Home » Vridha Kaleshwar Mahadev Temple: वृद्धकालेश्वर महादेवाचा महिमा

Vridha Kaleshwar Mahadev Temple: वृद्धकालेश्वर महादेवाचा महिमा

by Team Gajawaja
0 comment
Share

उज्जैन या शहराच्या नावासोबत महाकालबाबांचे नाव जोडले गेले आहे. उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर हे भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. स्वयंभू, भव्य आणि दक्षिणाभिमुख असलेल्या भगवान महाकालेश्वर महादेवांच्या दर्शनानं मोक्ष मिळतो, असे सांगितले जाते. या महाकाल मंदिराचे आवार खूप भव्य आहे. महाकाल मंदिर संकुलात मुख्य ज्योतिर्लिंगाव्यतिरिक्त इतर अनेक महत्त्वाची आणि प्राचीन मंदिरेही आहेत. या संकुलात प्रामुख्याने वृद्धकालेश्वर महादेव मंदिर, ओंकारेश्वर शिव मंदिर, तिस-या मजल्यावर असलेले नागचंद्रेश्वर मंदिर आणि गणेश, पार्वती आणि कार्तिकेय यांना समर्पित अनेक मंदिरे आहेत. राम-जानकी मंदिर आणि आणखी काही लहान मंदिरेही या मंदिर संकुलात असलेल्या कोटी तीर्थ कुंडाजवळ आहेत. या संकुलातील काही मंदिरे आणि त्यातील शिवलिंग हे सर्वात प्राचीन असल्याच्या आख्यायिका आहेत. यात वृद्धकालेश्वर मंदिराचा समावेश आहे. त्यामुळेच येत्या महाशिवरात्रीला उज्जैनमधील स्थानिक प्रथम वृद्धकालेश्वर शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी मंदिर परिसरात गर्दी घेणार आहेत. ( Vridha Kaleshwar Mahadev Temple )

उज्जैनमधील वृद्धकालेश्वर मंदिर हे साक्षात बाबा महाकालपेक्षा जुने असल्याचे सांगितले जाते. महाकाल मंदिराच्या मुख्य गर्भगृहापेक्षा वृद्धकालेश्वर मंदिर जुने असल्याची मान्यता आहे. त्यामुळेच महाकालेश्वराच्या दर्शनासोबतच या शिवलिंगाचे दर्शन घेणेही महत्त्वाचे मानले जाते. त्यानंतरच महाकालची यात्रा पूर्ण मानली जाते. या वृद्धकालेश्वर मंदिरातही दररोज, महाकालेश्वर बाबांनी जशी सजावट आणि पूजा केली जाते, तशीच पूजा केली जाते. या मंदिरातही येत्या महाशिवरात्रीसाठी मोठी तयारी सुरु आहे. महाकाल बाबांच्या दर्शनाला येणारे लाखो भक्त या मंदिरातही दर्शन घेण्यासाठी येणार असल्यामुळे भाविकांचे नियोजन करण्यासाठी मंदिर प्रशासन तयारी करत आहे.

फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला साजरा केला जाणारा महाशिवरात्र उत्सव शिवभक्ती आणि त्यागाचे प्रतीक मानला जातो. याच महाशिवरात्रीला ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक आतुर असतात. उज्जैनमध्येही बाबा महाकालचे दर्शन घेण्यासाठी देशभरातील भाविक येतात. मात्र यापैकी फार कमी भाविकांना महाकाल मंदिरात मुख्य गर्भगृहातील शिवलिंगापेक्षाही जुने शिवलिंग असल्याची माहिती आहे. या शिवलिंगाचे दर्शन घेतल्याशिवाय महाकाल मंदिराचे दर्शन अपूर्ण मानले जाते. उज्जैनमधील महाकाल मंदिरात अनेक प्राचीन मंदिरे आहेत. त्यातीलच वृद्धकालेश्वर महादेव मंदिर हे मुख्य मंदिरापेक्षाही जुने असल्याचे सांगितले जाते. या मंदिराच्या गर्भगृहात बाबा महाकालचे प्रतिनिधित्व करणारे शिवलिंग आहे. वृद्धकालेश्वर महादेव आणि बाबा महाकाल यांच्यात अनेक साम्य आहे. वृद्ध कालेश्वर महादेव आणि बाबा महाकाल यांच्यात फरक करणे खूप कठीण आहे कारण शिवलिंगाचा आकार आणि स्वरूप समान आहे. ( Vridha Kaleshwar Mahadev Temple )

=======

हे देखील वाचा : Tamil-Brahmi Inscriptions : इजिप्तमध्ये सापडले तमिळ ब्राह्मी शिलालेख…

=======

महाकाल मंदिरावर झालेल्या आक्रमणामध्येही आक्रमकांनी याच वृद्धकालेश्वर शिवलिंगाची मुख्य शिवलिंग म्हणून हानी केल्याचे सांगितले जाते. त्यामुळेच त्या शिवलिंगाची मोठी हानी होऊन त्याला सध्याचे स्वरुप प्राप्त झाले आहे. वृद्धकालेश्वर महादेव हे बाबा महाकालचे जुने रूप आहे आणि ते त्याहूनही प्राचीन आहे. म्हणूनच, महाकालचे दर्शन घेतल्यानंतर भक्त नेहमीच बाबा वृद्धकालेश्वरला भेट देतात. गेल्या काही वर्षापासून बाबा महाकाल यांचे स्पर्श दर्शन बंद करण्यात आले आहे. मात्र बाबा वृद्धकालेश्वराचे मंदिरात भाविक शिवलिंगाला अभिषेक करु शकतात. शिवाय बाबा महाकाल यांच्या रोज होणा-या भस्म आरतीलाही भाविक लांबून पाहू शकतात.

मात्र वृद्धकालेश्वर मंदिराच्या गाभा-यात त्याचवेळी बाबा महाकालसारखीच भस्मआरती होते, त्यात भाविक प्रत्यक्ष सहभाही होऊ शकतात. भाविक श्रावण महिन्यात आणि महाशिवरात्रीच्या दिवशी विशेष येथे विशेष पूजा करतात. वृद्धकालेश्वर मंदिरातही दररोज वेगवेगळ्या आरत्या केल्या जातात. सध्या याच वृद्धकालेश्वर मंदिरामध्ये महाशिवरात्रीनिमित्त विशेष जागरण सुरु आहे. यात हजारो भाविक आपली सेवा नोंदवत आहेत. बाबा महाकालेश्वर मंदिर महाशिवरात्रीनिमित्त रात्रभर सुरु रहाणार आहे. त्यासोबत वृद्धकालेश्वर मंदिरही रात्रभर सुरु ठेवण्यात येणार आहे. सोबत या मंदिरात भाविकांना प्रत्यक्ष शिवलिंगावर अभिषेकही करता येणार आहे. त्यामुळे या वृद्धकालेश्वर मंदिरामध्ये भाविकांच्या गर्दीचे नियोजन सुरु झाले आहे. ( Vridha Kaleshwar Mahadev Temple )

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.