निरोगी राहण्यासाठी सर्वच जणं आपापल्या परीने प्रयत्न करत असतात. यात दररोजचा व्यायाम आणि सकस आणि पौष्टिक जेवण करण्यावर सगळ्यांचा भर जास्त असतो. ज्यांना निरोगी जीवनशैली पाहिजे ते इथूनच सुरुवात करतात. मात्र खरंच एवढेच करून आपण निरोगी होतो का? तर नाही. निरोगी राहण्यासाठी जेवढा उत्तम आहार आणि व्यायाम आवश्यक आहे, तेवढेच आपण आपल्या जेवणाच्या वेळा पाळणे आणि सकाळी उठल्यानंतर नाश्ता करणे देखील गरजेचे आहे. (Breakfast)
आजच्या धावपळीच्या जीवनात जेवणाच्या वेळा पाळणे हे खरंच एक मोठं आव्हान बनले आहे. पण आपल्यापैकी अनेक लोकांना नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण करण्याची योग्य वेळ कोणती? हेच माहीत नसते. जसा वेळ मिळेल, इच्छा होईल असे सर्वच जणं नाश्ता, जेवण करतात. मात्र हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूपच चुकीचे आहे. कायम डॉक्टर, आहार तज्ज्ञ सकाळच्या नाश्ता करण्यावर भर देतात. सकाळचा नाश्ता आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. शरीरासाठी पौष्टिक आहार जेवढा आवश्यक आहे, तेवढेच महत्वाचे आहे वेळेवर खाणे. (Marathi News)
निरोगी राहण्यासाठी सकाळचा नाश्ता हा महत्त्वाचा असतो. सकाळच्या नाश्त्याची प्रत्येकाला फार गरज असते. कारण यातूनच तुम्हाला संपूर्ण दिवसभर काम करण्याची ऊर्जा मिळते. त्यामुळे तुमचे शरीर दिवसभर ताजेतवाने राहते. सकाळच्या नाश्त्याला न्याहारी किंवा ब्रेकफास्टही म्हटले जाते. तज्ज्ञांच्या मते सकाळचा नाश्ता अधिक पौष्टिक असावा. यामुळे वजन नियंत्रित ठेवण्यासोबत शरीराला पर्याप्त प्रमाणात ऊर्जा मिळते. याव्यतिरिक्त, सकाळी लवकर न्याहारी केल्याने चयापचय संबंधित फायदे होतात. (Todays Marathi Headline)
नाश्ता म्हणजे जेवण जे रात्रीच्या ८ तासांच्या झोपेनंतर केले जाते. या शब्दाचा जन्म ‘disner’ या इंग्रजी शब्दातून झाला आहे. ज्याचा अर्थ ‘ब्रेक अ फास्ट’ म्हणजे उपवास सोडणे असा होतो. १५ व्या शतकात हा शब्द इंग्रजी भाषेत समाविष्ट झाला. एका सर्वेक्षणानुसार, बऱ्याच लोकांना नाश्ता करण्याचे फायदे माहित नाहीत. ते सकाळी नाश्ता करत नाहीत. त्यानंतर एकदाच पोटभर जेवणच करून घेतात. पण नाश्ता करण्याची सुद्धा एक योग्य वेळ असते. माहितीनुसार, रात्रीच्या जेवणानंतर जवळपास ९ ते १० तासांच्या आत नाश्ता करून घेतला पाहिजे. आहार तज्ज्ञांच्या मते, ‘सकाळी उठल्यानंतर अर्धा तासांच्या आत पोटात काहीना काही पौष्टीक पदार्थ गेला पाहिजे. त्यानंतर दोन तासांच्या आतमध्ये पूर्ण नाश्ता करून घेतला पाहिजे. (Health)

लोकांनी सकाळी उठल्यानंतर २ तासांच्या आत नाश्ता करावा. उठल्यानंतर जितक्या लवकर नाष्टा कराल तेवढं तुमच्या चयापचयासाठी उत्तम ठरते. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास सकाळी जर ५ वाजता उठल्यानंतर ७ वाजेपर्यत नाश्ता करावा. सकाळी जिममध्ये गेल्यास वर्कआउटच्या २० ते ३० मिनिट आधी हलके पदार्थ खा. काहीही न खाता तुम्ही जिममध्ये वर्कआउट करत असल्यास जिममधून आल्यानंतर नाश्ता करा. (Top Marathi Headline)
