराचाही समावेश आहे. जिथे तुम्हाला अनेक सुंदर रिसॉर्ट्स पाहायला मिळतील. महाराष्ट्रातील महाबळेश्वर या सुंदर हिल स्टेशनमध्ये, डेस्टिनेशन वेडिंगसाठी तुम्हाला हवे ते सर्वकाही मिळेल.