बॉलिवूडच्या शंभर वर्षांपेक्षा जास्त असलेल्या इतिहासात या क्षेत्राने अनेक प्रेमकहाण्या जमताना आणि तुटताना पहिल्या. अनेक प्रेमकहाण्या अजरामर देखील झाल्या. काही प्रेमकहाणी यशस्वी झाल्या तर काही दुर्दैवाने अपयशी ठरल्या, काही प्रेमकहाण्यांनी कायमस्वरूपी प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. बॉलिवूडमधील अशीच एक अतिशय गाजलेली आणि प्रसिद्ध असणारी प्रेमकहाणी म्हणजे नर्गिस आणि राज कपूर (Nargis & Raj kapoor) यांची.
नर्गिस हिंदी सिनेसृष्टीला पडलेले एक सुंदर स्वप्न. आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने नर्गिस आणि लाखो करोडो चाहत्यांच्या मनावर राज्य केले किंबहुना आजही करत आहे. नर्गिस यांची कारकीर्द अतिशय संपन्न आणि संस्मरणीय राहिली. अतिशय हिट चित्रपट आणि हिट गाणी देणाऱ्या नर्गिस यांची आज पुण्यतिथी. तर ३ मे १९८१ साली नर्गिस यांनी जगाचा निरोप घेतला.
नर्गिस यांचे व्यावसायिक आयुष्य जेवढे यशस्वी आणि मोहक होते, तेवढेच त्यांचे वैयक्तिक आयुष्य वादात राहिले. नर्गिस यांच्या सुंदरतेवर मोहित होणाऱ्या लोकांमध्ये अनेक बड्या कलाकारांचा समावेश होता. त्यातलेच एक नाव म्हणजे राज कपूर. बॉलिवूडमधील शोमॅन म्हणून ओळख मिळवलेल्या राज कपूर यांनी अनेक दर्जेदार सिनेमे दिले.
अशाच एका वळणावर नर्गिस आणि राज कपूर यांची भेट झाली आणि त्यांच्यात प्रेमाचा अंकुर फुलाला. मात्र दुर्दैवाने त्यांचे प्रेमकहाणी अयशस्वी झाली. मात्र ही अयशस्वी कहाणी कायम बॉलिवूमध्ये एक चर्चेचा विषय बनली. आज नर्गिस यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने जाणून घेऊया त्यांच्या प्रेमकहाणीबद्दल.
====
हे देखील वाचा: काय सांगता! अप्सरा सोनाली कुलकर्णी दुसऱ्यांदा अडकणार विवाहबंधनात
====
नर्गिस आणि राज कपूर यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमे दिले. याच दरम्यान ते एकमेकांच्या प्रेमात पडले. नर्गिस आणि राज कपूर हे नुसते प्रेमात नव्हते तर ते प्रेमात आकंठ बुडालेले होते. त्या दोघांमध्ये असलेले हे प्रेमाचे नाते चित्रपटामधून देखील खूपच प्रभावी पद्धतीने दिसून यायचे.
जेव्हा राज कपूर हे नर्गिस यांना पहिल्यांदा भेटले तेव्हा त्या प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री बनल्या होत्या. या दोघांच्या पहिल्या भेटीबद्दल एका मुलाखतीमध्ये ऋषी कपूर यांनी सांगितले होते की, त्यांची पहिली भेट १९४३ साली ‘अंदाज’ चित्रपटाच्या सेटवर झाली. नर्गिस यांना पाहताचक्षणी राज कपूर त्यांच्या प्रेमात पडले आणि कालांतराने नर्गिस देखील राज कपूर यांच्या प्रेमात पडल्या.
राज कपूर आणि नर्गिस यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. या दोघांचा पहिला होता ‘आग’. त्यानंतर या दोघांनी बरसात (1949), प्यार (1950), आवारा (1951), आशियाना (1952), पापी (1953), श्री 420 (1955), चोरी-चोरी (1956) आदी अनेक चित्रपटांमध्ये काम केले. मीडियामधील माहितीनुसार तब्बल नऊ वर्ष हे रिलेशनशिपमध्ये होते. या काळात राज कपूर यांनी अनेकदा नर्गिस यांना सांगितले की ते त्यांच्या पत्नीला घटस्फोट देऊन त्यांच्याशी लग्न करतील, मात्र प्रत्यक्षात असे काहीच घडले नाही.
====
हे देखील वाचा: हृतिक रोशन आणि सुजेन खान आले एकत्र!, मुलांसोबत घेतला लंचचा आनंद
====
पुढे नर्गिस यांना जाणीव झाली की, राज कपूर हे त्यांच्या पत्नीला कृष्णा कपूर यांना कधीच सोडणार नाही. तेव्हा नर्गिस यांनी असे पाऊल उचलले ज्याची कल्पना राज कपूर यांना अजिबातच नव्हती. १९५७ साली नर्गिस यांनी राज कपूर यांना न सांगता सुनील दत्त यांच्यासोबत ‘मदर इंडिया’ सिनेमा साईन केला. याच सिनेमाच्या सेटवर शूटिंग दरम्यान सेटवर आग लागली आणि या आगीतून सुनील यांनी नर्गिस यांना वाचवले. यातच सुनील दत्त जखमी झाले. पुढे ११ मार्च १९६८ साली नर्गिस आणि सुनील दत्त यांनी लग्न केले.
नर्गिस यांच्या लग्नामुळे राज कपूर पूर्णतः तुटले. त्यांसाठी नर्गिस यांना विसरणे अजिबातच शक्य नव्हते. त्यांच्या पत्नीने सांगितले की, ते रोज रात्री दारू प्यायचे नाही बाथटबमधे बसून रडायचे. यासोबतच ते स्वतःला सिगरेटने चटके देखील दयायचे. १९८१ साली नर्गिस यांच्या निधनानंतर राज कपूर खूप रडले होते.