हळू हळू थंडी कमी होत असून, हिवाळा देखील आता अंतिम टप्प्यात आला आहे. त्यामुळे हिवाळ्यात खाल्ल्या जाणाऱ्या पदार्थांचा स्वाद घेण्यासाठी सगळेच घाई करताना दिसत आहे. हिवाळ्यामध्ये अनेक उत्तम आणि पौष्टिक पदार्थ खाण्यासाठी उपलब्ध होतात. वर्षभर ज्या पदार्थांची आपण आतुरतेने वाट बघत असतो ते जेव्हा खायला मिळतात तेव्हा त्याचा आनंद काही औरच असतो. हिवाळ्यात मिळणाऱ्या अनेक गोष्टींपैकी सगळ्यांचीच आवडती गोष्ट म्हणजे, हिरवे मटार. थंडीची चाहूल लागली की, हळूहळू हे हिरवे टपोरे, मऊ लुसलुशीत मटार आपले लक्ष वेधून घेतात. मटार बाजारात आल्यानंतर ते सगळ्यांच्याच घरात दिसायला लागतात. (Kitchen Tips)
मटार कोणाला आवडत नाही असे कोणीच नसेल. त्यामुळे हे मटार घरी आणून त्यापासून विविध पदार्थ करून खाल्ले जातात. मात्र मटार हे वर्षातून केवळ हिवाळ्यातच उपलब्ध होतात. त्यामुळे वर्षभर या मटारचा आपण उपभोग घेऊ शकत नाही. मात्र जर तुम्ही काही सोप्या टिप्स वापरल्या तर नक्कीच वर्षभर मटार खाऊ शकता. जेव्हा मटारचा सिझन असतो तेव्हाच जर तुम्ही मटार जास्त आणले आणि ते फ्रोजन करून ठेवले तर नक्कीच तुम्ही तुम्हाला हवे असेल तेव्हा हे मटार वापरू शकता. बाजारात तर फ्रोजन मटार अगदी सहज मिळतात. मात्र बाजारातून आणलेले हे वाटाणे नैसर्गिक हिरवट रंग टिकवण्यासाठी रंगवलेले असू शकतात. तसेच त्यांची शुद्धता किती असेल याची खात्री देता येत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला घरच्याघरी सोप्या पद्धतीने फ्रोजन मटार कसे करायचे याची रेसिपी सांगणार आहोत. ही रेसिपी फॉलो करून तुम्ही अगदी सहज वर्षभर मटार टिकवू शकता. (Latest Marathi HEadline)

मटार सोलून घ्या. त्यातून खराब झालेले, डागाळलेले किंवा किडलेले दाणे वेगळे करा. जर एखादा खराब दाणा राहिला, तर तो संपूर्ण साठवणूक खराब करू शकतो. एका मोठ्या पातेल्यात ३ ते ४ लिटर पाणी उकळवावे. पाणी व्यवस्थित उकळू लागल्यावर त्यात १ चमचा मीठ, २ चमचे साखर आणि १ चिमूट बेकिंग सोडा टाकावा. बेकिंग सोडा घातल्यास वाटाण्यांचा हिरवा रंग अधिक काळ टिकतो. पाणी उकळायला लागल्यावर त्यात हिरवे वाटाणे टाकावे. हे वाटणे फक्त २ मिनिटं उकळवावे. नंतर ते पटकन बर्फाच्या थंड पाण्यात टाका. (Top Marathi News)
हे केल्याने त्यांच्या शिजण्याची प्रक्रिया थांबते आणि त्याच्या त्वचेवर सुरकुत्या पडणार नाहीत. बर्फातील पाण्यातून काढल्यावर वाटाण्यांना स्वच्छ कापडावर ठेवा आणि हवेत वाळवा जेणेकरून ते एकत्र चिकटणार नाहीत आणि रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्यानंतरही वेगळे राहतील. लक्षात ठेवा मटार पूर्णपणे वाळवणे ही सर्वात महत्वाची स्टेप आहे. त्यामुळे बर्फाच्या पाण्यातून मटार काढल्यानंतर ते नीट वाळवावे. मात्र हे मटार उन्हात सुकवू नका. मटार पूर्णपणे कोरडे झाले की, ते झिपलॉक बॅग किंवा हवाबंद डब्यात भरा. पिशवीतून हवा पूर्णपणे काढून टाका. आता हे मटार फ्रीजरमध्ये ठेवा. (Top Stories)
========
Makhunik Village : इराणचे एक गूढ गाव…..
========
लक्षात ठेवा एकाच मोठ्या पिशवीत सर्व मटार भरण्यापेक्षा लहान लहान पिशव्या करा. जेणेकरून तुम्हाला जेवढे हवेत तेवढेच मटार बाहेर काढता येतील. मटार ठेवलेले फ्रीजर सतत बंद-चालू होणार नाही याची काळजी घ्या, जेणेकरून तापमान टिकून राहील. फ्रीजरमधून काढलेले मटार वापरण्यापूर्वी ५ मिनिटे कोमट पाण्यात ठेवा, ते पुन्हा ताज्या मटारसारखे दिसतील. अशा प्रकारे साठवलेले मटार तुम्ही पुढच्या हिवाळ्यापर्यंत कोणत्याही भाजी, पुलाव किंवा पराठ्यासाठी वापरू शकता. (Social News)