सकाळच्या नाश्त्याचा योग्य वेळ साधारणपणे ७ ते ९ या वेळेत असतो. सकाळी उठल्यानंतर शरीराला ऊर्जा आणि पोषणाची गरज असते. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात प्रथिने, फायबरयुक्त पदार्थ आणि फळांचा समावेश असावा. सकाळच्या नाश्त्यामुळे दिवसभरातील कार्यक्षमतेत वाढ होते आणि पचन प्रक्रिया सुरळीत राहते. रात्रीचे जेवण ७ ते ८ या वेळेत करणे योग्य ठरते. यामुळे शरीराला पचन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. उशिरा जेवण केल्यास पचनावर ताण येतो आणि निद्रानाश होऊ शकतो. रात्रीच्या जेवणात हलके आणि पचायला सोपे पदार्थ असावेत, जेणेकरून शरीराला विश्रांती मिळू शकेल. (Marathi News)
सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत साधारणपणे १२ ते १४ तासांचे अंतर ठेवणे योग्य असते. यामुळे शरीराला पचन प्रक्रिया सुरळीतपणे करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. रात्रीचे जेवण केल्यानंतर शरीर पचन प्रक्रियेत व्यस्त होते, आणि सकाळी नाश्त्यापर्यंत पचन प्रक्रिया पूर्ण होते. यामुळे शरीर ताजेतवाने राहते आणि दिवसाची सुरुवात चांगली होते. योग्य अंतर ठेवण्याचे अनेक फायदे आहेत. पचन प्रक्रिया सुरळीतपणे होते, वजन नियंत्रित राहते, रक्तातील साखरेची पातळी संतुलित राहते आणि निद्रा चांगली लागते. नाश्ता आणि रात्रीच्या जेवणाच्या वेळेत योग्य अंतर ठेवल्याने शरीर ताजेतवाने राहते आणि आरोग्य उत्तम राहते. (Top Stories)
सकाळी नाश्ता करण्याचे फायदे
सकाळचा नाश्ता हा तुमचा उर्जेचा सर्वात मोठा स्रोत आहे. काम करणार्यांसाठी ते अधिक महत्त्वाचे असते. कारण तुम्हाला काम करण्यासाठी ऊर्जा लागते. मग ते काम कोणतेही असो. जर तुम्ही नाश्ता न करता घरातून बाहेर पडलात, तर तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करू शकणार नाही किंवा तुम्ही काही क्रिएटिव्ह करू शकणार नाही. (Top Marathi News)
तुमच्या सकाळच्या नाश्त्यामध्ये अंडी आणि अंकुरलेली कडधान्य यासारख्या प्रथिनेयुक्त पदार्थांचा समावेश केल्यास चांगले होईल. न्याहारी देखील महत्वाची आहे कारण ते चयापचय वाढवते ज्यामुळे तुम्ही दिवसभर कॅलरी बर्न करता आणि उत्साही राहता. जर तुम्ही सकाळी नाश्ता करायला विसरलात तर त्याचा तुमच्या कामाच्या उत्पादकतेवर परिणाम होतो. तुम्ही तुमचे काम पूर्ण करू शकणार नाही आणि मग इथून तणाव आणि नैराश्याची समस्या सुरू होते. (Latest Marathi Headline)
=========
Health Care : मधुमेह नियंत्रणात नसल्याचे ५ संकेत, वेळीच घ्या काळजी अन्यथा बिघडेल आरोग्य
Health : झोपेत असताना ‘हार्ट अटॅक’चा धोका अधिक का आहे?
=========
जर तुम्ही नाश्ता केला तर तुम्हाला मधुमेह होण्याचा धोका बराच कमी होतो. रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहते. झोपेतून उठल्याच्या २ तासांच्या आत फळे, कडधान्य आणि प्रथिने खाल्ल्याने तुम्ही दिवसभरातील ग्लुकोजच्या चढउतार टाळू शकता. जेव्हा तुम्ही हेल्दी ब्रेकफास्ट करून घराबाहेर पडता तेव्हा त्यामुळे लठ्ठपणाची समस्याही कमी होऊ शकते कारण नाश्त्यानंतर तुम्ही घराबाहेर पडता तेव्हा तुम्हाला भूक लागत नाही आणि तुम्ही जास्त खाण्यापासून वाचता. (Top Trending News)
नाश्ता केल्याने संज्ञानात्मक कार्य सुधारते. त्याला वगळल्याने बौद्धिक विकासावर परिणाम होतो. मेंदूचे कार्य नीट होत नाही. शिकण्याच्या क्षमतेवरही परिणाम होतो. न्याहारी न केल्याने तुम्हाला सतत थकवा जाणवतो. पुरेशी झोप असूनही तुम्ही आळशी आणि थकलेले राहतात. कारण आपण जे अन्न खातो ते ऊर्जेत रुपांतरित होते. नाश्ता वगळल्याने उर्जेची पातळी कमी होते. त्याचा परिणाम होतो आणि यामुळे , थकवा येऊ शकतो. (Social News)
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
