बॉलिवूडचा ‘दबंग खान’ म्हणजेच सलमान खान आणि साऊथ मित्र स्टार चिरंजीवीच्या ‘गॉडफादर’ चित्रपटात खास भूमिका साकारणार आहे. या चित्रपटासाठी सलमानने एक रुपयाही घेतलेला नाही. ‘बाहुबली’पासून ‘केजीएफ’ आणि ‘आरआरआर’पर्यंत अनेक दाक्षिणात्य चित्रपटांनी ज्याप्रकारे जबरदस्त परफॉर्मन्स दिला आहे ते पाहून ‘भाईजान’ आनंदी आहे, पण एका गोष्टीवर आक्षेपही व्यक्त केला आहे.
सलमान खानने सांगितले की, तो चिरंजीवीच्या आगामी ‘गॉडफादर’ चित्रपटात एक विशेष व्यक्तिरेखा साकारत आहे. तो म्हणाला, “त्याच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूप छान होता. चिरंजीवी माझे खुप चांगले मित्र आहे. राम चरणने RRR मध्ये उत्तम काम केले आहे. मी त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आणि चित्रपटाच्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
मला त्यांचा खूप अभिमान आहे. तो इतकं चांगलं काम करतोय हे खूप छान वाटतं, पण त्याचे चित्रपट इथे चांगले काम करत असताना आपले चित्रपट दक्षिणेत का चालत नाहीत याचे मला आश्चर्य वाटते.
====
हे देखील वाचा: KGF २ चा दमदार ट्रेलर रिलीज
====
‘बॉलिवूडमध्ये असे चित्रपट व्हायला हवेत’
सलमान म्हणाला बाॅलिवूडमध्ये ‘वीरता’ असलेले चित्रपट बनवण्याची गरज असल्याचे सांगितले. तो म्हणाला, साउथ फिल्म इंडस्ट्रीने नेहमीच वीरतेवर विश्वास ठेवला आहे, म्हणून आम्हीही ते केले आहे. थिएटरमधून बाहेर पडल्यावर वीरता हवी.
चित्रपट निर्मात्यांना सल्ला देत सलमाननं सांगितलं, ‘हिरोइजमला प्रेक्षकांची पसंती मिळाली. कारण लोक या चित्रपटांसोबत कनेक्ट होतात. सलीम-जावेद यांच्या काळात हिरोइजम हा फॉर्मट फॉलो करत होते.’
दक्षिणेकडून ऑफर आली नाही
‘भाईजान’ने असेही सांगितले की, त्याला साऊथचे चित्रपट आवडतात, मात्र अद्याप त्याला कुठलीही ऑफर आलेली नाही. “जेव्हा ते माझ्याकडे येतात तेव्हा ते तामिळ आणि तेलुगूसाठी येत नाहीत, तर हिंदी चित्रपटांसाठी येतात”.
वर्क फ्रंटवर, सलमान खान लवकरच YRF च्या टायगर 3 चित्रपटात दिसणार आहे. त्याचे शूटिंग जवळपास पूर्ण झाल्याचे त्याने सांगितले. शाहरुख खान, जॉन अब्राहम आणि दीपिका पदुकोणच्या ‘पठाण’मधील कॅमिओबद्दलही तो बोलला.
====
हे देखील वाचा: ‘द गाॅडफादर’ दिग्दर्शकाने मानले सलमानचे आभार
====
तो म्हणाला, ‘हो, मी शाहरुख खानच्या पठाणमध्ये स्पेशल अपिअरन्स करत आहे आणि तो माझ्या सिनेमातही स्पेशल अपिअरन्स देत आहे.’ त्याचवेळी, आमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’मधील कॅमिओबद्दल सलमान म्हणाला, ‘लाल सिंह चड्ढामध्ये आमिर मुख्य नायक आहे. तो खास आहे.