अमेरिका आणि अवघ्या युरोपभर पुढचे काही दिवस जेफ्री एपस्टाईन नावाचा बॉम्बस्फोट होत रहाणार आहे. आता या बॉम्बस्फोट शृंखलेची सुरुवात झाली असून त्यातील पहिला आघात अब्जाधीश बिल गेट्स यांच्यावर झाला आहे. अमेरिकेतील कुप्रसिद्ध एपस्टाईन सेक्स स्कँडलमधील कागदपत्रे आणि फोटो फाईलमधील पहिले ६८ फोटो जाहीर झाले असून त्यात बिल गेट्ससह अमेरिकेतील अनेक उद्योजकांचा समावेश आहे. या फाइल्समध्ये ९५,००० फोटो आणि कागदपत्रे असून त्यात जगभरातील प्रमुख उद्योगपती आणि राजकारण्यांची नावे असल्याचे मानले जाते. (Jeffrey Epstein File)

यातील पहिल्या टप्प्यात जाहीर झालेल्या फोटोंमध्ये बिल गेट्स, गुगलचे संस्थापक सर्गेई ब्रिन, चित्रपट निर्माते वुडी अॅलन, तत्वज्ञानी नोम चॉम्स्की आणि ट्रम्पचे माजी सल्लागार स्टीव्ह बॅनन यांचे फोटो आहेत. हे सर्व फोटो एपस्टाईनच्या मृत्यूपूर्वी जप्त केलेल्या माहितीमधील आहेत. यूएस हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमधील डेमोक्रॅट्सनी लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टाईनच्या इस्टेटमधून हे फोटो जप्त केले आहेत. या सर्वात ज्याच्यामुळे हे सर्व वादळ उठले आहे, त्या जेफ्री एपस्टाईनचा २०१९ मध्ये तुरुंगात संशयास्पद मृत्यू झाला आहे. त्याची महिला सहकारी मात्र अजूनही तुरुंगात असून यासर्व फोटोसंदर्भात तिचीही आणखीन चौकशी होण्याची शक्यता आहे. (International News)
२०२५ या वर्षाचे शेवटचे काही दिवस आहेत. हे सर्व दिवस अमेरिका आणि युरोपमध्ये उत्सवाचे दिवस असतात. नवीन वर्षाचे स्वागत आणि ख्रिसमस या निमित्तानं मोठ्या पार्ट्या येथे आयोजित होतात. राजकारणी, उद्योगपती, अभिनय क्षेत्रातील मंडळी यांनी यातून नववर्षाचे स्वागत कसे केले, याची चर्चा मग सर्वत्र होते. पण यावर्षी अमेरिका आणि युरोपमधील नववर्षाच्या उत्साहावर जेफ्री एपस्टाईन हे नाव काळ्या सावलीसारखे परसले आहे. कुप्रसिद्ध जेफ्री एपस्टाईन यांनी अनेक लहान मुलांचा लैंगिक छळ करुन त्यांना धनदांडग्यांच्या वासनांचे बळी केले होते. आता याच जेफ्रीची फाईल ओपन झाली असून त्यामध्ये जेफ्रीनं आपल्या वर्तुळातील या मान्यवरांचे काढलेले फोटो पुरावा म्हणून जनतेसमोर येत आहेत. (Jeffrey Epstein File)
अमेरिकन हाऊस ओव्हरसाईट कमिटीमधील डेमोक्रॅट्सनी जेफ्री एपस्टाईन प्रकरणात ६८ नवीन फोटो प्रसिद्ध केले आहेत. यामध्ये गुन्हेगारी मजकूर, पासपोर्ट आणि वैयक्तिक मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे समाविष्ट आहेत. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी न्याय विभागाला एपस्टाईन आणि घिसलेन मॅक्सवेल प्रकरणांशी संबंधित फायली शुक्रवारपर्यंत उघड करण्याचे आदेश देणाऱ्या विधेयकावर स्वाक्षरी केली होती, त्यानुसार ही कारवाई सुरु झाली आहे. या फोटोंमध्ये एपस्टाईन अनेक व्यक्तींसोबत दिसत आहेत, त्यात मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स, चित्रपट निर्माते वुडी अॅलन, गुगलचे सह-संस्थापक सर्गेई ब्रिन, सार्वजनिक बुद्धिजीवी नोम चॉम्स्की आणि ट्रम्पचे माजी सल्लागार स्टीव्ह बॅनन यांचा समावेश आहे. दोन फोटोंमध्ये बिल गेट्स महिलांसोबत दिसत आहेत. न्यू यॉर्क टाइम्सचे स्तंभलेखक डेव्हिड ब्रूक्स यांचा फोटो आहे. (International News)
