Home » कशा प्रकारे लावावा परफ्यूम? जेणेकरून उन्हाळ्यातही जास्त काळ दरवळेल सुगंध

कशा प्रकारे लावावा परफ्यूम? जेणेकरून उन्हाळ्यातही जास्त काळ दरवळेल सुगंध

by Team Gajawaja
0 comment
How to Apply perfume
Share

उन्हाळ्यात आपण वेगवेगळ्या समस्यांना तोंड देत असतो. मात्र सर्वात सामान्य आणि मोठी समस्या म्हणजे घाम येणे. काही वेळ उन्हात गेल्यावर आपल्याला घाम येऊ लागतो. त्यामुळे शरीराची दुर्गंधी येते. अशातच परफ्यूम लावणे कोणाला आवडत नाही? त्याचा मनमोहक सुगंध तुम्हाला दिवसभर ताजेतवाने ठेवायला मदत करतो.

मात्र परफ्यूम लावल्यानंतर काही तासांनंतर लगेचच सुगंध कमी होऊ लागतो आणि बहुतेक लोकांना ही समस्या असतेच. आजच्या लेखात अशाच काही टिप्स सांगत आहोत, ज्यामुळे परफ्यूमचा सुगंध दीर्घकाळ दरवळत राहील. (How to Apply perfume)

परफ्यूम ओल्या जागेवर ठेऊ नका 

बाथरूममध्ये किंवा घरातील कोणत्याही ओल्या जागेत परफ्यूम ठेवू नका. ओलसर ठिकाणी उष्णता आणि आर्द्रता असल्यामुळे हे दोन्ही  घटक परफ्यूमचा सुगंध नष्ट करू शकतात.

शॉवर घेतल्यानंतर करावा वापर

आंघोळीसाठी बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे शॉवर जेल उपलब्ध आहेत. तर आंघोळ करताना तुम्ही ते वापरू शकता. एखाद्या सुगंधी शॉवर जेलने संपूर्ण शरीर स्वच्छ करा आणि ओले शरीर पुसल्यानंतर तुमचा परफ्यूम वापरा. यामुळे सुगंध बराच काळ टिकेल. (How to Apply perfume)

परफ्यूम लावून चोळू नका

मनगटावर परफ्यूम लावून तो दुसऱ्या हाताच्या मनगटावर घासल्यास, तो सुगंध कमी होतो. त्यामुळेच परफ्यूमचा सुगंध फार काळ टिकत नाही.

उत्तम दर्जाचे परफ्यूम खरेदी करा

कोणता परफ्यूम खरेदी करावा, असा आपल्याला नेहमीच प्रश्न पडतो. काही वेळा पैसे कमी जातील म्हणून आपण त्या परफ्यूमच्या क्वालिटीकडे जास्त लक्ष देत नाहीत. पण असे न करता, नेहमी चांगल्या दर्जाचे परफ्यूम खरेदी करा. क्वालिटीशी तडजोड करून तुम्ही काही पैसे वाचवू शकता, परंतु अशा परफ्यूमचा परिणाम फार काळ टिकणार नाही. (How to Apply perfume)

=====

हे देखील वाचा – काळे, घनदाट केस हवेत? वापरा मोसंबीचा रस… तयार करा शॅम्पू घरच्या घरी

=====

शरीरावर मॉइश्चरायझर लावा

कोरड्या त्वचेवर सुगंध जास्त काळ टिकत नाही. अशा परिस्थितीत शरीरावर परफ्यूम लावण्यापूर्वी मॉइश्चरायझर लावणे योग्य ठरेल. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही परफ्यूम लावण्यापूर्वी त्वचेवर पेट्रोलियम जेली देखील लावू शकता. असे करून परफ्यूम लावल्यावर, त्याचा सुगंध बराच काळ टिकतो.

शरीराच्या कोणत्या भागावर लावावा परफ्यूम?

अंगभर परफ्यूम लावण्याऐवजी मनगटावर, कोपरांवर किंवा शरीराच्या आतील भागांवर, जे गरम असतात अशा ठिकाणी परफ्यूम वापरणे चांगले. कानामागे आणि मानेवर परफ्यूम जरूर लावा.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.