सूर्यदेव हे हिंदू धर्मातील एक प्रमुख देवता असून ते पृथ्वीवरील जीवनाचे उगमस्थान आहेत. सूर्यदेव हे नवग्रहांमधील प्रमुख आणि आरोग्य, तेज, प्रज्ञा, आणि शक्तीचे प्रतीक मानले जातात. शिवाय त्यांना पंचदेवांमध्ये देखील स्थान आहे. त्यांची पूजा केल्याने आरोग्य आणि आध्यात्मिक लाभ मिळतात. सूर्यदेवांना आरोग्याची देवता मानले जाते आणि त्यांच्या प्रकाशाने जगात ऊर्जा, तेज पसरते. याच प्रकाशावर आणि उर्जेवर पृथ्वीवर जीवन आहे. याच सूर्यदेवांच्या उपासनेचा दिवस म्हणजे प्रत्येक महिन्यात येणारा रविवार. (Rath Saptami)
रविवारसोबतच सूर्यदेवाची पूजा करण्याचा मुख्य काळ म्हणजे मकर संक्रातीपासून ते रथसप्तमीपर्यंत. या काळात सूर्य देवांची मोठया भक्तिभावाने पूजा केली जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. यानंतर रथसप्तमीपर्यंत दररोज विविध पद्धतीने सूर्यदेवाची पूजाअर्चा केली जाते. यंदा मकर संक्रातीचा सण १४ जानेवारी रोजी साजरा झाला. यानंतर आता रथसप्तमीची कधी आहे? याबद्दल अनेकांना प्रश्न पडत आहे. सूर्याची पूजा करण्यासाठी रथसप्तमीचा दिवस पवित्र मानला जातो. (Marathi)
१९ जानेवारीपासून माघ महिन्याची सुरुवात झाली आहे. सूर्यदेवाच्या पूजेसाठी हा महिना खूप पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यात रथसप्तमीचा महत्त्वाचा सण साजरा केला जातो. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सातव्या दिवशी रथ सप्तमी साजरी केली जाते. यावेळी रथसप्तमी ही २५ जानेवारी रोजी आहे. या दिवशी भगवान सूर्याला जल अर्पण करून त्यांची पूजा केली जाते. रथसप्तमीचा दिवस हा मकरसंक्रांतीचा शेवटचा दिवस असतो. या दिवशी महर्षी कश्यप आणि देवी अदिती यांच्या पोटी सूर्यदेवाचा जन्म झाला. श्री सूर्यनारायण हे भगवान श्री विष्णूचे रूप आहे. (Top Stories)

रथ सप्तमीला सकाळी ०७.१३ वाजता सूर्योदय होईल. रथ सप्तमीला पवित्र नदीत स्नान करणे देखील एक सामान्य प्रथा आहे. यावेळी रथसप्तमी रविवार, २५ जानेवारी रोजी असून सप्तमीची सुरुवात २५ जानेवारीला रात्री १२.३९ वाजता होऊन त्याची समाप्ती रात्री ११.१० वाजता होईल. यावर्षी रथ सप्तमीला स्नान करण्याचा शुभ मुहूर्त पहाटे ०५.२६ वाजता सुरू होईल आणि सकाळी ०७.१३ पर्यंत राहील. यंदाची रथसप्तमी खूपच खास असणार आहे. याचे कारण म्हणजे, यावर्षी रथसप्तमी ही सूर्यदेवांचाच वार समजल्या जाणाऱ्या रविवारी आली आहे. (Top Treding Headline)
धार्मिक मान्यतेनुसार सप्तमी तिथीला सूर्य देवाचा अवतार प्रकट झाला होता म्हणून रथ सप्तमीचा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी सूर्य देवाची पूजा केल्याने कुटुंबात सुख-समृद्धी राहाते. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी सूर्याची पूजा केल्याने उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभते. असे म्हटले जाते की, या दिवशी सूर्य मंत्राची पूजा आणि जप केल्याने त्वचा रोग आणि डोळ्यांच्या समस्या कमी होतात. सूर्यदेवाला प्रसन्न केल्याने जीवनात प्रगतीचे नवे मार्ग खुले होतात. मकर संक्रांतीनिमित्त सुरू होणारे हळदी-कुंकू समारंभ रथसप्तमीदिनी समाप्त होतात. रथसप्तमी साजरी करण्यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक अशी दोन्ही कारणे सांगितली जातात. रथसप्तमीला आरोग्य सप्तमी असेही म्हटले जाते. (Social News)
======
Vasant Panchami : देवी सरस्वतीला समर्पित असलेली वसंत पंचमी कधी आहे?
Maghi Ganpati : गणेश जयंती आणि गणेश चतुर्थीमधील फरक
======
रथसप्तमीला सूर्यदेवाची पूजा करताना पुढील मंत्रांचा जप केल्यास नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल.
ॐ सूर्याय नमः
ॐ घृणि सूर्याय नमः
ॐ ह्रीं ह्रीं सूर्याय सहस्रकिरणराय मनोवांछित फलम् देहि देहि स्वाहा
ॐ ऐहि सूर्य सहस्त्रांशों तेजो राशे जगत्पते, अनुकंपयेमां भक्त्या, गृहाणार्घय दिवाकर:
ॐ हृीं रवये नम:
ॐ मरीचये नमः
(टीप : येथे दिलेली सर्व माहिती सामाजिक आणि धार्मिक श्रद्धांवर आधारित आहे. आम्ही या माहितीचे समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
