Home » Republic Day : ‘तिरंगा’ रंगावर आधारित भन्नाट चविष्ट रेसिपी

Republic Day : ‘तिरंगा’ रंगावर आधारित भन्नाट चविष्ट रेसिपी

by Jyotsna Kulkarni
0 comment
Republic Day
Share

उद्या २६ जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिन. भारत उद्या आपला ७७ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. या दिवसाच्या निमित्ताने प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने देशाप्रती प्रेम व्यक्त करतील. आजच्या सोशल मीडियाच्या काळात तर प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावर पोस्ट केली जाते. अशातच उद्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सुट्टी असल्याने घरीच विविध प्रकारचे हटके तिरंगी पदार्थ बनवून आपले देशप्रेम व्यक्त करणारे देखील अनेक लोकं आहेत. यासाठी या खास दिवशी मस्त रेसिपी बनवून सोशल मीडियावर पोस्ट करायला अनेक लोकं उत्सुक असतील. आपल्या तिरंग्यातील रंगांचा वापर करून काही पदार्थ बनवून प्रजासत्ताक दिनाचा सोहळा बघत त्याचा आस्वाद घेण्यासाठी आम्ही आज तुम्हाला काही भन्नाट आणि चविष्ट रेसिपी सांगणार आहोत. ज्या करून तुम्ही नक्कीच तुमचा प्रजासत्ताक दिन अधिकच खास बनवू शकता. (Republic Day)

तिरंगा ढोकळा
तिरंगा ढोकळा हा दिसायला अतिशय आकर्षक आणि चवीला मस्त असा स्नॅक्स आयटम आहे. सकाळी दिल्लीतील परेड बघत हा तिरंगा ढोकळा तुम्ही नाश्त्याला नक्कीच खाऊ शकता. यासाठी काय करायचे चला जाणून घेऊया. केशरी रंगासाठी रवा किंवा बेसनाच्या पिठात गाजराची प्युरी किंवा थोडे लाल तिखट आणि हळद घाला. पांढरा रंगासाठी आपले नॉर्मल रवा किंवा तांदळाच्या पिठाचे पांढरे मिश्रण घ्यावे. तर हिरव्या रंगाच्या थरासाठी या मिश्रणात पालकाची प्युरी किंवा हिरव्या मिरची-कोथिंबिरीची पेस्ट घाला. आता हे मिश्रण एका तेलाने ग्रीस केलेल्या भांड्यात प्रथम हिरवा, मग पांढरा आणि शेवटी केशरी अशा पद्धतीने टाकून वाफवून घ्या. थंड झाल्यावर ढोकळा कापून त्यावर मोहरी-कढीपत्त्याची फोडणी घाला आणि आवडीनुसार शेव ओले खोबरे घालून सर्व्ह करा. (Todays Marathi Headline)

Republic Day

तिरंगा पुलाव
बासमती तांदूळ – २ कप, तूप / तेल – २ टेबलस्पून, जिरे – १ टीस्पून, मीठ – चवीनुसार, काजू, मनुका, बारीक चिरलेली कोथिंबीर
केशरी भातासाठी :
गाजर किसलेले – १ कप, लाल मिरची पावडर – अर्धा टीस्पून, गरम मसाला – अर्धा टीस्पून,
हिरव्या भागासाठी :
पालक किंवा कोथिंबीर पेस्ट – ½ कप, हिरवी मिरची पेस्ट – १ टीस्पून, लिंबाचा रस – १ टीस्पून

कृती : सर्वप्रथम बासमती तांदूळ स्वच्छ धुऊन घ्या आणि मीठ घालून शिजवून ठेवा. भात थंड झाल्यावर त्याचे तीन समान भाग करा. एका पॅनमध्ये थोडे तूप गरम करून जिरे घाला. त्यात गाजर, लाल मिरची पावडर आणि गरम मसाला घालून परतून घ्या. यात भाताचा एक भाग मिसळा. यामुळे केशरी रंगाचा भात तयार होईल. पांढऱ्या भागासाठी शिजवलेला भात तसाच वापरा. तिसऱ्या भागात पालक किंवा कोथिंबीर पेस्ट, हिरवी मिरची पेस्ट आणि लिंबाचा रस घालून भात नीट मिसळा. यामुळे हिरव्या रंगाचा भात तयार होईल. आता सर्व्हिंग प्लेटमध्ये किंवा मोठ्या भांड्यात आधी हिरवा, मग पांढरा आणि शेवटी केशरी भात असे थर लावा. वरून काजू, मनुका आणि कोथिंबीरीने सजावट करा. (Latest Marathi Headline)

तिरंगा इडली
साहित्य : इडली तांदूळ, सफेद उडीद डाळ, एक चमचा मीठ, गाजर प्युरी, पालक प्युरी

कृती : सर्वप्रथम तांदूळ आणि डाळ वेगवेगळी दोन तास भिजवावी. नंतर त्यातील पाणी उपसून मिश्रण वाटावे. नंतर १२ तासासाठी हे वाटलेले मिश्रण एका पातेल्यात झाकून ठेवावे. मिश्रम चांगले आंबले की तीन भाग करावे. त्यातील एकात गाजर प्युरी, दुसऱ्यात पालक प्युरी टाकावी. चवीनुसार मीठ टाकावे. नंतर इडलीपात्रात सर्वात आधी गाजर प्युरीवाले मिश्रण टाकावे. त्यावर सफेद टाकावे नंतर हिरवे मिश्रम टाकावे. वीस मिनिट स्टीम करावे. नंतर हिरव्या चटणीबरोबर या तिरंगी इडली खाण्यास तयार. (Top Stories)

=========

India : प्रजासत्ताक दिनी सादर होणाऱ्या चित्ररथांची निवड कशी केली जाते?

Republic Day : प्रजासत्ताक दिनासाठी प्रमुख पाहुण्यांची निवड कशी केली जाते ?

=========

तिरंगा नारळाचे लाडू
साहित्य – नारळ पावडर (डेसिकेटेड कोकोनट), मावा, पिठीसाखर, वेलची पावडर, काजू, बदाम, हिरवा आणि केशरी खायचा रंग

कृती : सर्व प्रथम गॅसवर कढईत खवा ठेवून मध्यम आचेवर परतून घ्या. खवा हलका तपकिरी रंगाचा झाला की गॅस बंद करा. खवा थोडा थंड झाला की, त्यात साखर, खोबऱ्याचा बारीक किस, काजू, बदाम आणि वेलची पावडर टाकून एकत्र मिक्स करा. आता हे मिश्रण तीन भागांमध्ये घ्या. पहिला भाग पांढरा सोडा. दुसऱ्या भागात केशरी रंग टाकून चांगले मिक्स करा. आणि तिसर्‍या भागात हिरवा रंग घालून एकत्रित करा. आता हे मिश्रण थोडे हातात घेऊन लाडू तयार करा. तुमचे लाडू तयार आहेत. तुम्ही त्यांना फ्रीजमध्ये ठेवून खाऊ शकता. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.