या फोटोंसोबत अनेक धक्कादायक खुलासे उघड झाले आहेत. अनेक फोटोंमध्ये व्लादिमीर नाबोकोव्ह यांच्या कादंबरी “लोलिता” मधील उतारे एका महिलेच्या शरीराच्या विविध भागांवर लिहिलेले आहेत. या फोटोंच्या पार्श्वभूमीवर “लोलिता” पुस्तकाची प्रत आहे. लोलिता ही एक वादग्रस्त कादंबरी ठरली आहे. त्यात एका अल्पवयीन मुलीच्या शोषणाची कहाणी आहे. याच “लोलिता” पुस्तकातील ओळी एका महिलेच्या शरीरावर काळ्या शाईने लिहिलेल्या आहेत. (Jeffrey Epstein File)
एका फोटोमध्ये महिलेच्या पाठीवरील टॅटू दिसत आहे. त्यात लिहिले आहे की, ती आता कोणाच्याही दबावाखाली किंवा बंधनाखाली नाही. तिने स्वतःचा मार्ग निवडला आहे. यात काही मुलीच्या बायोडेटाचाही फोटो आहे. या मुली १७-१८ वर्षाच्या असल्याचे स्पष्ट होत आहे. याव्यतिरिक्त, अनेक महिलांची ओळखपत्रे देखील समोर आली आहेत. यात या महिलांची नावे लपवलेली आहेत परंतु त्यांच्या देशांची नावे नमूद केलेली आहेत. ही ओळखपत्रे रशिया, मोरोक्को, इटली, चेक प्रजासत्ताक, दक्षिण आफ्रिका, युक्रेन आणि लिथुआनिया येथील महिलांची आहेत. या सर्वात एपस्टाईन आणि अज्ञात व्यक्तींमधील सोशल मीडियावरील संभाषणांचे स्क्रीनशॉट देखील खुले करण्यात आले आहेत. यात प्रत्येक रशियन मुलीसाठी $1,000 चा खर्च असल्याचे सांगण्यात आले आहे. हा मेसेज बिल गेट्स यांच्यासंदर्भातून आला असल्यामुळे खळबळ उडाली आहे. (International News)

जेफ्री एपस्टाईन हा एक लैंगिक गुन्हेगार होता. त्याच्यावर अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण आणि तस्करीचे गंभीर आरोप होते. २०१९ मध्ये, त्याने तुरुंगात आत्महत्या केली. मात्र हा खून असल्याचा संशय अनेकांना आहे. त्याची जोडीदार घिसलेन मॅक्सवेल हिला २०२१ मध्ये दोषी ठरवण्यात आले असून ती २० वर्षांची शिक्षा भोगत आहे. या सर्व एपस्टाईन प्रकरणावरुन वाद २०२४ मध्ये सुरु झाला. डोनाल्ड ट्रम्प दुस-यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यावर त्यांना भर पत्रकार परिषदेमध्ये एपस्टाईन संदर्भातील कागदपत्रे खुली करणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा ट्रम्प यांनी हो, असे उत्तर दिले. मात्र यात आपणच फसणार असल्याची जाणीव झाल्यावर त्यांनी जेफ्री एपस्टाईन फाईल, खुली करण्यास टाळाटाळ केली. २०२५ मध्ये काँग्रेसने एपस्टाईन फाइल्स पारदर्शकता कायदा मंजूर केला तेव्हा एक नवीन ट्विस्ट आला. (Jeffrey Epstein File)
=======
हे देखील वाचा : World Highest Railway Station : जगातील सर्वाधिक उंच रेल्वे स्थानक; येथे पोहोचण्याआधीच लोक दोनदा विचार करतात
=======
या अंतर्गत, न्याय विभागाने १९ डिसेंबर २०२५ पर्यंत एपस्टाईनशी संबंधित सर्व सरकारी कागदपत्रे सार्वजनिक करावीत असे आदेश दिले. ती १९ तारीख आता आल्यामुळे युरोपातील अनेकांची धाकधूक वाढली आहे. एपस्टाईनच्या कथित लैंगिक तस्करी नेटवर्कच्या क्लायंटची नावे यात असल्याचे सांगण्यात यते. ही सर्व नावे जाहीर होतांना खुद्द अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हेच या सर्वात प्रथम क्रमांकावर आहेत. त्यामुळे ट्रम्प त्यांच्या अधिकारात या फाईलला रोखतात की संपूर्ण ९५००० हजार दस्तावेज प्रसिद्ध होऊ देतात, हे लवकरच स्पष्ट होणार आहे. (International News)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
