Home » दीपिका पादुकोणच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा, यावर्षी करणार कान फिल्म फेस्टिवलमध्ये परीक्षण 

दीपिका पादुकोणच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा, यावर्षी करणार कान फिल्म फेस्टिवलमध्ये परीक्षण 

by Team Gajawaja
0 comment
Deepika Pandukone
Share

भारतीय सिनेमे आणि भारतीय कलाकार नेहमीच त्यांच्या कामाच्या माध्यमातून जगावर त्यांची छाप सोडताना दिसतात. जग देखील उत्तम प्रतिभेची दखल घेत त्यांचे कौतुक करत असतो. बॉलिवूडमधील अशीच एक प्रतिभावान अभिनेत्री म्हणजे दीपिका पादुकोण. आपल्या प्रतिभेच्या आणि मेहनतीच्या जोरावर आज दीपिका बॉलिवूडवर राज्य करत आहे. आता दीपिकाच्या उपलब्धीमध्ये अजून एका मोठ्या गोष्टीचा समावेश होणार आहे. दीपिका पादुकोण (Deepika Pandukone) २०२२ मध्ये होणाऱ्या कान फिल्म फेस्टिवलमध्ये परीक्षक म्हणून सामील होणार आहे. 

बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री असलेली दीपिका पादुकोण २०२२ वर्षात होणाऱ्या कान फिल्म फेस्टिवलमध्ये ज्युरी म्हणून सहभाग घेणार आहे. यावर्षी भारतीय सिनेसृष्टीमधून कान फेस्टिवलमध्ये ज्युरी म्हणून सामील होणारी दीपिका (Deepika Pandukone) एकमेव अभिनेत्री आहे. ७५ व्या कान फेस्टिवलमध्ये फ्रेंच ऐक्टर विनसेंट लिनडन हे मुख्य ज्युरी म्हणून काम बघणार आहे. १७ ते २८ दरम्यान हा फिल्म फेस्टिवल होणार आहे. (Deepika Pandukone)

दीपिका पदुकोण (Deepika Pandukone) ज्या जुरीची मेंबर असणार आहे त्या जुरीमध्ये एकूण ८ जज असतील. या ज्युरी फेस्टिवलमध्ये सहभागी झालेल्या २१ चित्रपटांपैकी कोणत्या एका चित्रपटाला २८ मेला होणाऱ्या फेस्टिवलच्या क्लोजिंग कार्यक्रमात ‘पाम पुरस्कार’ देतील. या ज्युरीमध्ये असणारे इतर सदस्य म्हणजे रेबेका हाल, स्वीडिश ऐक्टर नूमी रॅपिस , इटालियन अभिनेते जॅस्मिन ट्रिंका, ईरानी फिल्ममेकर असगर फरहादी, फ्रेंच फिल्ममेकर लैज ली, जेफ निकोलस आणि डायरेक्टर वाकहिम ट्रियर. तत्पूर्वी दीपिका पादुकोणने २०१७ साली तिचे कान फिल्म फेस्टिवलमध्ये पदार्पण केले होते.

========

हे देखील वाचा – दाक्षिणात्य ‘या’ अभिनेत्यावर लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप, इंडस्ट्रीमध्ये हंगामा 
========

यावर्षी कान फिल्म फेस्टिवलमध्ये स्पेशल स्क्रिनिंग सेगमेंटमध्ये भारताचे निर्माते शौनक सेन यांच्या ‘ऑल दैट ब्रीथ्स’ या डॉक्यूमेंट्रीचा पर्मियर होणार आहे. याआधी दीपिका पादुकोणने (Deepika Pandukone) MAMI मुंबई फिल्म फेस्टिवलमध्ये २ वर्ष ज्युरी म्हणून काम केले आहे. दीपिका आधी मृणाल सेन, मीरा नायर, अरुंधति रॉय, ऐश्वर्या राय बच्चन, नंदिता दास, शर्मिला टैगोर, शेखर कपूर आणि विद्या बालन यांनी कान फिल्म फेस्टिवलमध्ये ज्युरी म्हणून काम केले आहे. लवकरच दीपिका शाहरुख खानसोबत ‘पठाण’ या सिनेमात दिसणार असून, याशिवाय ऋतिक रोशनसोबत ती ‘फायटर’मध्ये झळकणार आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.