वसंत पंचमी ही शिशिर ऋतूमध्ये येणारी माघ शुद्ध पंचमी होय. वसंत पंचमीलाच श्रीपंचमी किंवा ज्ञानपंचमी म्हणतात. वसंत ऋतूला ऋतूंचा राजा म्हटले जाते. याच राजा ऋतूचे स्वागत करण्याचा हा अतिशय विशेष दिवस आहे. साधारणतः मकर संक्रांतीनंतर सूर्याचे उत्तरायण सुरू झाले की, त्यानंतर हा सण येतो. वसंत ऋतूचे आगमन वसंत पंचमीच्या दिवसापासून मानले जाते. असे मानले जाते की वसंत पंचमीच्या दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली. हा दिवस देवी सरस्वतीचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. या दिवशी पिवळ्या रंगाला विशेष महत्त्व असून, विद्यार्थी आणि कलाकारांसाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. (Vasant Panchami)
२०२६ मध्ये, वसंत पंचमीचा दिवस शुक्रवार, २३ जानेवारी २०२६ रोजी साजरा केला जाईल. धार्मिक श्रद्धेनुसार, हा दिवस शुभ काळ मानला जातो, शुभ विवाह आणि नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी शुभ मानला जातो. माघ शुक्ल पंचमी तिथी २३ जानेवारी २०२६ रोजी पहाटे २:२८ वाजता सुरू होते. पंचमी तिथी २४ जानेवारी २०२६ रोजी पहाटे १:४६ वाजता संपते. वसंत पंचमी शुक्रवार, २३ जानेवारी २०२६ रोजी साजरी केली जाईल. वसंत पंचमीच्या सरस्वती पूजेचा मुहूर्त: सकाळी ७:१३ ते दुपारी १२:३३. या दिवशी सरस्वती देवीची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. विद्यार्थ्यांसाठी हा दिवस विशेष महत्त्वाचा असतो, कारण अनेक ठिकाणी या दिवशी ‘पाटी पूजन’ किंवा ‘अक्षरारंभ’ केला जातो. (Todays Marathi Headline)

वसंत पंचमीला ‘अबूझ मुहूर्त’ मानले जाते. याचा अर्थ असा की, या दिवशी कोणत्याही शुभ कार्यासाठी पंचांग पाहण्याची किंवा विशेष मुहूर्त काढण्याची आवश्यकता नसते. नवीन व्यवसाय सुरू करणे, गृहप्रवेश, साखरपुडा करण्यासाठी हा दिवस अत्यंत फलदायी मानला जातो. वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वती देवीची पूजा करताना शक्यतो पांढरे किंवा पिवळ्या रंगांचे कपडे परिधान करावे. त्यानंतर एका चौरंगावर किंवा टेबलावर देवी सरस्वतीची मूर्ती किंवा चित्र ठेवावे. नंतर देवीला पिवळ्या रंगांचे फुले, मिठाई, नैवेद्य इत्यादी गोष्टी अर्पण कराव्यात. देवीला नैवेद्य दाखवून झाल्यावर ॐ श्रीम महा सरस्वत्यै नमः या मंत्रांचा जप करावा. शुभ मुहूर्तावर ध्यान व पूजा करणे फायदेशीर मानले जाते. (Latest Marathi Headline)
वसंत पंचमीच्या दिवशीच देवी सरस्वतीची उत्पत्ती झाली असल्याचे सांगितले जाते. या सृष्टीचे निर्माते असलेल्या ब्रह्मदेवांनीच देवी सरस्वतीची उत्पत्ती केली आहे. यामागे एक पौराणिक आख्यायिका देखील सांगितली जाते. सृष्टीचे निर्माणकर्ता ब्रह्म देव ांनी जेव्हा जीव आणि मनुष्यांची रचना केली. मात्र, निर्माण केलेल्या सृष्टीकडे पाहिल्यावर ती निस्तेज असल्याचे त्यांना जाणवले. वातावरण अतिशय शांत होते. त्यात कुठलाही आवाज वा वाणी नव्हती. यामुळे ब्रह्म देव उदास आणि निराश झाले. विष्णू देवाच्या आज्ञेवरून ब्रह्म देवांनी आपल्या कमंडलातील पाणी पृथ्वीवर शिंपडले. भूमीवर पडलेल्या त्या पाण्यामुळे पृथ्वी कंप पावली आणि एक अद्भुत शक्तीच्या रूपात चतुर्भुजी सुंदर स्त्री प्रकट झाली. (Top Stories)
========
Maghi Ganpati : गणेश जयंती आणि गणेश चतुर्थीमधील फरक
========
या प्रगत झालेल्या देवीच्या एका हातात वीणा, दुसर्या हात वर मुद्रेत आणि इतर दोन हातात पुस्तके आणि माळ होती. ब्रह्म देवाने त्या स्त्रीला वीणा वाजवण्याचा आग्रह केला. वीणेच्या सुरांमुळे पृथ्वीवरील सर्व जीवांना, मनुष्याला वाणी प्राप्त झाली. त्या क्षणानंतर देवीला सरस्वती असे म्हटले गेले. सरस्वती देवीने वाणीसह विद्या आणि बुद्धी सर्व जीवांना दिली. माघ महिन्यातील पंचमीला ही घटना घडल्यामुळे सरस्वतीचा जन्मोत्सव रूपात ही पंचमी साजरी केली जाते, अशी मान्यता आहे. या देवीला बागीश्वरी, भगवती, शारदा, वीणावादनी आणि वाग्देवी, अशी अनेक नावे आहेत. संगीताची उत्पत्ती केल्यामुळे संगीताची देवी म्हणूनही तिचे पूजन केले जाते. विद्या, बुद्धी देणाऱ्या सरस्वती देवीची पूजा वसंत पंचमीच्या दिवशी केली जाते. (Social News)
(टीप : येथे दिलेली सर्व माहिती सामाजिक आणि धार्मिक श्रद्धांवर आधारित आहे. आम्ही या माहितीचे समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.)
