Home » New Year : गोव्यात न्यू इअर पार्टी करायची मग ‘ही’ ठिकाणं आहेत बेस्ट

New Year : गोव्यात न्यू इअर पार्टी करायची मग ‘ही’ ठिकाणं आहेत बेस्ट

by Jyotsna Kulkarni
0 comment
New Year
Share

२०२५ हे वर्ष संपायला अवघे दोनच दिवस शिल्लक आहेत. आता इअर एंड म्हटले तर पार्टी तो बनती है! मात्र यावर्षी नेमका इअर एंड वर्किंग डे ला आल्याने अनेकांनी थर्टी फर्स्टसाठी काहीच प्लॅन्स केले नसतील. तर अनेक जणं आता लास्ट मोमेंटला प्लॅन तयार करत असतील. आता एवढ्या वेळेवर कुठे जावे? हा मुख्य प्रश्न पडला असेल. आता न्यू इयर पार्टीसाठी ठिकाण शोधायचे म्हटले की डोळ्यासमोर एकच पर्याय येतो आणि तो म्हणजे ‘गोवा’. कारण गोव्यात डिसेंबर महिना अगदी खास असतो. गोव्यामध्ये देशाच्याच नाही तर परदेशातील कानाकोपऱ्यातून पर्यटक मौजमजा करण्यासाठी येत असतात. त्यामुळेच गोव्याला पार्टी डेस्टिनेशनचे केंद्र मानले जाते. हेच गोवा थर्टी फर्स्टच्या पार्टीसाठी कॉमन असले तरी बेस्ट ऑप्शन आहे. अतिशय सुंदर बीच, उत्तम वातावरण, पार्टी वाइब्स आदी गोष्टी इथे असल्याने जर तुम्ही लास्ट मोमेंटला पार्टीचा विचार करत असाल तर गोवा उत्तम पर्याय आहे. आता गोव्यातील अतिशय उत्तम ठिकाणं जाणून घ्या. (New Year)

पालोलेम बीच
दक्षिण गोव्यातील पालोलेम बीच न्यू इअर पार्टीसाठी उत्तम पर्याय आहे. हा समुद्रकिनारा केवळ दक्षिण गोव्यातच नव्हे तर उत्तर, पूर्व पश्चिम आणि दक्षिण गोव्यातही अव्वल स्थान मानला जातो. पालोलेम बीच आपल्या सौंदर्यासोबतच पार्टी डेस्टिनेशन म्हणूनही ओळखले जाते. ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने हजारो लोक मौजमजा करण्यासाठी पालोलेम बीचच्या किनाऱ्यावर पोहोचतात. अनेक खास प्रसंगी या समुद्रकिनाऱ्यावर विविध रंजक कार्यक्रमही आयोजित केले जातात. (Marathi News)

बागा बीच
बागा बीच हा उत्तर गोव्यातील पार्टी कॅपिटल म्हणून ओळखला जातो. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला येथे प्रचंड उत्साहाचे वातावरण असते. या किनाऱ्याजवळ असलेल्या टिटोज आणि कॅफे मॅम्बो सारख्या जगप्रसिद्ध नाईट क्लब्समध्ये भव्य पार्ट्या आयोजित केल्या जातात. (Todays Marathi Headline)

New Year

अंजुना बीच
अंजुना हा गोव्यातील ट्रान्स म्युझिक आणि बोहेमियन संस्कृतीचा केंद्रबिंदू आहे. नवीन वर्षाला येथे अनेक प्रसिद्ध पार्टी ठिकाणे आहेत. कर्लीज आणि शिवा व्हॅली येथे फुल मून पार्टीज किंवा न्यू इयर ट्रान्स इव्हेंट्स आयोजित केले जातात. (Top Stories)

अगोंडा बीच
दक्षिण गोव्यातील अजून एक प्रसिद्ध बीच म्हणजे अगोंडा बीच या बीचवर देखील तुम्ही पार्टीसाठी जाऊ शकता. हा देखील दक्षिण गोव्याचा एक प्रसिद्ध समुद्रकिनारा आहे. अगोंडा बीच हा त्याच्या सौंदर्यासाठीही ओळखला जातो. समुद्रकिनाऱ्यावरून सूर्योदय आणि सूर्यास्ताचे दृश्य देखील अप्रतिम आहे. येथे तुम्ही वॉटर स्पोर्ट्सचाही आनंद घेऊ शकता. (Top Marathi News)

मोरजिम बीच
मोरजिम बीच हा तुलनेने शांत आणि लक्झरी पार्टीसाठी ओळखला जातो. हा किनारा ऑलिव्ह रिडले कासवांच्या घरट्यांसाठीही प्रसिद्ध आहे. नवीन वर्षाच्या वेळी येथील काही लक्झरी बीच क्लब्स आणि रिसॉर्ट्समध्ये हाय-प्रोफाईल, नीऑन-थीम असलेल्या खासगी पार्ट्यांचे आयोजन केले जाते. (Latest Marathi Headline)

=======

New Year : पार्टीच्या दुसऱ्या दिवशी हँगओव्हर उतरवायचा मग करा ‘हे’ सोपे उपाय

New Year : न्यू इअर पार्टीसाठी ट्राय करा ‘या’ भन्नाट मॉकटेल रेसिपी

=======

अरामबोल बीच
अरामबोल बीच हा उत्तर गोव्यातील सर्वात सुंदर समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे. अरामबोल हा चांदीचा वाळूचा समुद्रकिनारा आहे ज्यामध्ये खडक देखील आहेत ज्यामुळे ते खूपच आकर्षक बनते. हा गोव्यातील सर्वात हिरवागार किनारा आहे. नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी तुम्ही या दरम्यान डिनर प्लान देखील करू शकता. (Top Stories)

कळंगुट बीच
कळंगुट हा गोव्यातील सर्वात लोकप्रिय समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे. नाइटलाइफ प्रेमींसाठी पार्ट्या आणि लाइव्ह म्युझिकसह कलंगुट बीचचे नाइटलाइफ सर्वोत्तम आहे. येथे अनेक सुंदर रेस्टॉरंट आहेत. ३१ डिसेंबरच्या रात्री येथील दृश्य पाहण्यासारखे आहे. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.