Home » Party : जाणून घ्या पार्टीमध्ये सर्व्ह केल्या जाणाऱ्या कॉकटेल आणि मॉकटेलमधील नेमका फरक

Party : जाणून घ्या पार्टीमध्ये सर्व्ह केल्या जाणाऱ्या कॉकटेल आणि मॉकटेलमधील नेमका फरक

by Jyotsna Kulkarni
0 comment
Party
Share

अनेकदा आपण रेस्टोरंटमध्ये, हॉटेल्समध्ये गेल्यानंतर त्यांचा मेनू बघतो. हा मेनू बघताना आपल्या लक्षात येते की, ड्रिंक्सच्या सेक्शनमध्ये मॉकटेल आणि कॉकटेल असे लिहिलेले असते. बऱ्याच लोकांना हे नीट समजतच नाही. नक्की मॉकटेल आणि कॉकटेल हे काय असते? असा प्रश्न अनेकांना पडतो. हॉटेल्सचे नाही आजकाल तर मोठमोठ्या लग्न समारंभांमध्ये, पार्टीज्मध्ये आपल्याला अनेक रंगबेरंगी ग्लास घेऊन ड्रिंक्स सर्व्ह करणारे लोकं दिसतात. मात्र आपल्याला समजत नाही की, दारू आहे की फ्रुट ज्यूस. वेटरला विचारल्यावर तो कॉकटेल किंवा मॉकटेल आहे असे सांगतो. मात्र आता नक्की कॉकटेल आणि मॉकटेल म्हणजे काय? आज आपण याचेच उत्तर जाणून घेणार आहोत. (Happy New Year)

उद्या सगळीकडे न्यू इअर पार्टीचा जल्लोष असणार आहे. २०२६ चे स्वागत करण्यासाठी सगळीकडे अनेक पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले आहे. थर्टी फर्स्ट आणि पार्टी हे समीकरण खूपच जुने आणि प्रचलित आहे. पूर्वी केवळ परदेशात होणारे हे सेलिब्रेशन हळूहळू भारतात देखील प्रचलित झाले आणि आता तर थर्टी फर्स्ट पार्टी ही जणू आपलीच परंपरा असल्याचे वाटते. आता थर्टी फर्स्टची पार्टी ही ड्रिंक्सशिवाय तर अपूर्णच असते. यादिवशी सर्वच लोकं मोठ्या प्रमाणावर मद्याचे सेवन करतात. यात मुले मुली असा कोणताच पडदा नसतो. मात्र सर्वच लोकं मद्यपान करतात असे देखील नाही. बरेच लोकं कोणत्याही प्रकारचे व्यसन करत नाही. मग असे लोकं पार्ट्या कशा एन्जॉय करतात? तर अशा लोकांसाठी खास मॉकटेल हा ड्रिंक्स प्रकार तयार केला आहे. (Marathi News)

कॉकटेल म्हणजे काय तर अनेक ड्रिंकचे एकत्रित मिश्रण ज्यामध्ये अल्कोहोल अर्थात दारू असते. अल्कोहोल, बिअर, टकीला आदी ड्रिंक्सपासून बनवलेल्या एका पेयांना कॉकटेल पेय असे म्हटले जाते. कॉकटेलमध्ये काही प्रमाणात दारू, फळांचा रस, सोडा आदी ड्रिंक्स घातले जातात. थोडक्यात काय तर ज्या पेयांमध्ये दारू असते त्याला कॉकटेल असे म्हटले जाते. कॉकटेल हे नेहमी अल्कोहोलयुक्त पेय असते. कॉकटेल बनवताना एक खास पद्धत पाळली जाते. (Latest Marathi News)

Party

कोणत्या प्रकारचे अल्कोहोल किती प्रमाणात वापरायचे, त्यासोबत कोणते फ्लेवर मिक्स करायचे हे सगळे आधीच ठरलेले असते. कॉकटेलमध्ये अल्कोहोलचे प्रमाण संतुलित ठेवणे फार महत्त्वाचे असते, त्यामुळे ही ड्रिंक अगदी मोजून-मापून तयार केली जाते. ठराविक वयापेक्षा कमी वयाच्या व्यक्तींना कॉकटेल दिले जात नाही. तसेच काही ठिकाणी कॉकटेल सर्व्ह करण्यासाठी परवानगी किंवा लायसन्सची गरज असते. कॉकटेलमध्ये दारू असल्याने हे नियम या पेयाला लागू होतात. (Top Trending News)

दुसरे ड्रिंक म्हणजे मॉकटेल. मॉकटेल म्हणजे काय तर ज्यामध्ये अल्कोहोल नसते त्याला मॉकटेल म्हटले जाते. मॉकटेल हे कॉकटेलपेक्षा पूर्णपणे वेगळे ड्रिंक आहे. मॉकटेल हे फळांचे रस, सॉफ्ट ड्रिंक्स, सोडा, सिरप, पुदिना, लिंबू अशा नॉन-अल्कोहोलिक घटकांपासून तयार केले जाते. मॉकटेल ही नॉन-अल्कोहोलिक पेयांपासून पेय बनवता. मॉकटेलमध्ये दारू नसल्याने मॉकटेल हे ही ड्रिंक सर्व वयोगटांसाठी सुरक्षित मानली जाते. या पेयांमध्ये अल्कोहोल नसल्यामुळे, ते विकण्यासाठी वयाचे बंधन नाही आणि ते कोणत्याही प्रकारे दिले जाते. तसेच ते बनवण्यासाठी कोणताही विशेष नियम पाळावा लागत नाही आणि तो त्याच्या चाचणीनुसार बनवता येतो. (Top Stories)

=======

New Year : न्यू इअर पार्टीसाठी ट्राय करा ‘या’ भन्नाट मॉकटेल रेसिपी

=======

मॉकटेल तयार करताना फारसे कठोर नियम नसतात. चव, रंग आणि सादरीकरण यावर जास्त भर दिला जातो. आपल्या आवडीनुसार घटक मिसळून मॉकटेल बनवता येते. त्यामुळे मॉकटेलमध्ये प्रयोग करण्याची मोकळीक जास्त असते आणि ती चवीला हलकी आणि फ्रेश असते. लहान मुले, गरोदर महिला किंवा अल्कोहोल टाळणारे लोकही मॉकटेल सहजपणे घेऊ शकतात. त्यामुळे पार्टी किंवा कार्यक्रमांमध्ये मॉकटेल हा सुरक्षित आणि लोकप्रिय पर्याय मानला जातो. कॉकटेल आणि मॉकटेल दिसायला जरी सारखी वाटली तरी त्यामधील मुख्य फरक म्हणजे अल्कोहोल. कॉकटेलमध्ये अल्कोहोल असते आणि त्यावर नियम लागू होतात. मॉकटेलमध्ये अल्कोहोल नसते, त्यामुळे ती सर्वांसाठी सुरक्षित असते. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.