आज भारतीय सेना दिवस आहे. भारतीय सेना आपल्या शौर्यासाठी संपूर्ण जगामध्ये ओळखली जाते. भारतीय सेनेने कायम आपल्या पराक्रमाची शर्थ करत विविध मोहिमांमध्ये यश मिळवले आहे. त्यामुळेच जगातील दुसऱ्या क्रमांकाची आर्मी म्हणून भारतीय सेना ओळखली जाते. भारतीय सेनेमध्ये जे सैनिक आहेत, त्यांना अनेक नियमांचे पालन करून आपले देशसेवेचे कर्तव्य बजवावे लागते. आता सोशल मीडियाचेच घ्या. आजच्या काळात सोशल मीडिया ही गरज बनली आहे. सोशल मीडियाचा वापर न करणारी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. सर्वच लोकं सोशल मीडियाचा दररोज वापर करतात. मात्र भारतीय सेनेला सोशल मीडिया वापरताना काही नियमांचे, निर्बंधांचे पालन करावे लागते. जर असे केले नाही तर त्यांना सोशल मीडिया वापरता येत नाही. मग भारतीय जवानांसाठी सोशल मीडियाचे नक्की नियम कोणते चला जाणून घेऊया. (Army)
जवानांना आधी इंस्टाग्राम वापरण्यास मनाई होती, मात्र आता नवीन नियमानुसार सैन्य दलातील जवान आता इन्स्टाग्रामवर आपले अकाऊंट ओपन करू शकणार आहेत. मात्र, यासाठी देखील एक महत्त्वाची अट ठेवण्यात आली आहे. ही अट म्हणजेच जवान इन्स्टाग्रामवरील कंटेंटवर कोणत्याही प्रकारची कमेंट करु शकणार नाहीत किंवा त्या प्लॅटफॉर्मवर कोणतीही पोस्ट करु शकणार नाहीत. प्राप्त माहितीनुसार भारतीय सेनादलातील जवान इन्स्टाग्रामचा वापर फक्त पाहण्यासाठी किंवा निरिक्षण करण्यासाठी करु शकतात. इंडियन आर्मीतील जवानांना यूट्यूब, एक्स, क्वोरा आणि इन्स्टाग्रामचा वापर फक्त दर्शक म्हणून करता येईल. जवानांना माहिती आणि ज्ञान मिळावं हा उद्देश आहे. मात्र, त्यांना यूजर जनरेटेड कंटेंट पोस्ट करण्यास मनाई करण्यात आली आहे. (Top Marathi News)

शिवाय व्हॉट्सअॅप, टेलिग्राम किंवा सिग्नल यांसारख्या मेसेजिंग अॅप्सचा वापर केवळ सामान्य स्वरूपाच्या माहितीसाठी करता येईल. विशेष म्हणजे, सैनिक केवळ अशाच लोकांशी संवाद साधू शकतात ज्यांना ते वैयक्तिकरित्या ओळखतात. समोरच्या व्यक्तीची ओळख पटवण्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित लष्करी कर्मचाऱ्याची असेल. सध्या जॉब मिळवण्यासाठी अतिशय प्रचलित असलेल्या लिंक्डइनसाठी शिवाय व्यावसायिक नेटवर्किंगसाठी प्रसिद्ध असलेल्या ‘लिंक्डइन’चा वापर करण्यासाठी देखील एक नियम तयार केला आहे. सैनिक केवळ त्यांचा बायोडाटा अपलोड करण्यासाठी किंवा भविष्यातील नोकरीच्या संधी शोधण्यासाठी करू शकतात. तिथेही लष्करी माहिती शेअर करण्यास मज्जाव आहे. (Latest Marathi Headline)
परदेशी एजन्सींनी लावलेल्या हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या काही सैनिकांनी अनवधानाने संवेदनशील माहिती लीक केल्याचे समोर आले आहे. अशी अनेक प्रकरणे समोर आल्यानंतर हे कठोर नियम लागू करण्यात आले. यामुळे सोशल मीडिया नियंत्रणाची गरज निर्माण झाली. भारतीय सैन्य दलाचे प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी एका कार्यक्रमामध्ये स्मार्टफोनच्या महत्त्वावर भाष्य केलं होतं. आज काल प्रत्येक जवानाला कुटुंबीयांच्या संपर्कात राहण्याठी आणि ई बुक्स वाचण्यासाठी स्मार्ट फोन आवश्यक आहे, असे सांगितले होते. (Top Trending News)
========
Indian Army : भारतीय सैन्याच्या शौर्याची आठवण करून देणारा ‘आर्मी डे’
========
दरम्यान यापूर्वी २०१९ सालापर्यंत जवानांना कोणत्याही सोशल मीडिया ग्रुपचा भाग होण्यास परवानगी नव्हती. २०२० मध्ये नियम अधिक कडक करत Facebook आणि Instagramसह ८९ मोबाईल अॅप्स हटवण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, आता कठोर नियमांच्या चौकटीत Facebook, YouTube, X, LinkedIn, Quora, Telegram आणि WhatsApp यांसारख्या काही प्लॅटफॉर्मना मर्यादित वापराची परवानगी देण्यात आली आहे. तत्पूर्वी भारतीय सेनेचे अधिकृत सोशल मीडिया हँडल्स सुरुवातीपासूनच कार्यरत असून, Operation Sindoor दरम्यानही अधिकृत माहिती केवळ याच माध्यमातून देण्यात आली होती. नवीन नियमांमुळे माहिती मिळवणे शक्य असले तरी, सर्व सुरक्षा निर्देशांचे पालन करणे जवानांसाठी बंधनकारक राहणार आहे. (social Media)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
