नववर्षातील पहिला सण असणारा मकरसंक्रांतीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यावर्षी मकर संक्रात १४ जानेवारी, बुधवारी साजरी केली जाणार आहे. यावेळी दुपारी ३ वाजून ६ मिनिटांनी सूर्य धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे १४ जानेवारीला मकर संक्रांत साजरी केली जाणार आहे. मान्यतेनुसार, मकर संक्रांतीला सूर्याची पूजा केली जाते. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्यामुळे दिवस मोठा होतो आणि थंडी हळूहळू कमी होते. मकर संक्रांत हे नवीन पिकाच्या आगमनाचे प्रतीक आहे. या दिवसापासून सूर्य दक्षिणायनातून उत्तरायणाकडे सरकतो. आपण अनेकदा ऐकले असेल की, संक्रांत वाहनावरून येते. (Marathi)
मकर संक्रांतीला धार्मिक दृष्ट्या जेवढे महत्त्व आहे, तेवढेच महत्त्व ज्योतिष्यामधे देखील आहे. मकर संक्रांती दरवर्षी आपल्या वाहनावरून येते. हे वाहन म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे पशु प्राणी असतात. तसेच संक्रांती आपल्या हातात शस्त्र घेते. या शस्त्राला देखील महत्व आहे कारण असे म्हणतात संक्रांतीच्या हातातील शस्त्र भविष्यातील काही गोष्टींचे संकेत देते. त्याचसोबत संक्रांतीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असते तो रंग मकर संक्रांतीच्या दिवशी आपण घालू नये असे सांगितले जाते. (Todays Marathi Headline)
ज्योतिषशास्त्रानुसार, २०२६ मध्ये यंदा मकर संक्रांती १४ जानेवारी रोजी साजरी केली जात आहे, याच दिवशी षटतिला एकादशीचा योग जुळून आला आहे. षटतिला एकादशी आणि मकर संक्रांती हा योगायोग तब्ब्ल१९ वर्षांनंतर पुन्हा आला आहे. याआधी हा योग १५ जानेवारी २००७ रोजी, जुळून आला होता. शास्त्रांनुसार, या दुर्मिळ युतीमुळे विश्वाचे रक्षक भगवान विष्णू आणि भगवान सूर्य यांचे विशेष आशीर्वाद मिळतील. (Sankranti)

पंचांगानुसार, यंदाच्या २०२६ मधील संक्रांतीचे नाव नंदा असून तिचे स्वरूप अत्यंत प्रभावी आणि वेगवान असल्याचे दिसून येत आहे. संक्रांतीच्या विविध अवयवांवरून पुढील अंदाज वर्तवण्यात आले आहेत. यंदा संक्रांतीचे वाहन अश्व अर्थात घोडा असून उपवाहन सिंह आहे. घोडा हा वेगाचे प्रतीक आहे, तर सिंह पराक्रमाचे प्रतीक आहे. संक्रांतीचे वाहन घोडा असल्याने युद्धाची परिस्थिती किंवा शत्रू राष्ट्रांवर वचक निर्माण करू शकणार असल्याचे दर्शवते. या संक्रांतीच्या हातात गदा असून तिने पिवळे वस्त्र परिधान केले आहे. गदा हे शिस्तीचे प्रतीक असल्याने प्रशासकीय कामात कडक अंमलबजावणी होईल. ही संक्रांत बसलेल्या स्थितीत असल्याने, व्यापारी वर्गासाठी अस्थिरतेनंतर स्थैर्य देणारी ठरेल असे सांगितले जात आहे. (Top Trending News)
=======
Sankranti : मकर संक्रांतीला बनवा ‘या’ पद्धतीने सहज सोपे तिळाचे लाडू
Makar Sankranti : वर्षातला पहिला सण असलेल्या मकरसंक्रांतीची माहिती आणि महत्त्व
=======
संक्रांतीच्या हातात जाईचे फुल असल्याचे पहायला मिळेल. पांढऱ्या रंगाचे सुवासिक जाईचे फुल संक्रांतीने आपल्या हातात घेतले आहे. यंदा संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केल्यामुळे आणि कस्तुरीचे लेपन लावल्यामुळे सुगंधी द्रव्ये, सोने, हळद, पितळ आणि कडधान्यांच्या खासकरून हरभरा डाळ किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच संक्रांतीचा प्रवास दक्षिण दिशेकडून उत्तर दिशेकडे होत आहे. त्यामुळे उत्तर भारतातील राज्यांमध्ये विकासाची गती वाढून तिथे मोठ्या प्रकल्पांची घोषणा होऊ शकते. (Social News)
(टीप – येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. आम्ही या माहितीचे समर्थन करत नाही. कोणतेही उपाय करताना तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
