बांगलादेशमध्ये सुरु असलेल्या हिंसक आंदोलनचा फटका बांगलादेशी रॉक स्टार जेम्स याला बसला. रॉकस्टार जेम्स याच्या फरीदपूर येथील संगीत कार्यक्रमावर इस्लामिक अतिरेक्यांनी हल्ला केला. हा हल्ला एवढा भयानक होत की, दंगलखोरांनी थेट संगीत कार्यक्रमात घुसून प्रेक्षकांवर हल्ला केला. जेम्स याच्या स्टेजचा ताबाही इस्लामिक अतिरेक्यांनी घेतल्यामुळे जेम्सला जीव वाचवण्यासाठी पळून जावे लागले. संगीत आणि कलेची जिथे उपासना होत होती, तो बांगलादेश आता पूर्णपणे कट्टर इस्लामिक अतिरेक्यांच्या ताब्यात गेला आहे. ज्या रॉकस्टार जेम्सच्या कार्यक्रमात या अतिरेक्यांनी हैदोस घातला त्या जेम्सने बॉलिवूडसाठी देखील गाणी गायली आहेत. ( Faruq Mahfuz Anam )

Faruq Mahfuz Anam
बांगलादेशातील वातावरण दिवसेंदिवस अधिक तणावपूर्ण होत आहे. येथे हिंदूंवर खुलेआम हल्ले होत असून त्यात त्यांचा जीव घेण्यात येत आहे. आता या देशातील कट्टर अतिरेक्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमावरही आपली करडी नजर वळवली आहे. दंगलखोरांनी प्रसिद्ध बांगलादेशी गायक जेम्सच्या संगीत कार्यक्रमात घुसून दगडफेक केली आणि प्रचंड गोंधळ उडाला. बांगलादेशातील ढाकापासून सुमारे १२० किलोमीटर अंतरावर असलेल्या फरीदपूर शाळेच्या १८५ व्या वर्धापनी शाळेच्या कॅम्पसमध्ये गायक जेम्सचा संगीत कार्यक्रम होणार होता. आयोजन समितीच्या म्हणण्यानुसार, प्रवेश नाकारल्यानंतर, बाहेरील लोकांच्या एका गटाने जबरदस्तीने कार्यक्रमस्थळी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यांना थांबवण्यात आले, पण ही मंडळी विटा आणि दगड घेऊन आली होती. त्यांनी दगडफेक करण्यास सुरुवात करत स्टेजचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. फरीदपूर जिल्हा शाळेतील विद्यार्थ्यांनी हल्ल्याचा प्रतिकार केला. यात काही विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली. शाळेच्या विद्यार्थिनीवरही हल्लेखोरांनी दगडफेक केली. परिस्थिती इतकी बिघडली की, हा संगीत कार्यक्रम रद्द करावा लागला. याचा फटका बांगलादेशचा रॉकस्टार जेम्स यालाही बसला आहे. त्यालाही मारहाण करण्याचा प्रयत्न झाल्यामुळे त्याला मानसिक धक्का बसल्याचे सांगण्यात येत आहे. ( Faruq Mahfuz Anam )
रॉकस्टार जेम्सचे पूर्ण नाव फारुक महफुज अनम आहे. गायक फारुक महफुज अनम जेम्स चा जन्म २ ऑक्टोबर १९६४ रोजी नौगाव येथे झाला. लहानपणापासून त्याचा ओढा संगिताकडे आहे, जेम्सला १९९० च्या दशकात फीलिंग्ज बँडचा फ्रंटमन म्हणून ओळख मिळाली. तो स्वतः संगीतकार, गिटारवादक, गीतकार आणि संगीतकार देखील आहे. बांगलादेशमध्ये संगीताच्या नवीन पिढीतील कलाकार म्हणून त्याच्याकडे बघितले जाते. जेम्स याने एलआरबी आणि आर्कसह बांगलादेशात हार्ड रॉक संगीत लोकप्रिय करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. जेम्सचा फीलिंग्ज बॅण्ड हा बांगलादेशात सायकेडेलिक रॉकचा जनक मानला जातो. जेम्स याने अनेक बांगलादेशी चित्रपटांमध्ये गाणी देखील गायली आहेत. त्याची बहुतेक गाणी लोकप्रिय झाली असून त्याला दोनवेळा सर्वोत्कृष्ट गायकाचा बांगलादेश राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देखील मिळाला आहे. हा जेम्स फक्त बांगलादेशात नव्हे तर पश्चिम बंगलामध्ये देखील खूप लोकप्रिय आहे. पश्चिम बंगालमधील एका कार्यक्रमादरम्यान त्याची ओळख बॉलीवूडमधील दिग्गज संगीतकार प्रीतम चक्रवर्तीशी यांच्याबरोबर झाली. या प्रीतमने जेम्सला बॉलिवूडची द्वारे खुली केली. जेम्सने २००६ मध्ये अनुराग बसूच्या “गँगस्टर” चित्रपटात “भीगी भीगी सी हैं रातें” हे गाणे गायले आहे. त्याचे हे पहिलेच हिंदी चित्रपटातील गाणे सुपरहिट ठरले आहे. त्यानंतर त्याने “वो लम्हे” चित्रपटातील “चल चलें” हे संगीतकार प्रीतमने संगीतबद्ध केलेले गाणे गायले आहे. प्रीतमने २००७ मध्ये “लाइफ इन अ मेट्रो” या चित्रपटातील गाण्यांमध्येही जेम्सला गाणे दिले आहे. या चित्रपटात त्याने ‘अलविदा’चे रिप्राइज व्हर्जन आणि ‘रिश्ते’ हे गाणे गायले. त्यापैकी त्याच्या ‘अलविदा’ गाण्याला एव्हरग्रीन गाणे म्हटले जाते. त्यानंतर जेम्सने २०१३ च्या ‘वॉर्निंग’ चित्रपटातील ‘बेबासी’ हे गाणे गायले आहे. ( Faruq Mahfuz Anam )
=======
हे देखील वाचा : Bangladesh News : बांगलादेशात पत्रकारांचे जगणं झालंय कठीण
=======
जेम्स याचे बांगलादेशमध्ये अनेक मोठा कार्यक्रम झाले आहेत. मात्र फरीदपूरमधील त्याचा कार्यक्रम हिंसाचारामुळे रद्द करावा लागला. या घटनेत २५ विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती आहे. या हिंसाचारामुळे बांगलादेशातील सांस्कृतिक कार्यक्रमांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. स्थानिक आणि आयोजकांच्या मते, हल्लेखोर संगीत आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या विरोधात आहेत. काही दिवसांपूर्वी बांगलादेशात अशाचप्रकारे पत्रकारांनाही मारहाण करण्यात आली आहे. प्रसिद्ध उस्ताद अलाउद्दीन खान यांचे पुत्र सिराज अली खान यांचाही कार्यक्रम बांगलादेशात होता. पण त्यांना धमक्या मिळाल्यामुळे तेही कार्यक्रम न करता भारतात परतले. अशा घटनांमुळे बांगलादेशात जमात-ए-इस्लामशी संबंधित कट्टरपंथी घटकांच्या वाढत्या प्रभावाबद्दल चिंता निर्माण झाली आहे. फरीदपूरची घटना ही केवळ एका संगीत कार्यक्रमावरील हल्ला नसून बांगलादेशाच्या वाढत्या कट्टरतावादाचे प्रतिबिंब आहे. तारिक रहमानसारखे नेते जमातच्या कट्टरतावादाचा सामना करण्यासाठी काय रणनीती आखतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. ( Faruq Mahfuz Anam )
सई बने
